जबर्राचे मरकाम आणि त्यांच्या मनस्वी म्हशी

छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातल्या घनदाट जंगलामध्ये मनमुक्त चरणाऱ्या या लाडाच्या म्हशी आहेत विशालराम मरकाम यांच्या. त्या संध्याकाळी आपणहून परत येत असल्या तरी भुकेल्या शिकाऱ्यांची भीती कायमच असते

२१ जानेवारी २०२२ । पुरुषोत्तम ठाकूर आणि प्रीती डेव्हिड

विदर्भातल्या पशुपालकांना महामारीचा भुर्दंड

महाराष्ट्राच्या विदर्भातल्या नंद गवळी आणि दुधासाठी जनावरं पाळणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या दुधाची मागणी घटल्याने आणि पुरवठ्याची साखळीच तुटल्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतंय, सोबतच जनावरांच्या आरोग्याचा आणि चाऱ्याच्या टंचाईचा घोर आहेच

२७ एप्रिल २०२० । जयदीप हर्डीकर आणि चेतना बोरकर

रास्ता है लंबा भाई, मंजिल है दूर

कोविड-१९ मुळे लागलेल्या संचारबंदीमुळे भटकंती करणारे चेनाकोंडा बलसमी आणि तेलंगणातले इतर पशुपालक आता अन्नधान्य आणि गायरानांच्या कमतरतेमुळे आता आपापल्या गावी परतू लागले आहेत

४ एप्रिल २०२० । हरिनाथ राव नागुलवांचा

देशाच्या राजधानीतले बैलगाड्यांचे कारभारी

उत्तर मध्य दिल्लीच्या कार्गो केंद्रांमधले काही बैलगाडी मालक गेल्या अनेक वर्षांपासून माल वाहतूक करतायत पण आता मात्र बऱ्या मजुरीच्या शोधात आहेत, काही जण मात्र ही त्यांची परंपरा असल्याचं आणि एवढंच काम उपलब्ध असल्याचंही सांगतात

२९ मार्च २०२० । सुमित कुमार झा

कुरुबा मेंढपाळांच्या घोंगड्याची ऊब हरपली

पूर्वापारपासून कर्नाटकातील कुरुबा मेंढपाळ आपल्या काटक दक्खनी मेंढ्या चारायला महिनोनमहिने भटकत असतात. पण लेंडीखतं आणि लोकरीच्या घटत्या मागणीमुळे त्यांच्यातील अनेकजण उपजीविकेची इतर साधने शोधू लागले आहेत

१४ मार्च, २०२० । प्रबीर मित्रा

‘जितराब आणि कोंबड्यांना पुष्कळ पाणी लागतं’

दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातली अनेक कुटुंबांनी चारा छावण्यांमध्ये मुक्काम हलवला आहे. सातारा जिल्ह्यातल्या म्हसवडमधल्या छावणीत सारिका आणि अनिल सावंत त्यांच्या दुधाच्या आणि पोल्ट्रीच्या व्यवसायातल्या वाढत्या अडचणींबद्दल बोलतायत

११ जून २०१९ । मेधा काळे

‘कुणी येऊन साधी किंमत बी इचारली न्हाई’

विठोबा यादव निम्म्या भावात त्यांची शेळी विकायला तयार होते, पण पाणी आणि चाऱ्याचं इतकं प्रंचड दुर्भिक्ष्य आहे की साताऱ्याच्या म्हसवडच्या बाजारात खरेदीदारही रोडावलेत

१८ मार्च, २०१९ । मेधा काळे

अखेर चिमणाबाई जेवली, तेही आठ हजारांच्या पंक्तीत

लक्ष्मी काळेल आपली दोन म्हसरं, एक गाय आणि एक बैल घेऊन सातारा जिल्ह्यातल्या चारा छावणीत आल्या आहेत, गावी कुटुंब मागे सोडून, पण नवी नाती जोडत दाहक अशा दुष्काळाचा सामना करत आहेत

२८ फेब्रुवारी २०१९ । मेधा काळे

चाऱ्याच्या शोधात कुटुंबांची ताटातूट

महाराष्ट्रातल्या सातारा आणि इतर जिल्ह्यातल्या दुष्काळामुळे आतापासूनच रानात कामं नाहीत, चारा अन् पाण्यासाठी लोकांना आपली जनावरं घेऊन छावणीत आसऱ्याला जावं लागतंय – आणि तिथेही या संकटाचा भार बायांच्याच खांद्यावर आहे

२३ फेब्रुवारी २०१९ । मेधा काळे

'त्यांना घरी परत आलेलं पाहिलं की मी वाघोबाचे आभार मानते’

नुकत्याच ठार केलेल्या टी १ पासून संरक्षण म्हणून यवतमाळचे गुराखी शंकर अत्राम यांनी विनोदी भासेल असं एक ‘चिलखत’ बनवलं असलं तरी ते आणि बाकी गावकऱ्यांसाठी आता धोका आहे तो विस्थापित झालेल्या आणखी काही वाघांचा

१४ नोव्हेंबर २०१८ । जयदीप हर्डीकर

दूध भरून आणणाऱ्या चार बेटांवरच्या नावा

आसामच्या ब्रह्मपुत्रेतल्या चालाकुरा बेटावर राहणाऱ्या लोकांसाठी दुग्ध व्यवसाय हाच उपजीविकेचा मार्ग आहे – पण वैरण आणि पशुखाद्याचं सरकारी अनुदान काढून टाकल्यामुळे त्यांची आयुष्यातील अनिश्चितता वाढली आहे

१३ फेब्रुवारी २०१८ । रत्ना भराली तालुकदार

बंडीपूरचा प्रिन्स जेव्हा समोर उभा ठाकतो

निसर्गवादी आणि शेतकरी असणारा के. एन. महेश बंडीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी जवळ राहतो. पारीवरच्या त्याच्या या चौथ्या चित्रकथेत तो टकरी घेणारे बैल, बुजऱ्या गायी, पाळीव हत्ती आणि गरुडाचं दर्शन घडवतो

१४ ऑगस्ट, २०१९ । के. एन. महेशा

गोधन असूनही निर्धन

४५ अंश सेल्सिअसवर पारा गेलेल्या मराठवाड्यात दुष्काळाने होरपळलेले शेतकरी जागोजागी आपली गुरं विकण्यासाठी बाजार फिरत आहेत. पण नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गोमांस बंदीमुळे त्यांना हे करणंदेखील कठीण झालं आहे

७ सप्टेंबर, २०१७ । पार्थ एम एन

ओडिशात स्थलांतर तेही पोहत

ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात नव्या कुरणांच्या शोधात म्हशी दररोज गावातली नदी पोहून पार करतात

१० जानेवारी २०२० । दिलीप मोहंती