पुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी दारिद्र्यात जीवन जगतानाही ओव्यांच्या प्रकल्पातील ५०००हून अधिक ओव्या गाऊन या प्रकल्पाला समृद्ध केलं . दोन भागांच्या त्यांच्या कहाणीपैकी या दुसऱ्या भागात त्यांनी आपल्या भूतकाळातील आनंद आणि सततची दु : खे यांच्याविषयीच्या अकरा ओव्या गाईलेल्या आहेत .

“हे काही उमर झाली म्हणून नाहीये. माझं मनच शांत नाही आणि डोकं फिरलंय. त्यामुळे मला ओव्या आठवत नाहीत.” सरुबाई कडू सांगत होत्या. जुलैचा महिना होता; ओवी प्रकल्पासाठी सर्वाधिक ओव्या गणाऱ्या गायिकेला भेटण्यासाठी आम्ही दौंड तालुक्यातील दापोडी गावात आलो आहोत. सरुबाईंनी गायिलेल्या ५०२७ ओव्या या प्रकल्पाच्या मूळ टीमने १९९६ ते २००९ या काळात लिहून काढल्यात.

त्यावेळी त्या वडवली गावात राहत होत्या.१९९३-९४मध्ये, त्यांच्या आणि इतर अनेक गावांतील घरे  मोसे नदीवर बांधलेल्या वरसगाव धरणामुळे पाण्याखाली गेली. इतर अनेकांप्रमाणे सरुबाईंच्या कुटुंबाला देखील घर सोडून दौंड तालुक्यातील पुनर्वसनाच्या वसाहतींत जावं लागलं ,पुण्यापासून ८० किमी. अंतरावर.

दापोडीत आम्ही सरूबाईंना भेटलो तेव्हां त्या एका झोपडीबाहेर बसलेल्या होत्या पण आम्हाला त्यांनी आपला मुलगा दिलीप याच्या पक्क्या घराकडे नेलं. (तिथे आम्ही त्यांनी गायिलेल्या ओव्यांचे ध्वनीमुद्रण केलं. पहा Sarubai: 5000 songs and still singing ).

PHOTO • Binaifer Bharucha

फोटो : डावीकडे दिलीपचे पक्के घर आणि कुटुंबातील बखेड्यानंतर जिथे सरूबाई एकटीच राहायला गेली ती झोपडी

”वडवली गावात कसे सुखात होतो आम्ही. पण धरण बांधलं आणि सगळंच बदललं.” ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना पुनर्वसनाच्या गावात जमिनी देणार असं आश्वासन दिलं होतं पण अनेकांना खूपच कमी दिल्या तर काहींना फक्त घर बांधण्यापुरता तुकडा दिला. शिवाय दापोडीतली जमीन नापीक होती. “आम्हाला मुळापासून सुरवात करावी लागली,” दिलीप सांगत होता, “जमीन पिकाखाली आणण्यासाठी कष्ट तर करावे लागलेच पण आता जे पिकतं त्याने जेमतेम २५% गरजा भागतात आमच्या. बाकी ७५%साठी मजुरी नाहीतर इतर कामे करावी लागतात.”

दिलीप गवंडीकाम करतो आणि त्याची पत्नी चंद्रभागा त्यांचं छोटंसं किराण्याचं दुकान चालवते. नंतर सरूबाईंनी आम्हाला सांगितलं की महिन्याभरापूर्वीपर्यंत ती आपल्या मुला-सुनेबरोबर राहत होती पण अलीकडे झालेल्या कुटुंबातील बखेड्यानंतर तिला त्या घरात राहायला मज्जाव केलाय.
PHOTO • Binaifer Bharucha

वडवली गावात कसे सुखात होतो आम्ही . पण धरण बांधलं आणि सगळंच बदललं .” दिलीपबरोबर बसलेल्या सरूबाई .

दिलीपच्या घरापासून मिनिटभराच्या अंतरावर सरूबाईंचं सध्याचं ‘घर’ आहे – मोडकळीला आलेलं एक विटामातीचं, पत्र्याचं छप्पर असलेलं झोपडं. फक्त एक दार आणि खिडकी नाहीच. ही झोपडी तिच्या एका मुलाची आहे, तो आता वारला; झोपडीची मालकी तिच्या नातवाकडे आहे. इथे ती आता एकटी राहते. दाराशीच जात्याची तळी ठेवलेली आहे. जात्याचा वरचा भाग घरातच उभा करून ठेवलेला दिसतो.

वीस वर्षांपूर्वी, सरूबाईंनी ओव्यांच्या प्रकल्पातील ५००० हून अधिक ओव्या गाऊन या प्रकल्पाला समृद्ध केलं, त्या स्वत: मात्र दारिद्र्यात जगत आहेत, सत्तरीतही १५० रुपये रोजाने शेतात निंदणीला जात आहेत. २०१५ मध्ये तिचा नवरा मारुती वारला आणि तिच्या चार मुलांपैकी दोनच हयात आहेत.

सरूबाईंनी स्वत:च रचलेल्या ओव्या त्या जगल्या आणि आजही जगत आहेत. इथे दिलेल्या ओव्यांत त्यांचेच अनुभव प्रकटले आहेत – काही आनंदाचे प्रसंग, तिच्या मुलाचा लग्नसोहळा किंवा दु;खाचे क्षण जशी कुटुंबातली भांडणं. पण या ओव्या तिला आता सहज आठवत नाहीत. “ओवीतला एक मुख्य शब्द आठवला तर मग बाकी सगळं मला आठवतं. पूर्वी इतक्या साऱ्या  ओव्या माझ्या डोक्यात ठसलेल्या होत्या की झरा फुटावा तशा त्या बाहेर यायच्या.”

PHOTO • Binaifer Bharucha

सरूबाईंच्या झोपडीच्या दाराशीच ठेवलेली जात्याची तळी आणि घरातच उभा करून ठेवलेला जात्याचा वरचा भाग

त्या बोटांनी आपली कानशिलं चोळतात, नजर हवेतच कुठेतरी स्थिरावलेली, जणू हरवलेले शब्द शोधतेय. मग जेव्हा ते सापडतात तेव्हा त्यांचा चेहरा उजळतो आणि आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु करतो. इथे सरूबाईंनी गायिलेल्या ११ ओव्या आहेत.

मोठा झालेला मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईशी कसा वागतो हे त्यातल्या पहिल्या तीन ओव्यांत सांगितलंय; त्याच्या जन्माच्या वेळी तिने किती दु:ख आणि वेदना सोसल्या होत्या याचं त्यांत वर्णन आहे.

त्या ओव्यांत सरूबाई त्याला सांगतात की आपल्या आईला वेडी म्हणू नको, स्वार्थी समजू नकोस, तुझ्या जन्माच्या वेळी तिच्या जिवाचा भरवसा सुद्धा नव्हता नाळ तोडायला सुद्धा किती कष्ट पडले होते! आणि काय रे, तुझ्या जन्माच्या वेळी तुझी बायको होती का?

पुढच्या चार ओव्या एकमेकांशी घट्ट नातं असलेल्या बहिणभावंडांविषयीच्या आहेत, जणू एका झाडाची दोन संत्री! पण जेव्हा परकी कुणी – भावजय – येते तेव्हा ती दोघा भावंडांत फूट/अंतर पाडते. रस्त्याने जाताना कुणी अनोळखी माणूस त्रास देईल तर तू आपली वाट बदलून चालू लाग असा सल्ला आई आपल्या लेकीला देते. गावच्या रस्त्यावरून बहिण-भाऊच चाललेत पण आईला चिंता वाटते कारण लोकांना टीका करायला आवडतं आणि म्हणून ती दोघांच्या परतण्याची वाट पाहत आहे.

PHOTO • Binaifer Bharucha

तंबाखू सोडली का , असं विचारल्यावर हसत हसत सरूबाई सांगतात की , ‘ खरंच मी सोडलीये .’

त्यानंतरच्या चार ओव्या मुलाचं लग्न आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आहेत. जात्याला देव म्हणून सुपारी बांधली आहे आणि त्यावर दळलेली हळद नवऱ्या मुलाला लावताहेत. मांडवाच्या दाराशी उभी त्याची आई आपल्या हिऱ्यासारख्या लेकाला सांगतेय की त्या हळदीमुळे माझ्या लुगड्याच्या निऱ्या पिवळ्या झाल्यात. नवी सून त्या आईची भाचीच आहे, तिच्या भावाची लेक; तिला कामं सांगणं सासूला कठीण वाटतं. त्यामुळे ती सुनेला अगदी हलकी, कमी कष्टाची कामं सांगतेय – जसं दुधाला विरजण लावणं! आता तिला वाटतंय की यापेक्षा परघरची मुलगी सून म्हणून आणणं बर झालं असतं.

व्हिडिओ : सरूबाई गातात , “ रस्त्यात जर कुणी अनोळखी माणूस छेड काढू पाहील तर माझ्या लेकी तू रस्ता बदलून पुढे जा .”

सरूबाईंचं गाणं झाल्यावर मूळ ओवी प्रकल्पातील एक सदस्य जितेंद्र मैड यांनी त्यांना विचारलं की तुम्ही तंबाखू सोडली का आणि त्यांनी होकारार्थी मन हलवली. “खरंच?” मैड यांनी आश्चर्याने विचारलं. “मी खरंच सोडलीये!” त्या हसत सांगतात आणि त्यांचं ते हसू त्यांच्या डोळ्यात शिरतं आणि काही काळासाठी तरी साऱ्या चिंता पुसून टाकतं.

आपल्या माऊलीला, नको म्हणू येडी माता
जलमाच्या येळी नव्हता तिचा भरवसा

आपल्या मावलीला, नको म्हणू येडी येडी
जलमाच्या वेळी, नव्हत तुटलत नाळ

आपल्या मावलीला, नको म्हणू केगामती
जलम देतावेळी तुझी अस्तुरी कुठ होती

बहिण भावयंड, एका झाडायाची संतर
आली परनायाची नार, हिन पाडील अंतर

पराया पुरुष अंगावर आला नीट
सांगते बाई तुला वाकडी कडं वाटं

वाट चालले, एक बहिण एक भाऊ
मावली बया बोल, आहे निंदखोर गाव

रस्त्यानी चालली, बहिण भावंड लोभाची
मावली बघे वाट, बंधू आपल्या दोघाची

जात्या इसवरा, तुला सुपारी बांधली
बाळाइला माझ्या, नवर्या हळद लागली

मांडवाच्या दारी, पिवळ्या झाल्या निर्या
वाणीच माझ बाळ, तुला हळद लागू हिर्या

भाची मी करते सुन, काम सांगना याची चोरी
सांगते बाई तुला, लेक परनायाची बरी

बंधू मी करते व्याही, भाची मी करते सून
काम सांगते लहान लहान, लाव दुधाला मोरवण

āpalyā māūlīlā nakō mhaṇū yēḍī matā
jalamācyā yēḷī ticyā jhālyā nhāyā

āpalyā māvalīlā nakō mhaṇū yāḍi yāḍi
jalamācyā vēḷī navhata tuṭalata nāḷa

āpalyā māvalīlā nakō mhaṇū kēgāmatī
jalama dētāvēḷī tujhī asturī kuṭha hōtī

bahiṇa bhāvayaṇḍa ēkā jhāḍāyācī santara
ālī paranāyācī nāra hina pāḍīla antara

parāyā puruṣa aṅgāvara ālā nīṭa
sāṅgatē bāī tulā vākaḍī kada vāṭa

rastyānī cālalē ēka bahiṇa ēka bhāū
māvalī bayā bōla āhē nindakhōra gāva

rastyānī cālalī bahiṇa bhāvaṇḍa lōbhācī
māvalī baghē vāṭa bandhū āpalyā dōghācī

jātyā isavarā tulā supārī bāndhalī
bāḷāilā mājhyā navaryā haḷada lāgalī

māṇḍavācyā dārī pivaḷyā jhālyā niryā
vāṇīca mājha bāḷa tulā haḷada lāgū hiryā

bhācī mī karatē suna kāma sāṅganā yācī cōrī
sāṅgatē bāī tulā lēka paranāyācī barī

bandhū mī karatē vyāhī bhācī mī karatē sūna
kāma sāṅgatē lahāna lahāna lāva dudhālā mōravaṇa


Don’t call your mother a stupid mother
At the time of your birth, her life was in danger

Don’t call your mother “stupid woman, stupid woman”
At the time of your birth, the umbilical cord was difficult to cut

Don’t call your mother a selfish foolish woman
At the time of your birth, where was your wife

Brother and sister are like oranges from the same tree
She [sister-in-law] came from another family, and caused the rift

A stranger may misbehave on the street
I tell you O daughter, take a detour [and avoid such a man]

Even when a sister and brother walk together
Mother says the villagers criticise it

An affectionate sister and brother walk together
Our mother, dear brother, awaits us both

God Grindmill, I tie an areca nut to you
Haldi [turmeric] is applied to my son, the bridegroom

At the entrance of the marriage pandal
The pleats of my sari have become yellow with haldi
My dear son, my diamond, let them apply haldi to you

I make my niece my daughter-in-law, difficult to ask her to work
I tell you, woman, better [for son] to marry a girl from outside the family

I make my brother my vyahi*, I make my niece my daughter-in-law
I give her small jobs to do, I tell her to culture milk to make curds

Note: Vyahi: son’s or daughter’s father-in-law


Sarubai Kadu two decades ago (left), and now
PHOTO • Bernard Bel ,  Binaifer Bharucha

सरुबाई कडू वीस वर्षांपूर्वी (डावीकडे) आणि आता


कलाकार : सरूबाई कडू

गावः दापोडी

तालुकाः दौंड

जिल्हा : पुणे

जात : मराठा

वय : ७०

मुलः ४ मुलगे (२ हयात)

व्यवसायः शेतकरी, शेतमजूर

दिनांकः या ओव्यांचं ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग २४ जुलै, २०१७ रोजी करण्यात आलं. ओव्या १९९६ ते २००९ दरम्यान हाताने उतरून घेण्यात आल्या होत्या.

फोटोः बिनायफर भरुचा आणि संयुक्ता शास्त्री

पोस्टरः श्रेया कात्यायनी

मराठी अनुवादः छाया देव

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo