एक उमदा तरूण त्याच्याहून मोठ्या पैलवानाशी कुस्ती खेळतोय. तरूण जिंकतो आणि त्याचा अनुभवी प्रतिस्पर्धी हार पत्करतो. असं करणारा हा आहे तरुण पोराचा प्रेमळ मामा. पुणे जिल्ह्याच्या नांदगावच्या शाहू कांबळेंनी गायलेल्या सहा ओव्यांमधल्या पहिली ओवी अशी सुरू होते.

दुसऱ्या ओवीत त्या गातात, कुस्त्या माळावर चालू आहेत. तरण्या पोराची आई तिच्या भावाला सांगते, “तुझ्या बहिणीचा पोर आहे, जरा जपून.” तिसऱ्या ओवीत कुस्ती खिंडीत चालू आहे. पण पाहणाऱ्या मैत्रिणी म्हणतात, “काळजी करू नका, कारण मामा भाचे दोघं खेळात वस्ताद आहेत, माय अन् लेकीची पोरं आहेत.”

चौथ्या ओवीमध्ये कुस्ती चालू असताना पैलवानांच्या नावाने हलगी टांग टांग वाजतीये आणि पाहणारे कौतुकाने विचारतायत, “हा पैलवान कोण्या माईचा आहे ते सांग.” पैलवानाचा बाप कोण असं काही या ओवीत विचारलेलं नाही ही बाब खरंच मजेशीर आहे. कारण पैलवानाची ताकद, आडदांड शरीर आणि कुस्तीतलं कौशल्य या सगळ्याचं श्रेय त्याच्या आईला दिलेलं आहे. तिनंच त्याला जन्म दिलाय त्याला लहानाचं मोठं केलंय.

शेवटच्या ओवीत शाहूबाई गातात, शिवेकडच्या शेतामध्ये कोण गाणं गातोय. हा तर मामा, त्याच्या भाच्याला शिकवितोय.

Wrestling match
PHOTO • P. Sainath

अशी मामा ना भाच्याची कुस्ती लावली खिंडीत, कशी सयांना सया बोल माय लेकीच पंडित’ - मामा भाच्यामध्ये लागलेल्या कुस्तीवरच्या ओवीत शाहूबाई गातायत

या ध्वनिफितीच्या शेवटी आपल्याला हेमा राइरकरांचा आवाज येतो. गी पॉइत्वाँ यांना त्या ओवीचा अर्थ समजावून सांगतायत. जात्यावरच्या ओव्यांचा हा संग्रह या दोघा कार्यकर्त्यांनी गोळा करायला सुरुवात केली ती अगदी १९८० मध्ये. या दोघांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या बायांबरोबर काम करायला सुरुवात केली. आम्ही आमच्या मनातलं जात्यावर ओव्या गातानाच चांगलं मांडू शकतो असं जेव्हा या बाया सांगू लागल्या तेव्हा राईरकर आणि पॉइत्वाँ यांनी या ओव्या गोळा करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि कर्नाटकात जाऊन त्यांनी तब्बल १,१०,००० हजार ओव्या हाती लिहून काढल्या.

शाहूबाई कांबळेंनी या संग्रहासाठी ४०१ ओव्या गायल्या आहेत, यातल्या १७० १९९९ साली ध्वनीमुद्रित केल्या आहेत. आता पारीवर प्रकाशित होणाऱ्या जात्यावरच्या ओव्या संग्रहामध्ये या ओव्यांचा समावेश केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत एक छोटी टीम दर महिन्याला एक किंवा दोन गावांना भेट देत आहे, या ओव्या गाणाऱ्या स्त्रियांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग घेत आहे.

दुःखाची बाब म्हणजे शाहूबाई २०१६ च्या ऑगस्टमध्ये निवर्तल्या. त्यांच्यामागे त्यांचे पती नामदेव, दोन मुलगे, सुना आणि नातवंडं आहेत. हे सगळे मुळशी तालुक्याच्या नांदगावमध्ये राहतात. त्या नसल्या तरी त्यांचा गोड आवाज आणि सुरेल ओव्या कायमच्या मुद्रित झाल्या आहेत. चला, ऐकू या.

अशी मामा ग भाच्यायाची कुस्ती लावली जनानी
बाई ना भाच्याची कवळी ग शिण पड घेतली मामानी

अशी मामा भाचा यांची कुस्ती लावली माळाला
अशी सांगते रे बंधू संभाळ बहिणीच्या बाळाला

अशी मामा ना भाचायांची कुस्ती लावली खिंडीत
कशी सयांना सया बोल माय लेकीच पंडित

बाई ना कुस्तीच्या फडात हलगी ना वाज टांग टांग
अशी ना सया विचारती कोण्या मावलीचा सांग

अशी ना मामा ग भाचायांची कुस्ती लावली जनामधी
कशी भाचाची कवळी ग शिण मामा हसला मनामंदी

शिवच्या शेतामंदी कोण आवत्या गाणं गातो
माझा ग बंधू मामा भाच्याला शिकवतो

aśī māmā ga bhācyāyācī kustī lāvalī janānī
bāī nā bhācyācī kavaḷī ga śiṇa paḍa ghētalī māmānī

aśī māmā bhācā yāñcī kustī lāvalī māḷālā
aśī sāṅgatē rē bandhū sambhāḷa bahiṇīcyā bāḷāl

aśī māmā nā bhācāyāñcī kustī lāvalī khiṇḍīta
kaśī sayānnā sayā bōla māya lēkīca paṇḍita

bāī nā kustīcyā phaḍāta halagī nā vāja ṭāṅga ṭāṅga
aśī nā sayā vicāratī kōṇyā māvalīcā sāṅg

aśī nā māmā ga bhācāyāñcī kustī lāvalī janāmadhī
kaśī bhācācī kavaḷī ga śiṇa māmā hasalā manāmandī

śivacyā śētāmandī kōṇa āvatyā gāṇaṁ gātō
mājhā ga bandhū māmā bhācyālā śikavatō

A wrestling match is organised between a maternal uncle and his nephew
O woman, the nephew is of a tender age; the uncle accepts defeat

The wrestling match takes place on open land
I tell you, brother, take care of your sister’s son

The uncle and nephew are wrestling on difficult hilly terrain
Friends tell each other, ‘These are master wrestlers, sons of a mother and her daughter’

O woman, halgi [frame drums] sound ‘tang! tang!’ in the wrestling arena
Friends ask each other, ‘Tell me, whose son is he? Who is this wrestler's mother?’

A wrestling match is on between uncle and nephew in front of people
The nephew is of tender age; the uncle smiles to himself

Who is this man singing in the fields at the edge of the village?
It is my brother teaching my son [his nephew] to sing


Framed photo of Shahu Kamble with garland
PHOTO • Samyukta Shastri

कलावंतः शाहू कांबळे

गावः नांदगाव

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नवबौद्ध

वयः ७० (शाहूबाई २०१६ च्या ऑगस्टमध्ये निवर्तल्या)

मुलं: दोन मुलगे, दोन मुली

व्यवसायः शेती

दिनांकः ही गाणी ५ ऑक्टोबर १९९९ रोजी ध्वनीमुद्रित करण्यात आली. फोटो ११ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात आले.

पोस्टरः सिंचिता माजी

Namita Waikar

ନମିତା ୱାଇକର ହେଉଛନ୍ତି ଜଣେ ଲେଖିକା, ଅନୁବାଦିକା ଏବଂ ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପରିଚାଳନା ନିର୍ଦ୍ଦେଶକ। ତାଙ୍କ ରଚିତ ଉପନ୍ୟାସ ‘ଦ ଲଙ୍ଗ ମାର୍ଚ୍ଚ’ ୨୦୧୮ରେ ପ୍ରକାଶ ପାଇଥିଲା।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ନମିତା ୱାକର
PARI GSP Team

PARIର ‘ଗ୍ରାଇଣ୍ଡମିଲ ସଙ୍ଗସ’ ପ୍ରକଳ୍ପ ଟିମ୍‌: ଆଶା ଓଗାଲେ (ଅନୁବାଦ); ବର୍ଣ୍ଣାଡ ବେଲ (ଡିଜିଟାଇଜେସନ୍‌, ଡାଟାବେସ୍‌ ଡିଜାଇନ୍‌, ପ୍ରସ୍ତୁତି ଏବଂ ରକ୍ଷଣାବେକ୍ଷଣ); ଜିତେନ୍ଦ୍ର ମୈଡ଼ (ଅନୁଲେଖନ, ଅନୁବାଦନରେ ସହାୟତା); ନମିତା ୱାଇକର (ପ୍ରକଳ୍ପ ମୁଖ୍ୟ ଏବଂ କ୍ୟୁରେସନ); ରଜନୀ ଖାଲାଡ଼କର (ଡାଟା ଏଣ୍ଟ୍ରି) ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ PARI GSP Team
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ