Mumbai, Maharashtra
|THU, JUL 28, 2022
जात्यावरची ओवी प्रकल्पः आतापर्यंतचे सर्व लेख
एक लाखांहून जास्त ओव्यांचा हा अद्वितिय असा संग्रह आहे. महाराष्ट्राच्या गावपाड्यातल्या बायांनी गायलेल्या या ओव्या, काही ध्वनिमुद्रित केलेल्या, काही लिहून घेतलेल्या. त्या ओव्यांचे अनुवाद आणि त्या गाणाऱ्या बायांच्या कहाण्या. ओवीचे अनेक पैलू दाखवणाऱ्या या लेखांचा संग्रह म्हणजे ही लेखमाला. आपल्या रोजच्या जगण्याबद्दल, पुरुषसत्ता, जात, संतकवी, इतिहासातल्या अनेक घटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर पुरुष आणि इतरही विषयांवरच्या ओव्या ऐका आणि वाचा
Author
32. ‘बाई भीमरायानी आकाश मातकुला केला’
जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकापुष्पात मुळशी तालुक्यातल्या कुसुम सोनवणे आणि त्यांच्या मैत्रिणी बाबासाहेबांनी समानतेसाठी आणि जातीअंतासाठी जो लढा दिला त्याची स्मृती जागवणाऱ्या १४ ओव्या गातायत
27. पक्के पैलवान अन् सख्ख्या मायलेकी
पैलवानाची ताकद, कौशल्य आणि आडदांड देहाचं श्रेय त्याच्या आईला द्यावं का? नक्कीच. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नांदगावच्या शाहू कांबळे त्यांच्या ओव्यांमध्ये तेच तर गातायत. जात्यावरची ओवी संग्रहातल्या या ओव्यांमध्ये त्या मामा भाच्यांच्या कुस्तीबद्दल सांगतायत.
26. ग्रामीण बायांच्या गाण्यात जिवंत असणारे बाबासाहेब
पुणे जिल्ह्यातल्या लव्हार्डे गावच्या लीलाबाई शिंदेंनी बाबासाहेब आंबेडकरांसाठी काही ओव्या गायल्या आहेत. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पारी त्यांचं स्मरण करत आहे.
17. लोक-कवींचा विलक्षण ओढा
या आठवड्यात वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या चार ओवीकार ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे आपले आवडते संत आणि आळंदी आणि देहू या त्यांच्या गावांबद्दलच्या दहा ओव्या गातायत
9. एक लाख ववी, माझ्या भिमाला पुरंना
या संपूर्ण एप्रिल महिन्यात डॉ. आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) साजरी करण्यासाठी पारीने बाबासाहेबांवरच्या आणि एकूणच जातीव्यवस्थेविषयी रचल्या गेलेल्या ओव्या प्रकाशित केल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायलेल्या ओव्या या मालिकेतल्या शेवटच्या ओव्या आहेत. या १० ओव्यांमध्ये राधाबाई फुले, बुद्ध, (दलितांचा)उद्धार, शिक्षण, एकी, आत्मसन्मान आणि जुन्या रुढींपासून मुक्तीविषयी आणि भीमरावांनी दिलेल्या संदेशाविषयी कथन करत आहेत
8. सारा देश गजर करतोय, ‘जय भीम, जय भीम!’
आज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या माजलगावच्या वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंच्या ओव्या आम्ही सादर करत आहोत. या ओव्यांमध्ये आंबेडकरांविषयी वाटणारा अभिमान आणि प्रेम आहे, समृद्धी आणि आनंद आहे. जात व्यवस्था आणि डॉ. आंबेडकरांवर रचलेल्या ओव्या पारी या महिन्यात तुमच्यासाठी सादर करत आहे
6. धन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर
१४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. यातल्या या पहिल्या पाच ओव्या बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायल्या आहेत. बुद्ध, भीमराव, धम्म, संघ आणि रमाबाईंवर या ओव्या रचल्या आहेत
5. मुंबईला खाते म्हावरं, कुर्डूसाठी हिंडते वावरं
मावळ तालुक्यातल्या राजमाची गावच्या रेणुका उंबरे सांगतात, “आता पर्यटक येतात. त्यांचं हवं नको बघायला लागतं ना. ओव्या गायला वेळच नाही राहिला”. आपलं गाव सोडून मोठ्या शहरात गेलेल्या बाईची गोष्ट त्यांच्या ओवीत येते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पारीवर प्रकाशित होणाऱ्या या मालिकेतलं या पुढच्या काही ओव्या
4. पहाटेचं गाणं अन् जात्यावरची दळणं
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्यात पारीने सुरू केलेल्या या ओवी संग्रहातल्या पुढच्या ओव्या. पहाटेच दळणं केली की लेकरांच्या तोंडी चार घास वेळेत पडतात, सांगतायत यशोदा उंबरे
3. जळू जळू तरुणपण, सारा दोष उभारीचा, तरण्या मुलीचा
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्यात चालू झालेल्या आमच्या ओवी संग्रहातल्या या पुढच्या ओव्या. महाराष्ट्रातल्या नांदगावच्या कुसुम सोनावणे बाईवरचा जुलुम, पुढ्यात असलेल्या जाचाची तिच्या मनातली भीती आणि बाई म्हणून आपला जन्म वायाच गेला का? हा कायमच सतावणारा प्रश्न त्यांच्या ओव्यांमधून गातात.
2. गंगा मनाची निर्मळ…
परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस गावच्या गंगूबाई अंबोरे दुःखाने काठोकाठ भरलेल्या ओव्या गायच्या. वर्षांचा एकटेपणा भिनलेला त्यांचा आवाज... ऐकणारा भारावून जात असे
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/जात्यावरची-ओवी-प्रकल्प-आतापर्यंतचे-सर्व-लेख



















































