चित्रा आणि मुथुराजाची आगळी प्रेम कहाणी

तिच्या खांद्यावर त्याचा हात आणि त्याच्या पावलांना तिची वाट – मदुराईचे हे पती-पत्नी आयुष्याने पुढ्यात टाकलेली आव्हानं एकत्र पेलतायत. मात्र गरिबी, आजारपण आणि अपंगत्वाने त्यांचं रोजचं जिणं अवघड झालंय

५ सप्टेंबर २०२१ । एम. पळणी कुमार

चालणं, खेळणं किंवा शाळा, मोहसीनला जमायचं नाही

श्रीनगरच्या दुर्गम राख-ए-अर्थ पुनर्वसन वसाहतीत स्थायिक झाल्यापासून अखून कुटुंबाला आपल्या सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या मुलाचे उपचार करणं आणि मजुरी मिळवणं कठीण झालं आहे

३१ मे २०२१ । कनिका गुप्ता

विशेष मुलं आणि शिक्षणाचा अनुशेष

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबांमधल्या मानसिक अपंगत्व असणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय नसल्याने मुलांची अधोगती झालीये आणि पालकांचा चिंताचा डोंगर वाढतच चाललाय

२४ फेब्रुवारी २०२१ । ज्योती शिनोळी

शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचाय, ‘शंकाच नको’

एक पाय अधू असला तरी मच्छीमार असलेले प्रकाश भगत त्यांच्या गावच्या, पारगावच्या लोकांसाठी नाशिक ते दिल्ली वाहन जत्थ्यादरम्यान अन्न रांधतायत, हा जत्था कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शकांच्या समर्थनात निघाला आहे

२३ डिसेंबर २०२० । पार्थ एम एन आणि श्रद्धा अगरवाल

न हरलेल्‍या जिद्दीचे आणि जिगीषेचे धडे...

कोविड देशात शिरण्‍याच्‍या थोडंच आधी गँगरीनने प्रतिभा हिलीम यांची चारही अंगं नेली... दोन हात आणि दोन पाय. पण महाराष्ट्राच्‍या पालघर जिल्ह्यातल्‍या या आदिवासी शिक्षिकेने हार मानली नाही. ‘ऑनलाइन’ शिकण्‍याची शक्‍यताच नसलेल्‍या आपल्‍या गावातल्‍या मुलांना प्रतिभा आज आपल्‍या घरी शिकवत आहेत...

२९ मे २०२१ । श्रद्धा अगरवाल

महामारीच्या काळात ‘स्पर्शातून जग पहायचं' ते असं

विमल आणि नरेश ठाकरे, दोघंही अंध आहेत. मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये ते रुमाल विकायचे. टाळेबंदीमुळे त्यांची कमाई थांबलीये, शासनाची थोडकीच मदत आणि अनिश्चितता मात्र भरपूर

१२ जुलै २०२० । ज्योती शिनोळी

‘डॉक्टर म्हणतात माझी हाडं पोकळ झालीयेत’

आयुष्यभराची आजारपणं आणि शस्त्रक्रियांनंतर पुणे जिल्ह्यातील हडशीच्या बिबाबाई लोयरे कंबरेतून वाकून गेल्या आहेत. तरीही आपल्या आजारी पतीची काळजी आणि रानातलं घरातल्या कामाला खंड नाही

४ जुलै २०२० । मेधा काळे

‘डॉक्टर सांगायचे गर्भपिशवी काढून टाका’

मानसिक अपंगत्व असणाऱ्या महिलांचे लैंगिक व प्रजनन अधिकार कित्येकदा सक्तीच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करून हिरावून घेतले जातात. पण महाराष्ट्रातल्या वाडी गावची मालन मोरे मात्र आपल्या आईच्या पाठिंब्यामुळे नशीबवान ठरलीये

१७ जून २०२० । मेधा काळे

पनवेल ते मध्य प्रदेशः चार दिवस चार रात्र स्कूटरवारी

काही वर्षांपूर्वी अपघातात पाय गमावलेला बिमलेश जैस्वाल टाळेबंदीच्या काळात १२०० किलोमीटर प्रवास करून पनवेलहून मध्य प्रदेशातल्या रेवाला गेला, तेही एका विना गियर स्कूटरवर पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीला घेऊन

२३ मे २०२० । पार्थ एम एन

न पाहता विणलेल्या टोपल्यांची गोष्ट

मिझोरामच्या राजीवनगरमधले देबोहाला चकमा निष्णात कारागीर आहेत. दृष्टीहीन असलेल्या चकमांनी गेल्या ५० वर्षांत केवळ स्पर्श आणि स्मृतीच्या आधारे अतिशय सुंदर, नाजूक काम असलेल्या टोपल्या बनवल्या आहेत. बांबूचं एक अख्खं घर आपण बनवू शकतो असं चकमा सांगतात

२७ मे २०२२ । लोकेश चकमा

मतदानाला चालतात, पण आधारला मात्र पसंत नाहीत

पार्वतीदेवींची बोटं कुष्ठरोगामुळे झडली आहेत. त्यामुळे या कचरा वेचक महिलेला आणि अशीच स्थिती असणाऱ्या हजारोंना आधार कार्ड मिळत नाहीये, आणि आधार कार्ड नाही त्यामुळे अपंग व्यक्तींचं पेन्शन आणि रेशनही नाकारण्यात येतंय

३ एप्रिल २०१८ । पूजा अवस्थी

आयुष्यं उद्ध्वस्त करणाऱ्या खाणी आणि खनिजं

गेली पन्नास वर्षं झारखंडच्या पूर्बी सिंघभुम जिल्ह्यात जादुगुडा आणि इतर युरेनियम खाणींच्या आसपास राहणाऱ्या लोकांना किरणोत्सारी मैला आणि विषारी पाणी साठवलेल्या तलावांपायी फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे

१० सप्टेंबर २०२१ । शुभ्रोजित सेन

मराठवाड्याचं अशांत पाणी हाडं करतंय खिळखिळी

मराठवाड्यातल्या सततच्या दुष्काळामुळे सावरखेडसारख्या अनेक गावातल्या लोकांना जास्त प्रमाणात फ्लुरॉइड असलेलं बोअरवेलचं पाणी प्यायला लागत आहे, आणि यामुळे अनेकांना विकलांग करणाऱ्या फ्लुरोसिसची बाधा झाली आहे

२३ फेब्रुवारी २०१८ । पार्थ एम एन

Translator : PARI Translations, Marathi