तीन वर्षांच्या विहान कोडवतेला अजूनही वाघाच्या हल्ल्याची भीतीदायक स्वप्नं पडतात आणि तो आपल्या आईला, सुलोचनाला बिलगतो.

२०१८ साली मे महिन्यात चिमुकला विहान आपल्या वडलांबरोबर, २५ वर्षीय बीरसिंग कोडवते यांच्यासोबत मोटरसायकलवरून तेंदूची पानं गोळा करण्यासाठी गेला होता. उन्हाळ्यात मध्य भारतात अनेकांची ही मुख्य उपजीविका असते. तेंदूची पानं वाळवून नंतर बिड्या वळण्यासाठी वापरली जातात. बीरसिंग गोंड आदिवासी आहे.

PHOTO • Jaideep Hardikar

नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातल्या पिंडकपार गावातून बीरसिंग विहानला घेऊन मोटरसायकलवर निघाला. घनदाट जंगलातून काही किलोमीटर जाताच वळणावर शेजारच्या झुडपातून एक पूर्ण वाढ झालेला वाघ अचानक सामोरा आला आणि त्याने त्यांच्या मोटरसायकलवर झडप घातली आणि पंजाने वार केले.

हा सगळा भाग पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ आहे. बाप लेक दोघांना गंभीर जखमा झाल्या आणि पुढचा एक आठवडा ते नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात भरती होते. विहानला डोक्याला आठ टाके पडले.

विदर्भातल्या असे अनेक हल्ले होत असतात. मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालल्याची आणि हे हल्लेही वाढत चालल्याचंच त्यातून दिसतंय. याचं प्रमुख कारण म्हणजे वाघांचे आणि वन्यजिवांचे अधिवास आकसत जाणं. (वाचाः वाघांनी जायचं तरी कुठं? )

Jaideep Hardikar

جے دیپ ہرڈیکر ناگپور میں مقیم صحافی اور قلم کار، اور پاری کے کور ٹیم ممبر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز جے دیپ ہرڈیکر
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے