पडत्या पुलाखालचं जमीनदोस्त जगणं

पुलाच्या दुरुस्तीसाठी उत्तर कोलकात्याची तल्ला वस्ती पाडली त्याला महिना झाला, पण आजही तात्पुरत्या निवाऱ्यात हलवलेली कुटुंबं पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत

२० जानेवारी २०२०| स्मिता खातोर

समृद्धी महामार्गामुळे पारधी मुलांची शाळा जमीनदोस्त

एका फासे पारधी शिक्षकानं पिढ्या न् पिढ्या सामाजिक कलंकाचा सामना करणाऱ्या, दारिद्र्यात पिचत पडलेल्या आपल्या समाजातल्या मुलांसाठी महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात शाळा सुरू केली. ६ जून रोजी ही शाळा जमीनदोस्त करण्यात आली आणि आता इथल्या विद्यार्थ्यांवर चिंता आणि अनिश्चिततेच्या सावट आलं आहे

१९ जून २०१९| ज्योती शिनोळी

समृद्धीने जमीनदोस्त चिराडपाडा

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा एक पूल जेव्हा ठाणे जिल्ह्यातल्या चिराडपाड्यातून जाईल आणि लवकरच याच गावाबाहेर अनेक दशकांपासून वसलेल्या चार कातकरी आदिवासी कुटुंबांच्या झोपड्या आणि रोजगार हिरावून घेतला जाईल

१५ मे २०१९| ज्योती शिनोळी

'निदान इथे आम्हाला स्वतःची जमीन तरी आहे'

मध्य प्रदेशातील पन्ना वाघ प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामपुरा या लहानशा गावच्या रहिवाशांना गाव सोडून जायला सांगण्यात आलं आहे. पण, ते म्हणतात, पर्यायी जमीन मिळाली नसताना आम्ही कुठे जायचं?

२ जून २०१९ | मैत्रेयी कमलनाथन

कामाच्या शोधात, रस्त्यावरची बिऱ्हाडं

राजधानीतल्या थंडगार रस्त्यांवर छत्तीसगड, महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या स्थलांतरित कामगारांनी आपले संसार थाटलेत, बांधकामावर आणि इतर ठिकाणी काम शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे

१८ डिसेंबर २०१९ | पुरुषोत्तम ठाकूर

जमिनीच्या किंमती तेजीत, शेती मात्र घाट्यात

आंध्र प्रदेशाच्या काही गावांमध्ये, जिथे नवी राजधानी अमरावती वसवली जात आहे, तिथल्या जमिनींचे व्यवहार तेजीत आल्याने काही शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे पण छोटे जमीनमालक मात्र यात भरडले जात आहेत आणि हलाखीत आहेत

२७ फेब्रुवारी २०१९| राहुल मगंती

‘आम्हाला कबूल केलेल्या नोकऱ्या शासनाने आम्हाला द्याव्यात’

आंध्र सरकारने अमरावतीसाठी जमिनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक भूमीहीन शेतमजुरांचं शेतीतलं काम गेलंय, तरुण मजूर कृष्णा नदीपासच्या रेतीच्या उत्खननासाठी काम करतायत, स्त्रियांच्या तर हातचं कामच गेलंय

५ नोव्हेंबर २०१९| राहुल मगंती

नवी राजधानी, जुने भेदाभेद

आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती जिथे उभारली जातीये तिथे दशाकानुदशकं ‘इनाम’ जमिनी कसणाऱ्या, विस्थापित शेतकऱ्यांचा हाच सवाल आहे की जमिनीची मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा त्यांना कमी मोबदला देण्याचं कारण काय

१८ जानेवारी २०२० | राहुल मगंती

‘ही काही लोकांची राजधानी नाहीये’

अमरावती, मोठा सरकारी गाजावाजा होऊन वसत असणाऱ्या आंध्राच्या या नव्या महाराजधानीपायी हजारो शेतकरी त्यांच्या सुपीक जमिनींवरून विस्थापित होणार आहेत. अनेक जण याचा विरोध करत असले तरी अनेकांनी भू-एकत्रीकरण योजनांसाठी जमीन दिली आहे

१५ फेब्रुवारी २०१९| राहुल मगंती

अतिरिक्त ऊर्जेच्या राज्यात वंचितांच्या व्यथा

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम् जिल्ह्यातील हजारो गावकऱ्यांना एका आण्विक ऊर्जा प्रकल्पाला आपला जमिनी आणि उपजीविकांवर पाणी सोडावं लागणार आहे, जेव्हा राज्यात पुरेशी ऊर्जा उपलब्ध आहे आणि नवीन क्षमता खरं तर खूप खर्चिक ठरणार आहे

६ मार्च २०१९| राहुल मगंती

‘आम्हाला आमचं गावही नाही, ना आमचा देश’

गेली अनेक दशकं मुंबईतील बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पुरेशा पाण्याच्या आणि इतर सुविधा नसतानाही वारली समुदाय राहत आहे, कारण त्यांना भीती आहे पुनर्वसनाची. जगण्यासाठी चाललेल्या त्यांच्या या संघर्षात त्यांना आपली वैशिष्ट्यपूर्ण कला देखील गमवावी लागली आहे.

१९ ऑक्टोबर २०१८| अपेक्षिता वार्ष्णेय

धरणाने विस्थापित, हुकुमपेटात बेघर

पोलावरम धरणासाठी आपलं पायडिपाका गाव सोडून दोन वर्षं झाली तरी सहा दलित कुटुंबांना आजही घराची प्रतीक्षा आहे तर देवरीगोंडीच्या आदिवासींना आपली परंपरागत मायभूमी सोडून जावं लागलं आहे

२८ ऑगस्ट २०१८| राहुल मगंती

‘आमची घरं नाहिशी होतायत. कुणालाच फिकीर नाही’

कित्येक दशकांपासून संदुरबनच्या घोरामारा बेटावरचे लोक सागर बेटावर स्थलांतर करतायत कारण नदी आणि पाऊस त्यांची घरं धुऊन नेतायत. राज्य सरकारकडून त्याना फारशी मदत मिळालेली नाही

२२ सप्टेंबर २०१९| ऊर्वशी सरकार

पोलावरमच्या वंचितांची आशावादी आगेकूच

१० ते १६ जुलै दरम्यान आदिवासींच्या एका निश्चयी गटाने, त्यांच्या जमातींना विस्थापित आणि बेचिराख करणाऱ्या पोलावरम प्रकल्पाविरुद्ध, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील चीरावल्ली गावापासून एळूरूपर्यंत मोर्चा काढला

२८ ऑगस्ट २०१८ | राहुल मगंती

पायडिपाकाची कुटुंबं – आणि अखेर राहिले दहा

गोदावरीवरच्या पोलावरम प्रकल्पामुळे येत्या काळात शेकडो गावं नामशेष होणार आहेत. पायडिपाकामधली दहा घरं मात्र तिथून हलायला तयार नाहीत, शासनाने कायद्याप्रमाणे त्यांना पुनर्वसनाचं पॅकेज द्यावं अशी त्यांची मागणी आहे

२७ ऑगस्ट २०१८| राहुल मगंती

काँक्रीटच्या खुराड्यातः मातीतले आदिवासी इमारतीत कैद

मुंबई महानगरीच्या पोटातलं एक अख्खं आदिवासी गाव मेट्रोच्या डब्यांचा कारखाना बांधण्यासाठी नकाशावरून पुसून टाकण्यात आलंय आणि त्या गावाच्या रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या खुराड्यांमध्ये कोंबून टाकलंय

१५ मार्च २०१८| ज्योती शिनोळी

‘अनेक कुटुंबं तर गायबच झाली...’

ठाणे जिल्ह्यातल्या भातसा सिंचन प्रकल्पासाठी आदिवासी आणि बहुजन कुटुंबांना त्यांच्या जमिनींवरून हाकलून लावण्यात आलं. अर्धं शतक लोटलं तरी आजही ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत

८ ऑगस्ट २०१८| ज्योती शिनोळी

हलाखीत ढकलणारा ‘समृद्धी’ महामार्ग

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातल्या अनेकांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार राज्याच्या अर्थकारणामध्ये परिवर्तन आणणाऱ्या या महामार्गामुळे प्रत्यक्षात ३५४ गावातले हजारो शेतकरी विस्थापित होणार आहेत

१५ मार्च २०१८| पार्थ एम. एन.

नदीकिनारी सारे अशांत

नव्या ‘अमरावती’ आणि विजयवाड्याच्या आसपास नदीकिनारी उभ्या राहत असलेल्या राज्य सरकारच्या प्रकल्पांसाठी आंध्र प्रदेशातील कृष्णेकाठच्या मच्छिमारांना जबरदस्तीने आपली घरं आणि उपजीविका सोडून जायला भाग पाडलं जात आहे

१८ डिसेंबर २०१९ | राहुल मगंती

अनंतपुरातील उद्ध्वस्त घरे

आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील विजयनगर कॉलनीत ३ ऑगस्ट रोजी एकाएकी झालेल्या पाडावात बहुतांशी मजुरी करणाऱ्या किंवा स्थलांतरित परिवारांना बेघर होऊन रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे

१७ मार्च २०१८| राहुल एम.

वाळूचा किल्ला,‘चार’-निवासींचा संघर्ष

ब्रह्मपुत्रेच्या सरकत्या, अस्थिर, वाळूमय ‘चार’वर, वीज, आरोग्य सेवा किंवा इतर मूलभूत गरजांशिवाय, घर उभारून राहणार्या २.४ लाख लोकांपैकी, हसन अली एक आहेत. अफाट ब्रह्मपुत्रेतील सततच्या उलथापालथीमुळे त्यांना वारंवार घर बदलावे लागते

२६ जानेवारी २०१७| रत्ना भराली तालुकदार

कोळशाच्या संगतीतलं जिणं

“या कंपन्यांनी सगळ्या पर्यावरणाची वाट लावलीये, मान्य आहे. पण हे करण्याचा अधिकार त्यांना सरकारनेच दिलाय ना.”

१५ डिसेंबर २०१९| पार्थ एम. एन.

धिनकियाचा कवी-गायक

दक्षिण कोरियाला परत जा (पॉस्को चले जाव)

२० जानेवारी २०२० | पुरुषोत्तम ठाकूर

ओरिसातली स्टील रथाची यात्रा

विस्थापनाविरोधात संघर्ष करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे हाच ओरिसात किंवा ओरिसाच्या बाहेरही शासनाचा प्रचलित मार्ग दिसतोय

१४ ऑक्टोबर २०१९| पी. साईनाथ

अनुवादः मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.