भारताच्या खेड्यापाड्यांमधले लोक हे स्वातंत्र्यसंग्रामाचं खरं पायदळ मानायला हवेत. इंग्रज वसाहतींविरोधात झालेल्या काही कडव्या उठावांचं नेतृत्वही याच गावकऱ्यांनी केलंय. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त करण्यासाठी लाखोंनी त्यांचे प्राण दिले. आणि भारत स्वतंत्र झालेला पाहण्यासाठी अत्यंत अपेष्टा सोसूनही जे जिवंत राहिले त्यांचा मात्र लवकरच सगळ्यांना विसर पडला. १९९० पासून या काही अखेरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कहाण्या मी गोळा करतोय. यातल्याच या पाच कहाण्या

इंग्रज सरकारला शिंगावर घेणारी ‘सलिहान’

ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंदुकींचा लाठ्यांनी सामना करणाऱ्या देमती देई शबर आणि तिच्या मैत्रिणी, मु.पो. सलिहा, नौपाडा, ओडिशा

२४ मार्च २०१७ । पी. साईनाथ

https://ruralindiaonline.org/en/authors/p-sainath/

पाणिमाराचं पायदळ – भाग १

ओडिशातल्या काही गरीब गावकऱ्यांनी संबलपूर न्यायालय ताब्यात घेऊन स्वतः चालवायला घेतलं त्याची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

पाणिमाराचं पायदळ – भाग २

स्वातंत्र्याचं गाव असा मान मिळवलेल्या ओडिशातल्या छोट्याशा वस्तीची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

लक्ष्मी पांडांचा अखेरचा लढा

आझाद हिंद सेनेच्या स्वातंत्र्य सेनानी असणाऱ्या, गरिबीच्या खाईत असलेल्या लक्ष्मी पांडांची मागणी इतकीच की या देशाने आपली दखल घ्यावी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साठ वर्षं उलटल्यानंतरही त्यांचा लढा काही संपलेला नाही

२६ मार्च २०१७ । पी. साईनाथ

Nine decades of non-violence
• Nabarangapur, Odisha

अहिंसेची नव्वद वर्षं

स्वातंत्र्यानंतर ६० वर्षं जे अहिंसक मार्गाने लढत राहिले त्या बाजी मोहम्मद यांची गोष्ट

२५ मार्च, २०१७ । पी. साईनाथ

याचसोबत इथे अजून पाच गोष्टी आहेत. या गोष्टी याआधी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात काही छायाचित्रांची भर घातली आहे. स्वातंत्र्य संग्राम फक्त काही शहरी अभिजनांपुरता मर्यादित नव्हता. ज्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये मोठ्या बंडाच्या ठिणग्या उडाल्या त्या गावांवरची लेखमाला म्हणजे ‘विस्मृतीतले स्वातंत्र्य लढे’. खेडोपाडीचे लोक या संग्रामामध्ये फार मोठ्या संख्येने लढले आणि त्यांचे लढेही फार वेगवेगळ्या स्वातंत्र्यांसाठी होते. १८५७मध्ये गावाकडे, खेडोपाडी वेगवेगळे उठाव होत असताना मुंबई आणि कलकत्त्यात मात्र इंग्रजांना त्यांच्या कार्यात यश मिळावं यासाठी तिथले अभिजन बैठका घेण्यात मग्न होते. १९९७ मध्ये स्वातंत्र्याला ५० पूर्ण झाली तेव्हा यातल्याच काही गावांना मी भेटी दिल्या. तिथल्याच या काही कहाण्याः

शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची

१९४२ साली उत्तर प्रदेशातल्या ज्या गावाने तिरंगा फडकवला आणि नंतर त्याची किंमतही मोजली त्याची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत

आंध्र प्रदेशातल्या रंपामध्ये अल्लुरी सीताराम राजूंनी इंग्रजांविरोधात एक फार मोठा उठाव केला त्याची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला

छत्तीसगडमधल्या वीर नारयण सिंगने दयेची भीक मागितली नाही. न्यायासाठी लढता लढता त्याने आपला जीव दिला, त्याची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

कल्लियसेरीः सुमुखनच्या शोधात

इंग्रज, स्थानिक जमीनदार आणि जात व्यवस्था – सगळ्या आघाड्यांवर लढा देणाऱ्या गावाची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

कल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच

स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ८: शिकाऱ्यांच्या देवाने इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी कम्युनिस्टांना आसरा दिला त्याची गोष्ट

२८ मार्च २०१७ । पी. साईनाथ

आता नव्वदीला, कदाचित शंभरीला टेकलेल्या अखेरच्या काही स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेऊन त्यांची कहाणी शब्दबद्ध करण्याचं काम पारी आजही करत आहे.

P. Sainath

ପି. ସାଇନାଥ, ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍ ଅଫ୍ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପ୍ରତିଷ୍ଠାତା ସମ୍ପାଦକ । ସେ ବହୁ ଦଶନ୍ଧି ଧରି ଗ୍ରାମୀଣ ରିପୋର୍ଟର ଭାବେ କାର୍ଯ୍ୟ କରିଛନ୍ତି ଏବଂ ସେ ‘ଏଭ୍ରିବଡି ଲଭସ୍ ଏ ଗୁଡ୍ ଡ୍ରଟ୍’ ଏବଂ ‘ଦ ଲାଷ୍ଟ ହିରୋଜ୍: ଫୁଟ୍ ସୋଲଜର୍ସ ଅଫ୍ ଇଣ୍ଡିଆନ୍ ଫ୍ରିଡମ୍’ ପୁସ୍ତକର ଲେଖକ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପି.ସାଇନାଥ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ