“आम्ही मेडापुरममध्ये जसा उगाडी साजरा करतो तसा दुसरीकडे कुठेच होत नाही,” पासला कोंडण्णा म्हणतात. ८२ वर्षीय कोंडण्णा शेतकरी आहेत. नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे उगाडी. मार्च-एप्रिलमध्ये येणारा हा सण आंध्र प्रदेशाच्या गावांमध्ये साजरा केला जातो. कोंडण्णा अगदी भरभरून त्यांच्या उगाडीविषयी बोलतात.

श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या या गावात उगाडीचं सगळं व्यवस्थापन अनुसूचित जातीचे लोक करतात.

उगाडीच्या आदल्या रात्री देवाची मूर्ती वाजत गाजत गावात आणली जाते. जवळच्या गुहांमधून देवळात मूर्ती आणली जाते तेव्हा लोक अगदी आतुरतेने आणि उत्साहात वाट पाहत असतात. देवळाचा कारभार ज्या आठ कुटुंबाच्या हातात आहे आणि ते सगळे अनुसूचित जातीचे आहेत. मेडापुरम गावाची लोकसंख्या ६,६४१ (जनगणना, २०११) असून या समाजाची संख्या तशी कमीच आहे.

उगाडीचा दिवस उजाडतो, गावात एकदम चैतन्य संचारतं. लोक सगळ्या गाड्या वगैरे सजवून सण साजरा करण्यासाठी देवळाच्या भोवती फिरवून आणतात. भाविक प्रसादम वाटतात, आणि सगळ्यांमध्ये एक आपुलकीची भावना जाणवते आणि पुढच्या वर्षभरासाठी सगळे जण देवाची कृपा व्हावी हीच मागणी करतात. गाड्यांची जत्रा संपते आणि दुपारी पंजु सेवा हा विधी केला जातो. यासाठी गाड्यांच्या जत्रेच्या मार्गानेच भाविक येतात. आदल्या रात्री ज्या रस्त्याने मूर्ती आली तो शुद्ध करून घेतला जातो.

देवाची मूर्ती गावात आणण्यासाठी माडिगा समाजाला बराच संघर्ष करावा लागला आहे. तो इतिहास सगळ्यांपुढे मांडत हा उत्सव या संघर्षाची आठवण जागती ठेवली जाते.

फिल्म पहाः मेडापुरमचा उगाडीः परंपरा, ताकद आणि अस्मिता

Naga Charan

ناگا چرن، حیدرآباد کے آزاد فلم ساز ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Naga Charan
Text Editor : Archana Shukla

ارچنا شکلا، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی کانٹینٹ ایڈیٹر ہیں۔ وہ پبلشنگ ٹیم کے ساتھ کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Archana Shukla
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے