१९ ऑगस्ट, जागतिक छायाचित्रण दिन. याच दिवशी आम्ही कर्नाटकातल्या बंदीपूर राष्ट्रीय उद्यानामधली काही अफलातून छायाचित्रं सादर करणार आहोत. इथलं वन, वन्यजीवन पहा पण पर्यटकांच्या किंवा अनुभवी छायाचित्रकारांच्या नाही तर अभयारण्याच्या भोवती राहणाऱ्या स्थानिकांच्या नजरेतून.

दुसऱ्याच्या कॅमेऱ्यात कैद होण्यापेक्षा लोक छायाचित्रांमधून आपली स्वतःची कहाणी कशी सांगू शकतात हे या फोटो-निबंधातून आम्हाला अधोरेखित करायचंय. विविध माध्यमांवर वन्यजीवांच्या अतिशय मोहक फोटोंची बरीच रेलचैल आहे पण जगातल्या काही धोकादायक तसंच धोक्यात असलेल्या प्राण्यांबरोबर आपलं आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या गोष्टी आहेत का तिथे? जिथे मानव आणि प्राणी दोघंही स्वतः भक्ष्य ठरण्याची किंवा दुसऱ्याला भक्ष्य करण्याची शक्यता आहे, त्या परिसरातलं जिणं नेमकं कसं असतं बरं? त्यांच्या गोष्टी कुणी सांगाव्या?

या ऊर्मीतूनच ही बंदीपूरची बखर तयार झाली. २०१५-१६ दरम्यान सहा महिन्यांच्या काळात सहा जणांनी – शेतकरी, मजूर, वन्यजीव तज्ज्ञ, आदिवासी आणि इतर – बंदीपूर अभयारण्याच्या वेशीवरचं आपलं रोजचं जगणं आणि अनुभव नोंदवून ठेवले. वाघ, बिबटे आणि हत्तींचा हा संपूर्ण जगातला एक महत्त्वाचा अधिवास आहे. शिवाय इतरही लक्षणीय जीव आहेत इथे.

या दस्तावेजाच्या निर्मितीतल्या अनेकांनी या आधी कधीही कॅमेरा वापरला नव्हता. एकमेकांना भेटून वन्यजीवांशी आपला कसा संबंध येतो – कामाच्या निमित्ताने, सहज खेळताना किंवा अचानक न ठरवता – याचे आपापले अनुभव त्यांनी मांडले. त्यांच्या निबंधातून दिसून येतं की बंदीपूरमध्ये समाजजीवनाचे अनेक पदर आहेत. हे जग लोकांसमोर आणणं, त्याचा आवाज ऐकणं ही देखील या प्रकल्पामागची प्रेरणा होती.

यातल्या काही छायाचित्रकारांच्या दृष्टीने वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली शासन इथल्या समुदायांच्या जमिनी पूर्वापारपासून कशा लाटत आलं आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजे बंदीपूर. काहींच्या नजरेत बंदीपूरसारखे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी विलग केलेले परिसर हा भारतातलं अस्तंगत होणारं वन्यजीवन वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यांचे फोटो आपल्याला वन्यजीव संवर्धनाच्या संदर्भात सामाजिक न्यायाचा विचार करायला भाग पाडतात. इतकंच नाही तर भविष्यामध्ये संवर्धनाचा विचार करताना ‘तज्ज्ञ’ म्हणून कुणाचं बोट पकडायचं तेही हे फोटो आपल्याला सांगतात.

PHOTO • Jayamma Belliah

जयाम्मा बलय्याः जेनु कुरुबा आदिवासी असणारी जयाम्मा बलय्या बंडीपूर अभयारण्याच्या वेशीवर अनंजीहुंडी गावात राहते. देशातला हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प. जयाम्मा घरकामगार म्हणून काम करते आणि आपलं घर चालवते.

तिची गोष्ट वाचाः जयाम्माला बिबट्या दिसला तेव्हा

PHOTO • Nagi Shiva

नागी शिवाः देशातला एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प म्हणजे बंडीपूर. या अभयारण्याच्या वेशीवर लोक्केरे गावात नागी शिवा राहते. ती घरकामगार म्हणून काम करते आणि आपलं घर चालवते.

तिची गोष्ट वाचाः 'आमच्यापाशी आहेत टेकड्या नि वनं आणि आम्ही इथे राहतो'

PHOTO • K. Sunil

के. सुनील सोलिगा आदिवासी आहे. तो कर्नाटकाच्या बंडीपूर अभयारण्याच्या कनियानपुरा कॉलनीत राहतो. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांबरोबर तो वाटाड्या म्हणून काम करतो.

त्याची गोष्ट वाचाः Home with the harvest in Bandipur

PHOTO • K.N. Mahesha

के. एन. महेश प्रशिक्षित निसर्ग वैज्ञानिक आणि शेतकरी असून तो कुणगाहळ्ली गावात राहतो. कर्नाटकातल्या बंडीपूर अभयारण्यात तो काम करतो.

त्याची गोष्ट वाचाः बंडीपूरचा प्रिन्स जेव्हा समोर उभा ठाकतो

PHOTO • M. Indra Kumar

एम. इंद्र कुमार बंडीपूर अभयारण्याजवळील मंगला गावात राहतात. गावातल्या एका वन्यजीवविषयक भेटवस्तूंच्या दुकानात ते व्यवस्थापक म्हणून काम करतात.

त्यांची गोष्ट वाचाः ‘That is where the leopard and tiger attack’

PHOTO • N. Swamy Bassavanna

एन. स्वामी बसवण्णा शेतकरी आहेत. देशातला महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असणाऱ्या बंडीपूर अभयारण्याच्या वेशीवर ते राहतात.

त्यांची गोष्ट वाचाः ‘This calf went missing after I took this photo’

कर्नाटकाच्या मंगला गावातील मरिअम्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या समन्वयातून जॅरेड मार्ग्युलिस यांनी हा उपक्रम घडवून आणला आहे. फुलब्राइट नेहरू स्टूडंट रिसर्च ग्रांट (२०१५-१६), बाल्टिमोर काउंटी येथील मेरीलँड विद्यापीठाची ग्रॅज्युएट असोसिएशन रिसर्च ग्रांट आणि मरिअम्मा चॅरिटेंबल ट्रस्टने केलेल्या सहकार्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या छायाचित्रकारांचा सहभाग, उत्साह आणि कष्टांमुळे हे शक्य झालं. बी. आर. राजीव यांनी मजकुराचा अनुवाद केला. त्यांची मदत अनमोल आहे. सर्व फोटोंचे स्वामित्व हक्क पारीच्या क्रिएटिव्ह कॉमन्स धोरणानुसार केवळ छायाचित्रकारांकडेच आहेत. त्यांचा वापर किंवा पुनःप्रकाशन यासाठी पारीशी संपर्क साधावा.

Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے