‘गर्भात दगावलेल्या’ बाळाच्या ‘जन्मा’चा दाखला

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्ट्रासाउंड मशीनला जाळी लागलीयेत, तिथले कर्मचारी पैसे मागतायत आणि जन्माला येणारं बाळं पोटातच मृत झाल्याचं सांगतात – ज्यामुळे बराच खर्च करून खाजगी दवाखाना गाठावा लागतो

२५ फेब्रुवारी, २०२१ । जिग्यासा मिश्रा

आरोग्य केंद्रांना अवकळा, ‘बिना-डिग्री’ डॉक्टर

पुरेसे कर्मचारी नसलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र, जंगली प्राणी मोकाट फिरतायत, हॉस्पिटलबद्दल लोकांच्या मनात भीती, फोन लागत नाहीत – या सगळ्याचा परिणाम म्हणजे बिहाच्या बडगाव खुर्द गावातल्या गरोदर बाया घरीच बाळंतपण करतायत

१७ फेब्रुवारी, २०२१ । अनुभा भोसले आणि विष्णु सिंग

अलमोडातली बाळंतपणाची बिकट वाट

गेल्या वर्षी उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्यातली रानो सिंग हॉस्पिटलच्या वाटेवर अर्ध्या वाटेत रस्त्यातच बाळंत झाली. हा भागच खडतर आणि खर्चामुळे डोंगरातल्या अनेक पाड्यांमध्ये बाया घरीच बाळंत होतायत

१४ फेब्रुवारी २०२१ । जिग्यासा मिश्रा

सक्तीची नसबंदी, हकनाक बळी

राजस्थानातल्या बन्सी गावची भावना सुतार वारली. गेल्या वर्षी एका ‘शिबिरा’त, नियम डावलून, तिला कोणतेही पर्याय न सुचवता केलेल्या नसबंदीनंतर. तिचा नवरा दिनेश अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे

२२ नोव्हेंबर, २०२० । अनुभा भोसले

‘नववा महिना भरला तरी गिऱ्हाइक केले’

चारदा गर्भ पडून गेला, नवरा दारुडा आणि कारखान्यातली नोकरीही गेली मग पाचव्यांदा गरोदर असलेली दिल्लीची हनी धंद्यात आली, तेव्हापासून तिला लिंगसांसर्गिक आजाराची लागण झालीये. आणि आता टाळेबंदीमध्ये तिचे कमाईचे वांदे झालेत

२० ऑक्टोबर २०२० । जिग्यासा मिश्रा

‘माझ्या बायकोला जंतुसंसर्ग झालाच कसा?’

नसबंदीनंतर जंतुसंसर्ग झाला आणि पुढची तीन वर्षं वेदना, हॉस्पिटलच्या चक्रावून टाकणारे हेलपाटे, कर्जाचा वाढता बोजा आणि अखेर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया असं सगळं राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातल्या सुशीला देवींना भोगावं लागलं

२४ सप्टेंबर, २०२० । अनुभा भोसले आणि संस्कृती तलवार

‘डॉक्टर म्हणतात माझी हाडं पोकळ झालीयेत’

आयुष्यभराची आजारपणं आणि शस्त्रक्रियांनंतर पुणे जिल्ह्यातील हडशीच्या बिबाबाई लोयरे कंबरेतून वाकून गेल्या आहेत. तरीही आपल्या आजारी पतीची काळजी आणि रानातलं घरातल्या कामाला खंड नाही

४ जुलै, २०२० । मेधा काळे

‘माझी काट [गर्भाशय] सारखी बाहेर येते’

महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या भिल्ल बाया अंग बाहेर येत असलं तरी आरोग्यसेवांपर्यंत पोचू शकत नाहीत. रस्ते नाहीत, मोबाइल फोनची सेवा नाही, निरंतर काबाडकष्ट आणि असह्य वेदनांचा त्यांना सामना करावा लागतोय

२५ जून २०२० । ज्योती शिनोळी

‘डॉक्टर सांगायचे गर्भपिशवी काढून टाका’

मानसिक अपंगत्व असणाऱ्या महिलांचे लैंगिक व प्रजनन अधिकार कित्येकदा सक्तीच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करून हिरावून घेतले जातात. पण महाराष्ट्रातल्या वाडी गावची मालन मोरे मात्र आपल्या आईच्या पाठिंब्यामुळे नशीबवान ठरलीये

१७ जून, २०२० । मेधा काळे

बारा-बारा लेकरं झाली की आपोआपच पाळणा थांबतो

हरयाणाच्या बिवान गावातल्या मिओ मुस्लिम समुदायात गर्भनिरोधकांचा वापर कऱणं तितकंसं सोपं नाही आणि त्याला कारणीभूत आहेत सांस्कृतिक घटक, उपलब्ध नसलेल्या आरोग्य सेवा आणि आरोग्यसेवादात्यांची अनास्था – परिणामी बायांची बाळंतपणांच्या चक्रातून सुटकाच नाही

१९ जून, २०२० । अनुभा भोसले आणि संस्कृती तलवार

टाळेबंदीत शालेय मुली मूलभूत गरजांपासून वंचित

शाळा बंद झाल्या आणि उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट जिल्ह्यातल्या गरीब घरातल्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं बंद झालं, आता त्या असुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. एकट्या उत्तर प्रदेशात अशा मुलींची संख्या लाखाच्या घरात जाते.

१ जून, २०२० । जिग्यासा मिश्रा

ग्रामीण आरोग्याचे निर्देशांक नाही, गायी मोजा

कामाचा अपुरा मोबदला, न संपणाऱ्या सर्वेक्षणं, अहवाल आणि इतर कामांच्या बोजामुळे हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यातल्या सीता रानी आणि इतर आशा कार्यकर्त्यांना ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या प्रजननाच्या गरजांकडे लक्ष पुरवणं अवघड होत चाललं आहे

१८ मे, २०२० । अनुभा भोसले आणि पल्लवी प्रसाद

नीलगिरीतलं वारसा हक्काचं कुपोषण

हिमोग्लोबिन नसल्यागत झालेल्या आया, दोन वर्षांची मुलं ज्यांची वजनं केवळ ७ किलो, दारूचं व्यसन, अपुरी कमाई आणि जंगलांपासून तुटत चालल्यामुळे तमिळ नाडूतल्या गुडलुरमधल्या आदिवासी स्त्रियांमध्ये कुपोषणाची पातळी वाढत चालली आहे.

११ मे, २०२० । प्रीती डेव्हिड

‘एका नातवासाठी, आम्हाला चार लेकरं झाली’

दिल्लीहून ४० किलोमीटर लांब असणाऱ्या हरसाना कलान गावातल्या स्त्रिया पुरुषांचा रोष असला तरीही स्वतःच्या आयुष्य आणि प्रजननासंबंधी निर्णयांवर थोडं फार नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा संघर्ष उलगडून दाखवतायत

२३ एप्रिल, २०२० । अनुभा भोसले आणि संस्कृती तलवार

ही बोकरंच मुलासारखी आता’

महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव भागातल्या भिल्ल महिलांना सामाजिक कलंक, बहिष्काराचा समाना करवा लागतोच सोबत मूल न होण्याच्या समस्येवर प्रभावी उपचार करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामीण आरोग्य सेवांचाही

२५ मे, २०२० । ज्योती शिनोळी

‘गेल्या वर्षी एकच जण नसबंदीला तयार झाला’

‘कुटुंब नियोजनामध्ये’ पुरुषांचा सहभाग हा परवलीचा शब्द असला तरी बिहारच्या विकास मित्र आणि आशा कार्यकर्त्यांना मात्र नसबंदीसाठी पुरुषांचं मन वळवण्यात फारसं यश येत नाहीये, त्यामुळे गर्भनिरोधनाची जबाबदारी स्त्रियांवरच येतीये

२९ मार्च, २०२० । अमृता ब्यातनाल

‘त्यांना नुसती गोळी देऊन माघारी पाठवतात’

छत्तीसगडच्या नारायणपूरमधली सोयी-सुविधायुक्त आरोग्य केंद्रं आजही अनेक आदिवासी स्त्रियांच्या आवाक्यात नाहीत. आणि मग गर्भपात किंवा बाळंतपणांसाठी त्या अप्रशिक्षित सेवादात्यांचाच आधार घेतात

१४ मार्च, २०२० । प्रीती डेव्हिड

‘कटकट मिटली’ – नेहाची नसबंदी

२०१६ सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नसबंदी शिबिरं बंद होऊन त्याऐवजी नसबंदी दिन घेतला जातो, पण आजही स्त्रियांची नसबंदीच सर्वाधिक होते – आणि उत्तर प्रदेशात आधुनिक गर्भनिरोधकांचे इतर पर्याय उपलब्ध नसल्याने आजही अनेक जणी नसबंदी करून घेतायत

५ मार्च, २०२० । अनुभा भोसले

कूवालपुरमचं आगळं गेस्टहाउस

कूवालपुरम आणि मदुराईच्या इतर चार गावांमध्ये आजही पाळी सुरू असताना बायांना ‘गेस्टहाउस’मध्ये वेगळं बसवलं जातं. देवाचा आणि माणसांचाही कोप होण्याच्या भीतीने कुणीही या भेदभावाला विरोध करत नाही

२१ फेब्रुवारी, २०२० । कविता मुरलीधरन

लेखमालेचा अनुवादः मेधा काळे

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is also a translator for PARI.