आदिवासींच्या स्वतःच्या समस्या आहेत ना. पण त्या एखाद्या समूहाच्या संस्कृतीत कशा काय झिरपल्या ते आधी पहायला पाहिजे. उदा. आधुनिक शिक्षणाने एक नवा पायंडा पडू लागला आहे, आणि आमच्या अनेक समस्या खरं तर या नवशिक्षित समाजामुळे सुरू झाल्या आहेत. आज माझ्या गावातला शिक्षक या गावाच्या मातीत आपलं घर बांधत नाही. तो राजपिपलामध्ये जमीन विकत घेतो. तरुणाईला विकासाच्या चकचकीत कल्पनांची भुरळ पडली आहे. ते पूर्वापारपासून चालत आलेले रिवाज पाळत नाहीत. त्यांना लाल भात पचत नाही. शहरातल्या नोकरीमुळे मिळणारी पत त्यांना चाखून पहायची आहे. आमच्या समाजात अशी मिंधेगिरी, गुलामगिरी कधीच नव्हती. आज, त्यांच्याकडे शिक्षण आहे, नोकरी आहे, तरीही शहरात त्यांच्यासाठी जागा नाहीये. तिथे लोक त्यांना वाळीत टाकतात. आणि मग हा असा संघर्ष नको म्हणून ते स्वतःची ओळखच लपवू पाहतात. आदिवासींच्या अस्मितेचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्या गाभ्याशी हा संघर्षच तर आहे.

देहवाली भिलीमध्ये रचलेली कविता खुद्द जितेंद्र वसावा यांच्या आवाजात ऐका


कवितेचा इंग्रजी अनुवाद प्रतिष्ठा पंड्या यांच्या आवाजात ऐका


असभ्य जाहिर मोव

जेहेने मां देसू
आखानारा वाइक सभ्य लोकुहुँ
आमां मोवाँ चाडाल असभ्य जाहिर की देदोहो
आन आमां लोक
सोवताल असभ्य अनुभव केरां लाग्येहें

तेहेने मां याहाकी मोवाँ फुलाहने
आथलां से बियेहे
मां बाहकाले मोवाँ नावूं ज पोसोन्द नाहा
तेहेए माँ पावुह चौठाम मोवु चाळ नेंय
तुलसी सोड लागविन
सोवताल सभ्य अनुभव की रियोहो
जेहेने मां देसू
आखानारा वाइक सभ्य लोकुहुँ
आमां मोवाँ चाडाल असभ्य जाहिर की देदोहो
आन आमां लोक
सोवताल असभ्य अनुभव केरां लाग्येहें

तेहे अध्यात्माम जीवनारा मां लोक
चाडूंरी गोठया केराँ
खाडील पूजनीय मानुलुमें
पाहाडूं पूज्या केरुलु से
डायाँ वाटिप चालीने
तोरतील याहाकी आखुलू से
काहींक नाज अनुभोव की रियेहें
आन सोवता ओळोख दोबावीन
आसभ्यता की मुक्त वेरां
केडो ईसाई बोणी रियोह, केडो हिंदू
केडो जैन ता केडो मुसलमान बोणी रियाहा
जेहेने मां देसू
आखानारा वाइक सभ्य लोकुहुँ
आमां मोवाँ चाडाल असभ्य जाहिर की देदोहो
आन आमां लोक
सोवताल असभ्य अनुभव केरां लाग्येहें

बाजारुल नफरत केआनारा मां लोक
बाजारुकी को पोई रियाहा
सभ्यताआ जेबी काय चीज
सोवता आथुमेंने सुटां नांह देता
असभ्यता बाठांसे मोड़ी होद
"एखोलकुंडाय"
बाठें माहें हिकी रियेहें
"स्व" ने "समाज" नेंय
"स्व" ने "स्वार्थ" होमजी रियेहें
जेहेने मां देसू
आखानारा वाइक सभ्य लोकुहुँ
आमां मोवाँ चाडाल असभ्य जाहिर की देदोहो
आन आमां लोक
सोवताल असभ्य अनुभव केरां लाग्येहें

पोता भाष्याम महाकाव्य, गाथा आखनारें
मा लोक पोयराहनें पोता भाष्या सोडीन
अंग्रेजी हीकवां लाग्येहें
मातृभूमि चाळ, पान, खाड्या, पाहाड़
पायरां होपनाम नाह आवतें
आमां बाठें ज पोयरें अमेरिका, इंग्लैंडु
होपने हीइ रियेहें
जेहेने मां देसू
आखानारा वाइक सभ्य लोकुहुँ
आमां मोवाँ चाडाल असभ्य जाहिर की देदोहो
आन आमां लोक
सोवताल असभ्य अनुभव केरां लाग्येहें।

मोहच ठरवला असभ्य

माझ्याच देशातल्या
काही तथाकथित उच्चभ्रूंनी
मोहालाच असभ्य ठरवलं,
अन् माझी माणसं
स्वतःलाच असभ्य समजू लागली हो.

तेव्हापासून, माझी आई
मोहाच्या फुलांना स्पर्श करायलाही चाचरतीये.
वडलांनी तर मोहाचं नावच टाकलंय.
घराच्या अंगणातला मोह नाही,
छोटीशी तुळस पाहून
भावाला हायसं वाटू लागलंय.
माझ्याच देशातल्या
काही तथाकथित उच्चभ्रूंनी
मोहालाच असभ्य ठरवलं,
अन् माझी माणसं
स्वतःलाच असभ्य समजू लागली हो.

माझ्या माणसांचं जगणं
सृष्टीशी तदात्म होतं.
पण आज तेच
आपल्या नदीला पवित्र मानायला कचरतायत.
डोंगरांची पूजा करताना घाबरतात.
आणि या धरणीमातेला
आई म्हणण्याचं त्यांचं धाडसच होत नाही.
खरी ओळख लपवत,
आपल्या असंस्कृत अस्तित्वापासून सुटका करण्यासाठी
ते चोखाळतायत वाट ख्रिश्चन धर्माची.
कुणी होतंय हिंदू,
कुणी जैन, तर कुणी मुसलमान.
माझ्याच देशातल्या
काही तथाकथित उच्चभ्रूंनी
मोहालाच असभ्य ठरवलं,
अन् माझी माणसं
स्वतःलाच असभ्य समजू लागली हो.

बाजारपेठेचं वावडं असणारे माझे लोक
आज आपली घरं त्या बाजारांसाठी खुली करतायत.
संस्कृतीचा सुगंध असणारी कोणतीच गोष्ट
त्यांना हातातून निसटू द्यायची नाहीये.
संस्कृती सर्वात मोठी देणगी आहे, व्यक्तीवाद.
सगळे जण शिकतायत, ‘मी.’
त्यांना कळतो आहे, स्व,
समाज नाही, स्व.
स्वतः या अर्थाचा स्व.
माझ्याच देशातल्या
काही तथाकथित उच्चभ्रूंनी
मोहालाच असभ्य ठरवलं,
अन् माझी माणसं
स्वतःलाच असभ्य समजू लागली हो.

गाण्यातून गोष्टी सांगणारी माझी माणसं,
आपल्याच बोलीत महाकाव्यं रचणारे माझे लोक
आज विसरू लागलेत आपली भाषा.
इंग्रजी शिकवतायत मुलांना.
आणि त्यांच्या मुलांच्या स्वप्नात येतात,
झाडं, वृक्षा, नद्या, डोंगरदऱ्या
इंग्लंड आणि अमेरिकेतल्या.
माझ्याच देशातल्या
काही तथाकथित उच्चभ्रूंनी
मोहालाच असभ्य ठरवलं,
अन् माझी माणसं
स्वतःलाच असभ्य समजू लागली हो.

देहवाली भिली आणि हिंदीतून इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पंड्या

Poem and Text : Jitendra Vasava

گجرات کے نرمدا ضلع کے مہوپاڑہ کے رہنے والے جتیندر وساوا ایک شاعر ہیں، جو دیہوَلی بھیلی میں لکھتے ہیں۔ وہ آدیواسی ساہتیہ اکادمی (۲۰۱۴) کے بانی صدر، اور آدیواسی آوازوں کو جگہ دینے والے شاعری پر مرکوز ایک رسالہ ’لکھارا‘ کے ایڈیٹر ہیں۔ انہوں نے آدیواسی زبانی ادب پر چار کتابیں بھی شائع کی ہیں۔ وہ نرمدا ضلع کے بھیلوں کی زبانی مقامی کہانیوں کے ثقافتی اور تاریخی پہلوؤں پر تحقیق کر رہے ہیں۔ پاری پر شائع نظمیں ان کے آنے والے پہلے شعری مجموعہ کا حصہ ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Jitendra Vasava
Painting : Labani Jangi

لابنی جنگی مغربی بنگال کے ندیا ضلع سے ہیں اور سال ۲۰۲۰ سے پاری کی فیلو ہیں۔ وہ ایک ماہر پینٹر بھی ہیں، اور انہوں نے اس کی کوئی باقاعدہ تربیت نہیں حاصل کی ہے۔ وہ ’سنٹر فار اسٹڈیز اِن سوشل سائنسز‘، کولکاتا سے مزدوروں کی ہجرت کے ایشو پر پی ایچ ڈی لکھ رہی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Labani Jangi
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے