भीमराव आणि रमाईच्या आठवणींची गाणी

तरुणपणचे भीमराव आंबेडकर आणि रमाबाईंबद्दलच्या प्रेमाने आणि मायेने ओथंबलेल्या या ओव्या गायल्या आहेत माजलगावच्या मायलेकींनी. ही दोघं अगदी त्यांच्या घरातलीच बनून गेली आहेत

२ मे २०२२ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

'गावातली सुईण काही ‘साधीसुधी बाई नाही’

मुळशी तालुक्यातल्या तारा उभे जात्यावरची ओवी हा प्रकल्प कसा सुरू झाला त्याची गोष्ट सांगतात आणि गावातल्या सुइणीचं महत्त्व, तिच्याकडच्या ज्ञानाचा ऱ्हास याबद्दलच्या काही ओव्या गातात

३ एप्रिल २०२२ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

आईच्या प्रेमाचा संजीवक स्पर्श

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या शाहू कांबळे शेजारच्या मैत्रिणीने मन दुखावल्यावर घरच्यांच्या, खास करून आईच्या प्रेमाची, त्यातनं मिळणाऱ्या आधाराची आठवण काढतात

१५ फेब्रुवारी २०२२ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

सीतेची गाणी - सुखाची, दुःखाची आणि वनवासाची

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातल्या दोघी जणींनी त्यांनी गायलेल्या या १३ ओव्यांमधून सीतेचा वनवास आणि तिचं जिवलगांशिवायचं दुःख चितारलं आहे

२५ जानेवारी २०२२ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

बाया, पुरुषसत्ता आणि चढाओढीची गाणी

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या या तिघ जणी एका नवतीच्या नारीच्या वागण्याबद्दल आणि त्या वागण्याचा त्यांचे पती आणि मुलावर काय परिणाम व्हायला लागलाय त्याबद्दल काही खास ओव्या गातायत. आपल्या सुखाला या नारीच्या वागण्याने ग्रहण लागणार असंच या ओव्या सांगतात

७ जानेवारी २०२२ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

नव्या बाळंतिणीसाठी आईच्या चार युक्तीच्या गोष्टी

नव्याने बाळंत झालेल्या लेकीला तिची आई काय सल्ले देतीये हे या नव्या ओव्यांमधून गातायत पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जाई साखळे. तब्येतीची काळजी घेत घेत समाजाच्या चालीरितीदेखील सांभाळायच्या असं ही आई सांगतीये

१ नोव्हेंबर २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

जात्याच्या रथावर आरुढ, सुखसमृद्धीच्या वाटेवर

सावित्रा उभेंनी गायलेल्या रोजच्या दळणावरच्या ११ ओव्या इथे सादर करत आहोत. दळण दळतानाच्या काही युक्त्या सांगत असतानाच आपल्या आईने अशा कष्टाच्या कामासाठी आपल्याला कसं तयार केलं याचीही आठवण त्या ठेवतात.

८ ऑक्टोबर २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

बहिणीच्या डोळा पाणी, भाऊ चिंतावला मनी

सावित्रा उभे आणि त्यांच्यासोबत काही जणी दळता दळता या आठ गोव्या गातायत. एकीकडे नित्याचं आयुष्य सुरू असताना बहीण भावामधल्या भांडणाचा विषय या ओव्यांमध्ये येतो

३ सप्टेंबर २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

संसाराच्या सुखासाठी बाईचं काम आणि घाम

सावित्राबाई उभे या पाच ओव्यांमधून रोजच्या दळणाविषयी आणि त्यातून आपल्या संसाराला चांगले दिवस कसे आणायचे याबद्दल गातायत

२३ ऑगस्ट २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

‘मांडवाच्या दारी, गणराज तुम्ही यावा’

पुणे जिल्ह्याच्या शिरुरमधल्या विजया मैड या नऊ ओव्यांमधून घरच्या लग्नाचं निमंत्रण सगळ्या देवीदेवतांना पाठवतायत. आणि या ओव्यांमधून घरच्या या सोहळ्याचं आनंदी चित्र रंगवतायत.

४ ऑगस्ट २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

जिवाच्या सोडवणुकीसाठी एकादशीचा उपवास

आषाढी एकादशी आणि विठ्ठलाच्या भक्तांनी धरलेला उपवास यावरच्या ओव्या फुलाबाई भोंग यांनी इथे गायल्या आहेत. एकादस धरली तर जन्म-मरणाच्या फेऱ्यातून जिवाला मुक्ती मिळते अशी अनेकांची श्रद्धा आहे.

२२ जुलै २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

शतकोटी प्रणाम माझा भगवान बुद्धाला

बीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या या माय-लेकी गौतम बुद्धाची स्तवनं गातात. लोकांच्या रोजच्या आयुष्यात बुद्धाचा वास आहे आणि तो आपल्या शिकवणीतून त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतो हे या ओव्यांमधून दिसून येतं.

२७ मे २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

भीमरावः ‘आईबापांच्या पोटी, कसा जलमला हिरा’

डॉ. भीमराव रावजी आंबेडकरांची १३० वी जयंती साजरी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या नांदगावच्या शाहू कांबळेंनी गायलेल्या या ओव्या. सामाजिक न्याय आणि समतेसाठी आंबेडकरांनी  संघर्ष केला. त्या संघर्षातून काय निष्पन्न झालं ते  या ओव्या सांगतात

१६ एप्रिल २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

बाईच्या अनंत कष्टांचं मोल तरी काय?

पुणे जिल्ह्यातल्या ७२ वर्षांच्या शेतकरी असणाऱ्या कुसुम सोनावणे बाईच्या अनंत आणि बिनमोल श्रमांबद्दल गातात – तितकंच नाही, जन्मापासून मोठं होईपर्यंत तिच्या आयुष्याच्या इतरही अनेक पैलूंबाबत.

१९ मार्च २०२१ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

जगायला दूरदेशी गेलेल्यांच्या प्रेमाची गाणी

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्याच्या खडकवाडीच्या मुक्ताबाई उभे नऊ ओव्या गातात, पोटापाण्याच्या शोधात दूरदेशी गेलेल्या आपल्या पतीसाठी पत्नीच्या मनात असलेली आस आणि प्रेमाने ओथंबलेल्या या ओव्या

२७ जून २०२० । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

पंढरीच्या वाटेवर जिवलगांची माया

पुणे जिल्ह्यातल्या सविंदण्याच्या सोनुबाई मोटे त्यांच्या ओव्यांमध्ये विठुरायाच्या पंढरीला जाताना घरच्या सगळ्या मायेच्या माणसांना सोबत घेऊन जातात – दर वर्षी रंगणाऱ्या या वारीच्या सोहळ्याची सांगता या वर्षी १२ जुलैला होईल

१३ जुलै २०१९ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

दसऱ्याच्या दिवशी आगळं सीमोल्लंघन

१९५६ साली दसऱ्याच्याच दिवशी डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिकरित्या हिंदू धर्म नाकारला. या महत्त्वाच्या घटनेविषयी आणि बुद्धाने संन्यास घेतला त्याविषयी जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी गातायत राधाबाई बोऱ्हाडे आणि वाल्हाबाई टाकणखार

२५ ऑक्टोबर २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

मुळशीची सहा पाऊसगाणी

जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी खडकवाडीतल्या या बाया स्मृतीचे कोपरे न कोपरे चाळत पावसाच्या या काही ओव्या गातायत – ओली माती, पेरणी, भावाची आटत चाललेली माया आणि पंढरीची वारी

२७ जून २०२० । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

‘बाई भीमरायानी आकाश मातकुला केला’

जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकापुष्पात मुळशी तालुक्यातल्या कुसुम सोनवणे आणि त्यांच्या मैत्रिणी बाबासाहेबांनी समानतेसाठी आणि जातीअंतासाठी जो लढा दिला त्याची स्मृती जागवणाऱ्या १४ ओव्या गातायत

१३ ऑगस्ट २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

पाण्यासाठी लढा म्हणजेच समतेसाठी लढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी जात्यावरच्या ओव्या  हा  प्रकल्प सादर करत आहे नांदगाव च्या कुसुम सोनवणे आणि इतर मैत्रिणींनी गायलेल्या महाड सत्याग्रहाबाबतच्या १४ ओव्यांची एक चित्रफीत

३० एप्रिल २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

“जग बोलतं ते बोलू द्या...”

जात्यावरच्या ओव्या प्रकल्पातल्या या सात ओव्या नांदगावच्या कुसुम सोनवणे आणि शाहू कांबळेंनी गायल्या आहेत . आणि यात आहे बाया - बायांमधली कधी कच्ची तर कधी पक्की मैत्री

१४ ऑगस्ट २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

अत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली

या वर्षीच्या ८ मार्च – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत महाराष्ट्रातल्या नांदगावच्या शाहू कांबळेंच्या काही ओव्या सादर करत आहोत. पुरुषी अत्याचारांनी पेटून उठलेल्या स्त्रीचा संताप या ओव्यांमधून व्यक्त झाला आहे

७ मार्च २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

विस्मृतीतली गाणी आली ओठावर...

पुणे जिल्ह्यातल्या मलठणच्या चिमाबाई दिंडलेंना जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी गायलेल्या ओव्या आता बिलकुल आठवत नाहीत. मात्र पारीच्या ‘जात्यावरच्या ओव्या टीम’ने गळ घातल्यावर त्यांनी काही ओव्या सांगितल्या, प्रेमळ नवऱ्याच्या, गोसाव्याच्या आणि ईश्वरासमान जात्याच्या.

२४ जानेवारी २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

पक्के पैलवान अन् सख्ख्या मायलेकी

पैलवानाची ताकद, कौशल्य आणि आडदांड देहाचं श्रेय त्याच्या आईला द्यावं का? नक्कीच. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नांदगावच्या शाहू कांबळे त्यांच्या ओव्यांमध्ये तेच तर गातायत. जात्यावरची ओवी संग्रहातल्या या ओव्यांमध्ये त्या मामा भाच्यांच्या कुस्तीबद्दल सांगतायत.

२६ डिसेंबर २०१७ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

ग्रामीण बायांच्या गाण्यात जिवंत असणारे बाबासाहेब

पुणे जिल्ह्यातल्या लव्हार्डे गावच्या लीलाबाई शिंदेंनी बाबासाहेब आंबेडकरांसाठी काही ओव्या गायल्या आहेत. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पारी त्यांचं स्मरण करत आहे.

५ डिसेंबर २०१७ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

सरलं दळण
, and • Pune, Maharashtra

सरलं दळण

जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत सविंदणे गावच्या धोंडाबाई आणि अंजनाबाई गाढवे दळण सरल्याच्या काही ओव्या गात आहेत. त्यांचे कष्ट वाटून घ्यायला त्यांचे देव-देवता येतात असं त्या गातात.

१२ फेब्रुवारी २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

मधासारखी गोड आई आणि हुलग्यासारखा दोड जावई

जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत कोळावडे गावच्या लीलाबाई कांबळे आईची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही असं गातायत तर लवार्ड्याच्या ताराबाई उभे जावयाला आता सततच्या मागण्या थांबव असं सुचवतायत

१० ऑगस्ट २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

अशी बहीण भावंडं – एका झाडाची संतरं

दिवाळीच्या निमित्ताने बहीण भावाचं नातं साजरं करणाऱ्या भाऊबिजेबद्दलच्या या तेरा जात्यावरच्या ओव्या घेऊन येत आहोत. या गायल्या आहेत, पुणे जिल्ह्यातल्या नांदगावच्या शाहूबाई कांबळे यांनी.

१० जानेवारी २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

झेंडू सारखी तजेलदार गाणी

शाहूबाईंच्या ओव्या अविस्मरणीय होत्या आणि त्यांचा आवाज अप्रतिम होता. पारीवर सादर करण्यासाठी ओव्यांच्या संग्रहांमधली ध्वनीमुद्रणं ऐकताना आमच्या हाती या ओव्या लागल्या.

१० जानेवारी २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

तिची सात दशकांची जीवनकथा

पुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी दारिद्र्यात जीवन जगतानाही ओव्यांच्या प्रकल्पातील ५०००हून अधिक ओव्या गाऊन या प्रकल्पाला समृद्ध केलं . दोन भागांच्या त्यांच्या कहाणीपैकी या दुसऱ्या भागात त्यांनी आपल्या भूतकाळातील आनंद आणि सततची दु : खे यांच्याविषयीच्या अकरा ओव्या गाईलेल्या आहेत .

१२ ऑक्टोबर २०१७ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

पाच हजार ओव्या आणि गाता गळा

पुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी ओव्यांच्या प्रकल्पातील सर्वात जास्त ओव्या गायल्या आहेत . त्यांची गोष्ट दोन भागांत . या पहिल्या भागात त्यांनी दुरावलेले मुलगे , कधीतरीच ज्यांचे लाड होतात अशा लेकी आणि स्वच्छंदी नवरे यांच्याविषयीच्या दहा ओव्या गायल्या आहेत .

५ एप्रिल २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

जीव लावणारे गणगोत आणि कल्पिलेलं मरण

‘पारी’च्या ‘जात्यावरील ओव्या’ या प्रकल्पातील पुढच्या २३ ओव्या पुणे जिल्ह्यातील राजमाची गावातल्या रेणुका उंबरेने गायल्या आहेत. एका स्त्रीचं वाढत चाललेलं दुखणं आणि त्यात तिचा अंत आणि या सगळ्या काळात तिची भावंडं आणि आईवडील यांच्या शोकाने तिच्या हळव्या मनाला मिळणारे समाधान याबद्दलच्या या ओव्या आहेत.

१० ऑगस्ट २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

भक्ती आणि रुसवा

ओवी प्रकल्पाच्या या भागात आहेत हौसाबाई मांडेकर यांच्या ध्वनिमुद्रित ओव्या आणि छबाबाई सुतार यांचे व्हिडीओ : पुणे जिल्ह्यातल्या या दोघी पंढरपूरच्या विठ्ठल - रखुमाईच्या ओव्या गाताहेत . या आठवड्यात हजारो भक्त पंढरपूरची वारी करत असतील .

४ ऑक्टोबर २०१७ । पारी जीएसपी टीम

लोक-कवींचा विलक्षण ओढा

या आठवड्यात वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या चार ओवीकार ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे आपले आवडते संत आणि आळंदी आणि देहू या त्यांच्या गावांबद्दलच्या दहा ओव्या गातायत

२३ जानेवारी २०१८ । पारी जीएसपी टीम

वारकऱ्याची वारी...

या आठवड्यात जात्यावरच्या ओव्यांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या मुक्ताबाई उभे आणि सीताबाई उभेंनी गायलेल्या पंढरपूरच्या वारीवरच्या पाच ओव्या सादर करत आहोत.

७ जुलै २०१७ । पारी जीएसपी टीम

उन्हाळ्याची सात गाणी

जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या कोळावडे गावच्या खडकवाडीच्या मैत्रिणी उन्हाळ्यातल्या उन्हाविषयीची सात गाणी सादर करतायत

१३ फेब्रुवारी २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

पावसाचा रंग न्यारा

रानातल्या पावसाची ही गाणी पुणे जिल्ह्याच्या लवार्डे गावातल्या अनुसुयाबाई पांदेकर आणि त्यांच्या सूनबाई मंदा पांदेकर यांनी आठवून आठवून गायली आहेत. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी २०१७ च्या एप्रिलमध्ये या ओव्या ध्वनीमुद्रित करण्यात आल्या.

२० ऑगस्ट २०१८ । पारी जीएसपी टीम

गाईच्या लेकरांनी रानात हात जोडले आहेत

पारीवरच्या ओवी संग्रहातल्या या सहा ओव्यांमधल्या एका ओवीतली ही गाईची लेकरं म्हणजे शेतकरी आणि त्याचं जितराब. पुणे जिल्ह्यातल्या निमगाव केतकीच्या फुलाबाई भोंग पाऊस न पडल्यामुळे सारे कसे चिंतेत आहेत ते तर सांगतातच पण पाऊस पडल्यावर कसा आनंद पसरतो तेही मांडतात.

९ फेब्रुवारी २०१८ । पारी जीएसपी टीम

शेतकरी आणि पावसाचं गाणं

‘जात्यावरच्या ओव्या’ या प्रकल्पाच्या या भागात पाऊस आणि शेत, नांगरणी आणि पेरणी या विषयीची गीते (ओव्या) सादर केलेली आहेत. यात जाई साखळे यांच्या आवाजातील आठ ओव्या आणि छबाबाई म्हापसेकर-सुतार यांच्या तीन फिल्म सामील केलेल्या आहेत. दोघी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवार्डे गावाच्या आहेत

३ ऑगस्ट २०१७ । पारी जीएसपी टीम

उन्हाळ्याचं गाणं

पारीवरच्या ओवी संग्रहातल्या या सहा ओव्या ताडकळसच्या गंगुबाई अंबोरेंनी गायल्या आहेत. उन्हाची काहिली, मुलाला ऊन लागत असेल त्याची काळजी याविषयी गातानाच आपल्या पतीला चारित्र्यसंपन्न पत्नी मिळाल्याचा किती अभिमान आहे तेही सांगतात.

१० जुलै २०१७ । पारी जीएसपी टीम

समानतेचा स्वीकार आणि जाती आधारित कामांना नकार

या संपूर्ण महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यसाठी पारीवर आम्ही त्यांच्यावर आणि जाती व्यवस्थेवर रचलेल्या ओव्या प्रकाशित करत आहोत. या मालिकेतल्या शेवटच्या दोन ओव्या बीड जिल्ह्यातल्या मुक्ताबाई जाधव यांच्या.

९ फेब्रुवारी २०१८ । नमिता वाईकर आणि पारी जीएसपी टीम

एक लाख ववी, माझ्या भिमाला पुरंना

या संपूर्ण एप्रिल महिन्यात डॉ. आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) साजरी करण्यासाठी पारीने बाबासाहेबांवरच्या आणि एकूणच जातीव्यवस्थेविषयी रचल्या गेलेल्या ओव्या प्रकाशित केल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायलेल्या ओव्या या मालिकेतल्या शेवटच्या ओव्या आहेत. या १० ओव्यांमध्ये राधाबाई फुले, बुद्ध, (दलितांचा)उद्धार, शिक्षण, एकी, आत्मसन्मान आणि जुन्या रुढींपासून मुक्तीविषयी आणि भीमरावांनी दिलेल्या संदेशाविषयी कथन करत आहेत

५ मे २०१७ । पारी जीएसपी टीम

सारा देश गजर करतोय, 'जय भीम, जय भीम!’

आज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या माजलगावच्या वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंच्या ओव्या आम्ही सादर करत आहोत. या ओव्यांमध्ये आंबेडकरांविषयी वाटणारा अभिमान आणि प्रेम आहे, समृद्धी आणि आनंद आहे. जात व्यवस्था आणि डॉ. आंबेडकरांवर रचलेल्या ओव्या पारी या महिन्यात तुमच्यासाठी सादर करत आहे

२७ एप्रिल २०१७ । पारी जीएसपी टीम

माजलगावची गाणी, महूच्या आठवणी

ओवी संग्रहाच्या या पानात रंगूबाई पोटभरे, वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंच्या तोंडच्या आठ ओव्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. या तिघी जणी बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या भीमनगर या दलित वस्तीत राहत होत्या/आहेत.

१८ एप्रिल २०१७ । पारी जीएसपी टीम

धन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर

१४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. यातल्या या पहिल्या पाच ओव्या बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायल्या आहेत. बुद्ध, भीमराव, धम्म, संघ आणि रमाबाईंवर या ओव्या रचल्या आहेत

५ मे २०१७ । पारी जीएसपी टीम

मुंबईला खाते म्हावरं, कुर्डूसाठी हिंडते वावरं

मावळ तालुक्यातल्या राजमाची गावच्या रेणुका उंबरे सांगतात, “आता पर्यटक येतात. त्यांचं हवं नको बघायला लागतं ना. ओव्या गायला वेळच नाही राहिला”. आपलं गाव सोडून मोठ्या शहरात गेलेल्या बाईची गोष्ट त्यांच्या ओवीत येते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पारीवर प्रकाशित होणाऱ्या या मालिकेतलं या पुढच्या काही ओव्या

१४ एप्रिल २०१७ । पारी जीएसपी टीम

पहाटेचं गाणं अन् जात्यावरची दळणं

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्यात पारीने सुरू केलेल्या या ओवी संग्रहातल्या पुढच्या ओव्या. पहाटेच दळणं केली की लेकरांच्या तोंडी चार घास वेळेत पडतात, सांगतायत यशोदा उंबरे

१४ एप्रिल २०१७ । पारी जीएसपी टीम

जळू जळू तरुणपण, सारा दोष उभारीचा, तरण्या मुलीचा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्यात चालू झालेल्या आमच्या ओवी संग्रहातल्या या पुढच्या ओव्या. महाराष्ट्रातल्या नांदगावच्या कुसुम सोनावणे बाईवरचा जुलुम, पुढ्यात असलेल्या जाचाची तिच्या मनातली भीती आणि बाई म्हणून आपला जन्म वायाच गेला का? हा कायमच सतावणारा प्रश्न त्यांच्या ओव्यांमधून गातात.

१० एप्रिल २०१७ । पारी जीएसपी टीम

गंगा मनाची निर्मळ…

परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस गावच्या गंगूबाई अंबोरे दुःखाने काठोकाठ भरलेल्या ओव्या गायच्या. वर्षांचा एकटेपणा भिनलेला त्यांचा आवाज... ऐकणारा भारावून जात असे

९ मार्च २०१७ । जितेंद्र मैड

जात्यावरची ओवी: जतन करूया एक राष्ट्रीय ठेवा

महाराष्ट्रातल्या खेडोपाडीच्या स्त्रियांनी गायलेल्या एक लाखाहून अधिक ओव्यांपैकी ही पहिली वहिली ओवी ऐका. हा अभूतपूर्व असा 'ग्राइंडमिल साँग्ज प्रोजक्ट - ओवी संग्रह' पारीवर नियमितपणे तुमच्या भेटीला येत राहणार आहे. आतापर्यंत तब्बल ३०,००० ओव्यांचं डिजिटल रेकॉर्डिंग झालं आहे व  ४०,००० ओव्यांचा इंग्रजी अनुवाद पूर्ण झाला आहे. काव्य आणि संगीताचा हा समृद्ध वारसा जतन करण्याच्या या प्रकल्पात १००० गावांमधल्या ३३०२ स्त्री कलावंतांनी सहभाग घेतला आहे

९ मार्च २०१७ । पारी जीएसपी टीम