२०१४-१५ मध्ये वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर मध्ये ग्रामीण भारताबद्दल फक्त ०.२४% बातम्या आल्या.
आम्हाला हे चित्र बदलायचं आहे."
India’s younger, media-saturated generations grow up knowing little about their country, but a lot about the elites of a few metros and towns. For a narrowly-owned, commercially-driven media, the dumbing down of a nation is part of standard operating procedure. Data of the Centre for Media Studies (CMS, Delhi) show us that reports from New Delhi account for 66 per cent of news on the front pages of major dailies. The CMS also found that in 2014-15, only about 0.24 per cent of front page news came out of rural India. The TV channels are not much better.
भारतीय पत्रकारितेतला हा सर्वात महत्त्वांकांक्षी प्रयत्न साकार व्हावा यासाठी पारीला तुमची मदत हवी आहे
योजना
-
पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचं ध्येय आहे की देशाच्या ९५ प्रदेशांतल्या प्रत्येक प्रदेशात एक पारी फेलो नेमायचा. यातल्या बहुतेक प्रदेशांना राष्ट्रीय स्तरावरच्या (अर्थात कॉर्पोरेट) माध्यमांनी स्पर्शही केलेला नाहीये.
फेलो कोण असतीलवार्ताहर लेखक चित्रपटकर्ते छायाचित्रकारआणि त्या प्रदेशातले रोजचे रहिवासी
आमच्या दृष्टीने ‘प्रदेश’ म्हणजे नक्की काय? तर नैसर्गिक किंवा ऐतिहासिकरित्या तयार झालेले भूभाग. उदा. उत्तर प्रदेश या राज्याचे रोहिलखंड, बुंदेलखंड, ब्रज, अवध सोनभद्र आणि भोजपूर (जो बिहारमध्येही पसरलेला आहे) असे विभाग पडतात.
- प्रत्येक पारी फेलो विशिष्ट प्रदेशात एक वर्षभर काम करेल, यात कमीत कमी तीन महिने पूर्ण वेळ त्या प्रदेशाल्या लोकांबरोबर, समुदायांबरोबर प्रत्यक्ष काम करेल.
- अंदाजे ६० महिन्याच्या कालावधीमध्ये पारीकडे लिखित अहवाल, ध्वनीफिती, फिल्म्स, बोधपट, फोटो, संगीत आणि रोजच्या लोकांच्या रोजच्या जगण्यावरचे बोलके अल्बम गोळा झाले असतील - तेही देशाच्या प्रत्येक भागातून. एक असा दस्तावेज जो भारतीयांचं खरंखुरं प्रतिनिधीत्व करेल, विशेषतः ८३ कोटी ग्रामीण भारतीयांंचं. त्यांचे श्रम, हस्तकला कहाण्या, गाणी, कविता, कला आणि अजूनही बरंच काही. आम्ही फेलोंचं नेटवर्क उभं करत असताना त्याला देशाच्या सामाजिक रचनेचा संदर्भ असेल. शंभरेक फेलोंपैकी निम्म्या स्त्रिया असतील. दलित पत्रकार, आदिवासी पत्रकार आणि अल्पसंख्य समुदायांतील पत्रकारांचं योग्य प्रतिनिधीत्व यात असेल. अनेक कहाण्या रोजच्या, साधासुध्या माणसांनी स्वतःच सांगितलेल्या असतील. इतर वारसा असतो तसाच विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांसाठी, आपल्या लेकरांसाठी त्यांच्या आजूबाजूच्या दुनियेबाबतची ही जितीजागती पाठ्यपुस्तकं बनतील. आणि या देशाला त्याच्याबद्दल एक असा संग्रह मिळेल जसा आजपर्यंत कुठलाच बनलेला नाही.
- पारी ही बहुभाषिक साइट आहे. या साइटवर तुम्हाला असे अनेक लेख मिळतील ज्यावर ‘Choose language’ असं बटन असेल. काही लेख अनेक भाषांमध्ये आहेत, आणि काही तर चक्क १० भाषांमध्ये आहेत. आम्हाला लेख आणि भाषा दोन्ही वाढवायचे आहेत. पारीच्या ऑडिओ प्रकल्पाचं तर ध्येयच आहे की भारतातल्या ७८० भाषांपैकी प्रत्येक भाषा आम्हाला रेकॉर्ड करायची आहे.
एका फेलोला अर्थसहाय्य करा
याशिवाय रेकॉर्डिंग, दस्तावेजीकरण, संकलन आणि संपादन (लिखित व व्हिडिओ), प्रशिक्षण आणि बरंच काही.
तुम्ही कशी मदत कराल
आर्थिक सहाय्य करा
You can send in donations using a range of payment methods. All donations made to the CounterMedia Trust are eligible for exemption under Section 80G of the Income Tax Act, 1961.
काही उपकरणं देणगी म्हणून द्या
तुम्हाला जर काही (नवी किंवा वापरलेली) उपकरणं द्यायची असतील जी पारीचे फेलो किंवा ग्रामीण भागातले सहयोगी वापरू शकतील, तर आमच्याशी निश्चित संपर्क साधा. यामध्ये स्थिरचित्रण करणारा आणि व्हिडिओ कॅमेरा, ऑ़डिओ रेकॉर्डर, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर उपकरणांचा समावेश असू शकतो.
तुमच्या संपर्कामध्ये हे आवाहन पोचवा
तुम्ही तुमच्या मित्रपरिवारालाही पारीशी जोडून घ्यायला आणि त्यामध्ये सहभागी व्हायला सांगू शकता. तुमच्या देशाचं वार्तांकन करण्यात आमची मदत करा. ग्रामीण भारतावरचा एक अनोखं ज्ञानभांडार उभं करण्यात आमची मदत करा.
खरंं तर खूप काही करू शकता. पण प्रत्यक्षात पारीचा गाभा गट आणि सेवाभावी कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर मोठा खर्च उचलतात. त्यामुळे पत्रकारितेतला हा अनोखा प्रयोग यशस्वी व्हावा यासाठी तुम्ही दिलदारपणे आम्हाला सहाय्य करा असं आमचं आवाहन आहे. शासन आणि बड्या उद्योगांशिवाय आम्ही हे करू शकतो, आणि आम्ही ते करूच. पण तुमच्या सहभागाशिवाय मात्र हे शक्य होणार नाही.
आभारी आहोत,
मनापासून,
साइनाथ पी.