कलहांडी, ओदिशातील तामी चा चेहरा अगदी भारतीय आहे. अगदी तसाच तमिळ नाडूतल्या कांचीपुरमच्या राजेंद्रन चा. आणि अंदमानच्या ओहामे व अरुणाचल प्रदेशच्या मिची यारिंगचाही. आणि यातल्या कुणाच्याही चेहऱ्यात काडीचंही साम्य नाही.
पारीचं ध्येय आहे की भारताच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातले चेहरे टिपायचे. खरंच - हजारोंच्या संख्येत चेहरे कॅमेऱ्यात पकडायचे. भारतीय कसे दिसतात यातलं वैविध्य टिपायचं. अगदी प्रत्येक जिल्ह्यातून (आणि प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुका) आम्ही किमान एक प्रौढ पुरुष, एक प्रौढ स्त्री, आणि एक मूल किंवा किशोरवयीन व्यक्तीचा चेहरा प्रसिद्ध करण्याचं आमचं ध्येय आहे. हे अतिप्रचंड आहे आणि हे पूर्ण करायला वर्षानुवर्षं लागतील आणि खूप जणांचा सहभाग यात गरजेचा आहे. यात कुणीही सहभागी होऊ शकेल, अट एकच फोटो मात्र चांगल्या दर्जाचा हवा.
तुम्ही कसा भाग घ्याल
फोटो पाठवा
तुम्ही जो फोटो पारीला पाठवाल त्यासोबत फोटोतल्या व्यक्तीचे तपशील पाठवणं अतिशय महत्त्वाचं आहे.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चेहऱ्यांची दुनिया विभागासाठीच्या मार्गदर्शक सूचना वाचा.