डावीकडेः २३ वर्षांपासून ४७ वर्षीय
प्रफुल्ला देबनाथ (टाळेबंदीत बंद असलेल्या) समबय कृषी उन्नयन समिती मार्केटमध्ये
पडेल ती कामं करत होते. ते गिऱ्हाइकांचं सामान घरी पोचवणे, आणि गाड्यांमधला माल
दुकानात उतरवण्याचं काम करतात. आणि सगळा बाजार जे रोज झाडून काढतात – प्रत्येक भाजीवाल्याकडून
रोज २ रुपये आणि दुकानदारांकडून १ रुपया गोळा करतात. पण आता हा बाजारच दत्ता
पाराच्या खुल्या मैदानात हलवल्यामुळे त्यांची जी काही तुटपुंजी कमाई होती ती देखील
थांबली. अर्थात काही भाजीवाले त्यांची नाष्टा आणि जेवणाची सोय करतायत. “मी झाडून
काढलं नाही तर अख्ख्या बाजारात घाण होईल,” ते म्हणतात. “आणि मी जर बाजार झाडून काढला
तर सगळे माझं नाव घेतील. माझ्यासारखं काम दुसरं कुणी करूच शकणार नाही!” उजवीकडेः
बाजार थोडाच वेळ चालू असतो, त्यामुळे अनेक जण अगदी शेवटच्या क्षणी बाजार करायला
येतात, स्वस्तात माल मिळेल अशा आशेने. खोका रॉय, वय ५० सुतारकाम करायचे, त्यानंतर
त्यांनी घरूनच एक किराणा मालाचं दुकान चालवलं आणि आता ते टाळेबंदीमुळे बाजारात
भाजी विकतायत. दिवसाला ४००-५०० रुपयांवरून त्यांची कमाई २००-२५० रुपयांवर आलीये. “पोलिसांची
गस्त असल्यामुळे लोक घरातून बाहेरच पडत नाहीयेत,” ते म्हणतात. “मग तुम्हीच सांगा,
भाजीपाला तरी कसा विकायचा आम्ही?”