वेगळी लैंगिकता, साधी माणसं, रोजचं जगणं

जून हा प्राइड महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पारी ग्रंथालय महानगरांच्या झगमगाटापासून दूर गावपाड्यात राहणाऱ्या वेगळी लैंगिकता असलेल्या लोकांच्या रोजच्या जगण्याचा मागोवा घेत आहे. वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी देखील वाट्याला येणारा नकार आणि भेदभावाच्या या कहाण्या आहेत

१५ जानेवारी २०२४| पारी ग्रंथालय

धरमशालातला आत्मसन्मानाचा 'प्राइड' मोर्चा

हिमाचल प्रदेशात आयोजित केलेल्या पहिल्या वहिल्या प्राइड मोर्चामध्ये लोक एकत्र आले आणि त्याद्वारे हरतऱ्हेचा लैंगिकता असलेल्या व्यक्तींच्या हक्कांचं समर्थन करण्यात आलं

७ जून २०२३| श्वेता डागा

ट्रान्स समुदायाचं जग रंगमंचीय अवकाशात

नाटकामध्ये काम करण्याची संधी ट्रान्स व्यक्तींना क्वचितच मिळते. ३१ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या इंटरनॅशनल डे ऑफ ट्रान्सजेण्डर व्हिजिबिलिटीच्या निमित्ताने ट्रान्स समुदायाचा भेदभावाच्या विरोधातील लढा आणि या समुदायाच्या जगण्याभोवती गुंफलेल्या संदकारंग या नाट्यप्रयोगाची काही क्षणचित्रं

३१ मार्च २०२३| एम. पळनी कुमार

महानगरात प्रेमापार…

महाराष्ट्राच्‍या एका खेड्यातल्‍या एका तरुण मुलीची आणि एका पारलिंगी, ट्रान्‍सपुरुषाची ही प्रेमकथा सामाजिक स्‍वीकार, न्‍याय, स्‍वतःची ओळख आणि भविष्य यासाठी त्‍यांनी एकत्रितपणे दिलेल्‍या झगड्याची

१० जानेवारी २०२३| आकांक्षा

' भारतासाठी काही मला परत खेळता आलं नाही’

पश्चिम बंगालच्या बोनी पालला इंटरसेक्स लैंगिकतेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर फूटबॉल खेळता आला नाही. २२ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय इंटरसेक्स मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने बोनी आपली लैंगिक ओळख आणि आयुष्यात केलेला संघर्ष याबद्दल सांगतोय

२८ एप्रिल २०२२ | रिया बहल

मदुरैच्या तृतीयपंथी कलावंत: शोषित, एकाकी, कफल्लक

लोकांनी छळलं, घरच्यांनी हाकलून लावलं, उपजीविकेची साधनं उरली नाहीत – तमिळनाडूतील तृतीयपंथी लोककलावंतांना दुष्काळात तेरावा महिनाच सोसावा लागलाय

१० ऑगस्ट २०२१ | एस. सेन्तळिर

मदुरैतील तृतीयपंथी लोककलावंतांची व्यथा

महामारीमुळे तमिळनाडूतील अनेक लोककलावंतांचं जीवन उद्ध्वस्त झालं असून त्यातही ट्रान्सजेन्डर किंवा तृतीयपंथी महिला कलावंतांना सर्वांत जास्त फटका बसलाय – हाती काहीच काम किंवा कमाई नाही, आणि शासनाकडून अनुदान किंवा लाभही मिळत नाही

९ ऑगस्ट २०२१ | एस. सेन्तळिर

' आम्ही भूत असल्यासारखं लोक आमच्याकडे पाहतात’

इचलकरंजीतल्या तृतीयपंथी व्यक्तींना सगळीकडे भेदभावाला सामोरं जावं लागतं – घरात, शाळेत, घर मिळण्यात आणि रस्त्यावरही. सामान्य माणूस म्हणून घेण्यासाठी आणि थोडी फार प्रतिष्ठा असलेलं काम मिळवण्यासाठी त्यांचा झगडा सुरू आहे

१७ डिसेंबर २०१८ | मिनाज लाटकर

' कधी तरी हा समाज आम्हाला स्वीकारेल’

या वर्षी २५ एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या तमिळ नाडूतल्या कुवागम उत्सवात अनेक हिजडे सहभागी होतात. ते इथे येतात ते गायला, नाचायला, रडायला आणि प्रार्थना करायला – पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीही त्यांना बहिष्कृत करेल या भीतीशिवाय जगायला

१९ जानेवारी २०१९| रितायन मुखर्जी

Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے