१५ ऑगस्ट १९४७. भारताला स्वातंत्र्य मिळालं. देशात सगळीकडे जल्लोष साजरा होत होता. पण तेलंगणात मल्लू स्वराज्यम आणि तिच्यासोबतचे क्रांतीकारक हैद्राबादमध्ये निजामाच्या सशस्त्र रझाकारांशी लढत होते. १९४६ साली, वयाच्या १६ व्या वर्षी या निर्भीड क्रांतीकारक मुलीवर १०,००० रुपयांचं इनाम जाहीर झालं होतं, इतक्या पैशात त्या काळात ८३,००० किलो तांदूळ विकत घेता आला असता.

या चित्रफितीत मल्लू स्वराज्यम यांची वयाच्या ८२ व्या वर्षी आणि त्यानंतर ९२ व्या वर्षी घेतलेल्या मुलाखतीची काही क्षणचित्रं आपल्याला पहायला मिळतील. आज १५ ऑगस्ट २०२२ रोजी आम्ही हा ठेवा तुमच्यासाठी आणला आहे. याच वर्षी १९ मार्च रोजी त्यांचं निधन झालं. पारीचे संस्थापक, पी. साईनाथ यांच्या ‘द लास्ट हिरोजः फूटसोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या आगामी पेंग्विन इंडिया प्रकाशित पुस्तकात तुम्हाला मल्लू स्वराज्यम यांची पूर्ण कहाणी वाचायला मिळेल.

व्हिडिओ पहाः स्वातंत्र्य सैनिक मल्लू स्वराज्यमः 'पोलिसांनी घाबरून धूम ठोकली'