Master Page-Independence day 2015-3.jpg

भारताच्या खेड्यापाड्यांमधले लोक हे स्वातंत्र्यसंग्रामाचं खरं पायदळ मानायला हवेत. इंग्रज वसाहतींविरोधात झालेल्या काही कडव्या उठावांचं नेतृत्वही याच गावकऱ्यांनी केलंय. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त करण्यासाठी लाखोंनी त्यांचे प्राण दिले. आणि भारत स्वतंत्र झालेला पाहण्यासाठी अत्यंत अपेष्टा सोसूनही जे जिवंत राहिले त्यांचा मात्र लवकरच सगळ्यांना विसर पडला. १९९० पासून या काही अखेरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कहाण्या मी गोळा करतोय. यातल्याच या पाच कहाण्या


MAIN THUMBNAIL-02-Salihan_1002-PS-When_Salihan_took_on_the_.max-165x165.jpg इंग्रज सरकारला शिंगावर घेणारी ‘सलिहान’
MAIN THUMBNAIL-01-1002-PS-Foot_Soldiers_of_Freedom-Panimara.max-165x165.jpg

पाणिमाराचं पायदळ – भाग १
MAIN THUMBNAIL-03-2006-PS-Foot_Soldiers_of_Freedom-Panimara.max-165x165.jpg पाणिमाराचं पायदळ – भाग २
MAIN THUMBNAIL-dsc01711.max-165x165.jpg लक्ष्मी पांडाचा अखेरचा लढा

MAIN THUMBNAIL-bhaji_mohammad_nabrangpur_1826_ev.max-165x165.jpg अहिंसेची नव्वद वर्षं


याचसोबत इथे अजून पाच गोष्टी आहेत. या गोष्टी याआधी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात काही छायाचित्रांची भर घातली आहे. स्वातंत्र्य संग्राम फक्त काही शहरी अभिजनांपुरता मर्यादित नव्हता. ज्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये मोठ्या बंडाच्या ठिणग्या उडाल्या त्या गावांवरची लेखमाला म्हणजे ‘विस्मृतीतले स्वातंत्र्य लढे’. खेडोपाडीचे लोक या संग्रामामध्ये फार मोठ्या संख्येने लढले आणि त्यांचे लढेही फार वेगवेगळ्या स्वातंत्र्यांसाठी होते. १८५७मध्ये गावाकडे, खेडोपाडी वेगवेगळे उठाव होत असताना मुंबई आणि कलकत्त्यात मात्र इंग्रजांना त्यांच्या कार्यात यश मिळावं यासाठी तिथले अभिजन बैठका घेण्यात मग्न होते. १९९७ मध्ये स्वातंत्र्याला ५० पूर्ण झाली तेव्हा यातल्याच काही गावांना मी भेटी दिल्या. तिथल्याच या काही कहाण्याः


MAIN THUMBNAIL-01-MISC-12_28A-PS-Sherpur-big_sacrifice_shor.max-165x165.jpg

शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची
MAIN THUMBNAIL-01-TOI-FS_21-PS-Godavari-and_the_police_stil.max-165x165.jpg

गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत
MAIN THUMBNAIL-06-MISC_039_18A-PS-Sonakhan-when_Veer_Naraya.max-165x165.jpg

सोनखनः वीर नारायण सिंग जेव्हा दोनदा मरतो
MAIN THUMBNAIL-01-008-PS-_Kalliasseri-In_Search_of_Sumukan.max-165x165.jpg

कल्लिसेरीः सुमुखनच्या शोधात
MAIN THUMBNAIL-01-011-PS-Kalliasseri-Still_Fighting_at_50.max-165x165.jpg कल्लिसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच

भारताच्या ६९ व्या स्वातंत्र्यदिनी या दहा कहाण्या पुन्हा एकदा...

स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या.

(आता नव्वदीला, कदाचित शंभरीला टेकलेल्या अखेरच्या काही स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेऊन त्यांची कहाणी शब्दबद्ध करण्याचं काम पारी करत आहे.)

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale