ममता परेड. पारीमधली आमची सहकारी. समाजाप्रती घट्ट बांधिलकी असलेली अतिशय हुशार अशी ममता गेल्या वर्षी, ११ डिसेंबर २०२२ रोजी हे जग सोडून गेली.

आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. ममताने आपल्या स्वतःच्या गावाची, तिथल्या गावकऱ्यांसोबत झालेल्या अन्यायाची गोष्ट स्वतः रेकॉर्ड केली होती, तिच्या जाण्याच्या काही काळ आधी. आज तिच्या आठवणीत आम्ही ही गोष्ट आणि तिचा आवाज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

किमान गरजांसाठी आणि मूलभूत हक्कांसाठी आदिवासींच्या संघर्षाबाबत ममता लिहीत होती. पत्रकार म्हणून ती अगदी दुर्गम, नकाशावरही न सापडणाऱ्या गाव-पाड्यांमध्ये जाऊन तिथलं जगणं सर्वांसमोर आणत होती. भूक, उपासमार, बालमजुरी, वेठबिगारी, शिक्षण, जमिनीचा अधिकार, विस्थापन, आदिवासींच्या उपजीविका आणि अशा अनेक विषयांचा मागोवा ती घेत होती.

पारी पॉडकास्टच्या या भागात ममता आपल्या निंबवली गावासोबत झालेल्या अन्यायाची गोष्ट आपल्याला सांगते. पाण्याची पाइपलाइन टाकत असल्याचा बहाणा करत सरकारी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना कसं फसवलं, त्यांच्या जमिनीची मोजणी करून मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन कसं केलं आणि या प्रकल्पामुळे गावाचे दोन तुकडे झाले त्याची ही गोष्ट. लोकांना जमिनीचा मोबदलाही खूपच कमी देण्यात आला.

अतिशय संघर्ष करत शिकलेल्या, आपल्या आदिवासी समुदायाचं वास्तव सगळ्यांसमोर आणणाऱ्या ममतासोबत काम करणं आम्हाला बरंच काही शिकवून गेलं. पारीवर प्रकाशित झालेल्या तिच्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे वाचू शकता.

तिचं लिखाण, समाजाप्रती बांधिलकी आणि तिचं काम सगळ्यांनाच प्रेरणा देत राहील. पण तिच्या नसण्याचा सलही कायम तसाच राहील.

या पॉडकास्टसाठी हिमांशु सैकियाची मोलाची मदत झाली आहे. मनःपूर्वक आभार.

शीर्षक छायाचित्रावर वापरलेला ममताचा फोटो सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (सीजेपी) या संस्थेच्या वेबसाइटवरून घेतला आहे. ममता तिथे फेलो होती. फोटो वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल आभारी आहोत.

Aakanksha

آکانکشا (وہ صرف اپنے پہلے نام کا استعمال کرتی ہیں) پاری کی رپورٹر اور کنٹینٹ ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Aakanksha
Editors : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے
Editors : Vishaka George

وشاکھا جارج، پاری کی سینئر ایڈیٹر ہیں۔ وہ معاش اور ماحولیات سے متعلق امور پر رپورٹنگ کرتی ہیں۔ وشاکھا، پاری کے سوشل میڈیا سے جڑے کاموں کی سربراہ ہیں اور پاری ایجوکیشن ٹیم کی بھی رکن ہیں، جو دیہی علاقوں کے مسائل کو کلاس روم اور نصاب کا حصہ بنانے کے لیے اسکولوں اور کالجوں کے ساتھ مل کر کام کرتی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز وشاکا جارج
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے