“आम्ही आमचा दसहरा नाच सादर करणार आहोत,” इतवारी राम मच्छिया बैगा सांगतात. “हा दसऱ्याला सुरू होतो आणि त्यानंतर पुढचे तीन चार महिने, फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू राहतो. दसरा साजरा केल्यानंतर आम्ही आमच्या बैगा लोकांच्या गावांना जातो आणि रात्रभर नाचतो,” छत्तीसगड बैगा समाज या संघटनेचे अध्यक्ष असलेले इतवारी राम सांगतात.

साठी पार केलेले इतवारी राम शेती करतात आणि कबीरधाम जिल्ह्याच्या पंडरिया तालुक्यातल्या अमनिया गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या मेळ्यातल्या इतरांसोबत ते राज्य शासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य उत्सवाच सामील होण्यासाठी रायपूरला आले आहेत.

बैगा समुदायाचा समावेश विशेश बिकट स्थिती जगणाऱ्या आदिवासी समूहांमध्ये केला जातो. छत्तीसगडमध्ये असे सात आदिवासी समूह आहेत. मध्य प्रदेशातही बैगांची वस्ती आहे.

व्हिडिओ पहाः छत्तीसगडच्या बैगांचा नाच

“साधारणपणे ३० जण बैगा नाच करतात. आमच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघंही असतात. गावात तर नाचणाऱ्यांची संख्या शंभरच्या पुढे जाते,” इतवारीजी सांगतात. ते सांगतात की जर पुरुषांचा गट एखाद्या गावी गेला तर तो तिथल्या बायांच्या गटासोबत नाच करतो. त्या बदल्यात त्या गावातला पुरुषांचा गट या गटाच्या गावी येतो आणि तिथल्या बायांच्या गटासोबत नाच करतो.

“गाणं आणि नाचणं आम्हाला कायमच आवडतं,” याच्य जिल्ह्यातल्या कावरधा तालुक्यातली अनिता पंडरिया म्हणते. ती इतवारीजींच्या गटाबरोबर नाच मेळाव्याला आली होती.

नाचासोबत गीतामधून काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं देखील दिली जातात.

बैगा नाचाची प्रथा सगळ्या बैगा गावांमध्ये आढळून येते. पर्यटकांनाही त्यांच्या नाचाचं मोठं आकर्षण असतं. हे नाचणारे गट सांगतात की कधी कधी त्यांना लोकप्रिय पर्यटनस्थळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपुढे नाचण्यासाठी बोलावलं जातं. पण या समाजाचं असं म्हणणं आहे की त्यांच्या कलेचा योग्य मोबदला त्यांना दिला जात नाही.

शीर्षक छायाचित्रः गोपीकृष्ण सोनी

Purusottam Thakur

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker and is working with the Azim Premji Foundation, writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Video Editor : Urja

Urja is a Video Editor and a documentary filmmaker at the People’s Archive of Rural India

Other stories by Urja