रिटा अक्कांकडे पाहिलं की जीवन आपल्याला काय शिकवू पाहतं ते समजतं– आणि ते हे की जगण्याला एक हेतू असतो. या अपंग सफाई कामगार (त्यांना ऐकू किंवा बोलता येत नाही) विधवा आहेत, त्यांची मुलगी १७ व्या वर्षी तिच्या आजीबरोबर घर सोडून गेली. ४२ वर्षीय रिटाअक्कांच्या आयुष्यावर एकटेपणाचं सावट असलं तरीही त्या एकाकी पडणार नाहीत.

रोज सकाळी उठून रिटा अक्का – त्यांच्या वस्तीतील सगळे जण त्यांना या नावाने ओळखतात (काहीजण त्यांना ऊमाची, बोलू न शकणाऱ्यांसाठी वापरण्यात येणारा अवमानकारक शब्द, अशी हाक मारतात) – चेन्नई महानगर पालिकेत आपल्या कचरा गोळा करण्याच्या कामावर नेमाने जातात. मात्र कधीकधी त्या दिवसभराच्या कष्टातून अंग दुखत असल्याची त्यांची तक्रार असते. त्यांनी आपल्या कचरा गोळा करणाऱ्या खास हातगाडीच्या बाजूवर पाहिलं, की त्यांची आपल्या कामावरील निष्ठा दिसून येते. त्यांनी त्यावर आपलं नाव तीनदा गिरवलंय – तीन वेगवेगळ्या रंगांत. दिवसा अखेरीस त्या शहरातील कोट्टुरपुरम या भागात हाउसिंग बोर्ड क्वार्टरमधल्या आपल्या लहानशा, रिकाम्या घरी परत जातात.

प्राण्यांची भेट घेण्यापूर्वी रिटा अक्का यांचे दोन थांबे ठरलेले आहेत, कुत्र्यांसाठी बिस्किटं विकत घ्यायला एक छोटं दुकान आणि मांजरांसाठी चिकनची छटन विकत घ्यायला एक

व्हिडिओ पाहा: रिटा अक्का: चेन्नईमध्ये सफाई आणि श्वानप्रेमात दंग

तरीही, या मधल्या वेळात त्यांना आपल्या जगण्याचा हेतू गवसलाय. काम उरकल्यावर आपल्या अंधाऱ्या घरात स्वतःला कोंडून घेण्यापूर्वी रिटा भटके कुत्रे आणि मांजरींना गोळा करून त्यांना खाऊ घालण्यात आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात बराच वेळ घालवतात. कोट्टुरपुरमच्या रस्त्यांवरचे कुत्रेदेखील संध्याकाळी रिटा अक्का काम संपवून त्यांना कधी भेटायला येतात, याची वाट पाहत असतात.

त्या मूळच्या तिरुवन्नामलई (२०११ जनगणनेनुसार या जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास ८०% होती) या ननगरातल्या आहेत. त्या साधारण वीसेक वर्षांपूर्वी आपल्या पालकांसोबत कामाच्या शोधात चेन्नईला आल्या. नेमकी तारीख त्यांना आठवत नाही. मात्र तेंव्हापासून बहुतेक वर्षं त्या बऱ्याच ठिकाणी अगदी कवडीमोल मोबदल्यावर घरकाम करायच्या, हे त्यांच्या पक्कं ध्यानात आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी चेन्नई महापालिकेत (आता बृहत् चेन्नई महापालिका) कंत्राटी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. रू. १०० रोजीपासून सुरुवात करून त्या आज दरमहा रू. ८,००० कमावतात.

Rita akka cannot speak or hear; she communicates through gestures. Her smiles are brightest when she is with her dogs
PHOTO • M. Palani Kumar
Rita akka cannot speak or hear; she communicates through gestures. Her smiles are brightest when she is with her dogs
PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का यांना बोलता किंवा ऐकू येत नाही; त्या हावभावांतून संवाद साधतात. कुत्रे सोबत असले की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीनच खुलतं

रिटा कोट्टुरपुरममधील किमान सहा मोठे रस्ते ब्लिचिंग पावडर, झाडू आणि कचऱ्याची बादली अशा साहित्याच्या मदतीने स्वच्छ करतात. हे त्या कुठलेही ग्लोव्ह, जोडे किंवा संरक्षक साहित्य न वापरता करतात. गोळा केलेला केरकचरा महापालिकेच्या पेट्यांमध्ये टाकण्यात येतो. इथून महापालिकेच्या व्हॅन आणि लॉरी हा कचरा पुनःप्रक्रियेसाठी घेऊन जातात. रिटा सकाळी ८:०० पासून कामाला लागतात आणि दुपारपर्यंत सफाई पूर्ण करतात. त्या म्हणतात की रस्ते झाडत असताना त्यांच्या एका डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. आणि अनवाणी चालून त्यांच्या पायांना फोड आले आहेत. बाकी त्या अगदी ठणठणीत आहेत, असं त्या ठणकावून सांगतात.

त्यांच्या कमाईचा बराचसा हिस्सा कुत्रे आणि मांजरांसाठी खाऊ विकत घेण्यात खर्च होतो. शेजाऱ्यांच्या मते त्या त्यांच्यावर रोज रू. ३० खर्च करत असतील, मात्र त्या स्वतःहून याबद्दल काहीच सांगत नाही.

प्राण्यांची भेट घेण्यापूर्वी रिटा अक्का यांचे दोन थांबे ठरलेले आहेत, कुत्र्यांसाठी बिस्किटं विकत घ्यायला एक छोटं दुकान आणि मांजरांसाठी चिकनचे उरलेसुरले तुकडे म्हणजेच छटन विकत घ्यायला एक. ही छटन साफ करून रिटा अक्कांसारख्या गिऱ्हाइकांना १० रुपयांना विकली जाते.

रिटा यांच्याकरिता आपल्या श्वान आणि मार्जार सवांगड्यांसोबत राहून मिळणारा आनंद हा त्यांच्यावर केलेल्या खर्चापेक्षा खूप मोठा आहे.

त्यांचा नवरा जाऊन वर्षं झालीत – रिटा अक्कांना एकतर कधी ते आठवत नाही किंवा त्याबद्दल बोलायचं नसेल – आणि तेंव्हापासून त्या स्वतःच्याच भरवशावर आहेत. शेजाऱ्यांच्या मते तो दारूडा होता. त्यांची मुलगी त्यांना एखाद्या वेळी भेटायला येते.

तरीही, रिटा आनंदी दिसतात – आणि कुत्रे सोबत असले की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीनच खुलतं.

PHOTO • M. Palani Kumar

रिटा राहतात तो चेन्नईचा कोट्टुरपुरम हा भाग. येथील हाउसिंग बोर्डाच्या क्वार्टर्समध्ये त्यांचं लहानसं घर आहे. त्या वीसेक वर्षांपूर्वी तिरुवन्नामलईहून चेन्नईला स्थायिक झाल्या

PHOTO • M. Palani Kumar

रोज सकाळी आपला गणवेश घालून त्या घरून निघतात. त्या साधारण सात वर्षांपासून बृहत् चेन्नई महापालिकेत कंत्राटी कामगार आहेत

PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का कोट्टुरपुरममधील मोठ्या रस्त्यांवर जातायत जिथे रोज सकाळी ८: ०० वाजता त्या काम सुरू करतात

PHOTO • M. Palani Kumar

रस्ते स्वच्छ करण्यासाठी त्या एका टिनपाटात ब्लिचिंग पावडर घेऊन फिरतात

PHOTO • M. Palani Kumar

सफाई सुरू करण्याअगोदर अक्का ग्लोव्हज न घालताच ब्लिचिंग पावडर टाकतात. आपल्या कचरा गोळा करणाऱ्या खास हातरिक्षा ट्रॉलीवर त्यांनी तीनदा आपलं नाव कोरलंय, वेगवेगळ्या रंगांत

PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का गोळा केलेला केरकचरा महापालिकेच्या पेट्यांमध्ये टाकतात

PHOTO • M. Palani Kumar

त्या ओढत असलेली कचऱ्याची ट्रॉली ही एक तीनचाकी खटारा रिक्षा आहे. कधीकधी त्या दिवसभराच्या कष्टानी अंग दुखत असल्याची तक्रार करतात

PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का रोज कोट्टुरपुरममधील किमान सहा मोठे रस्ते झाडून स्वच्छ करतात. आपलं काम करायला त्यांच्याकडे जोडे किंवा इतर कुठलंही संरक्षक साहित्य नाही

PHOTO • M. Palani Kumar

अनवाणी पायांनी चालून आणि काम करून त्यांच्या पायांना फोड आले आहेत, आणि रस्ते स्वच्छ करत असताना एका अपघातात त्यांच्या एका डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे

Rita akka responds to a question in gestures, and then flashes a smile
PHOTO • M. Palani Kumar
Rita akka responds to a question in gestures, and then flashes a smile
PHOTO • M. Palani Kumar
Rita akka responds to a question in gestures, and then flashes a smile
PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का एका प्रश्नाचं हावभावांतून उत्तर देतात, आणि खुदकन हसतात

PHOTO • M. Palani Kumar

एक भटका कुत्रा, रिटा अक्कांच्या श्वान मित्रांपैकी एक, रोज संध्याकाळी त्यांचं काम संपण्याची वाट पाहतो

PHOTO • M. Palani Kumar

त्या आपल्या कमाईचा बराचसा हिस्सा कुत्रे आणि मांजरांसाठी खाऊ विकत घेण्यात खर्च करतात, मात्र स्वतःहून याबद्दल काहीच सांगत नाहीत

PHOTO • M. Palani Kumar

त्या आपला वेळ भटक्या कुत्र्यांसोबत घालवतात आणि त्यांच्या सहवासात दंग होऊन त्यांच्याशी ' बोलण्यात' ही

PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का यांना आपल्या या चार पायांवरच्या सवंगड्यांमध्ये आपल्या जीवनाचा हेतू गवसलाय. त्यांच्यासोबत राहून त्यांना मिळणारा आनंद हा त्यांच्यावर केलेल्या खर्चापेक्षा खूप मोठा आहे

Using her hands and expressions, she communicates what she wants to say
PHOTO • M. Palani Kumar
Using her hands and expressions, she communicates what she wants to say
PHOTO • M. Palani Kumar

आपल्या हातांचा आणि हावभावांचा वापर करून त्या आपलं म्हणणं मांडतात

Left: Rita akka with her neighbours. Right: At home in the housing board quarters
PHOTO • M. Palani Kumar
A framed painting adorns Rita akka's small house, offering 'best wishes'
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडे: रिटा अक्का आपल्या शेजाऱ्यांसोबत. उजवीकडे: हाउसिंग बोर्ड क्वार्टर्समधील आपल्या घरी

PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्कांच्या लहानशा घरी भिंतीवर टांगलेली ' शुभेच्छा' देणारी तसबीर

PHOTO • M. Palani Kumar

रिटा अक्का आपल्या घरी. त्या आपला नवरा गेल्यापासून स्वतःच्याच भरवशावर आहेत, पण एकट्या पडल्या नाहीत

PHOTO • M. Palani Kumar

रोज संध्याकाळी त्या आपल्या रिकाम्या घरी परत येतात

PHOTO • M. Palani Kumar

अनुवाद: कौशल काळू

M. Palani Kumar

ایم پلنی کمار پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کے اسٹاف فوٹوگرافر ہیں۔ وہ کام کرنے والی خواتین اور محروم طبقوں کی زندگیوں کو دستاویزی شکل دینے میں دلچسپی رکھتے ہیں۔ پلنی نے ۲۰۲۱ میں ’ایمپلیفائی گرانٹ‘ اور ۲۰۲۰ میں ’سمیُکت درشٹی اور فوٹو ساؤتھ ایشیا گرانٹ‘ حاصل کیا تھا۔ سال ۲۰۲۲ میں انہیں پہلے ’دیانیتا سنگھ-پاری ڈاکیومینٹری فوٹوگرافی ایوارڈ‘ سے نوازا گیا تھا۔ پلنی تمل زبان میں فلم ساز دویہ بھارتی کی ہدایت کاری میں، تمل ناڈو کے ہاتھ سے میلا ڈھونے والوں پر بنائی گئی دستاویزی فلم ’ککوس‘ (بیت الخلاء) کے سنیماٹوگرافر بھی تھے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز M. Palani Kumar
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

کے ذریعہ دیگر اسٹوریز کوشل کالو