“कुठल्याही देशाचा, भाषेचा किंवा धर्माचा इतिहास नेहमीच केवळ राजेरजवाड्यांच्या आणि जेत्यांच्या कहाण्यांनी भरलेला असतो. त्यात सामान्य माणसांचा आवाज आपल्याला फार क्वचित ऐकायला मिळतो. पण त्यांच्याशिवाय इतिहास असू शकतो का? राष्ट्राची, भाषेची निर्मिती तेच तर करतात. लोकांमध्ये धर्मही तेच घेऊन जातात. काळ सरतो आणि बलाढ्य उच्चभ्रूंची त्यावर मालकी प्रस्थापित होते,” कुनो राष्ट्रीय अभयारण्याच्या वेशीवर राहणाऱ्या सैद मेराजुद्दिन यांचे हे शब्द. अभयारण्यात आणि बाहेर राहणाऱ्या लोकांबरोबर अगदी जवळून काम करणाऱ्या मेराजुद्दिन यांनी लोकांचे हक्क कसे हिरावून घेतले जातात ते पाहिलं आहे. सामान्य माणसाची ही वेदना ते त्यांच्या कवितेतून मुखर करतात.

सैद मेराजुद्दिन यांच्या आवाजात ऊर्दू कविता ऐका

कवितेचा इंग्रजी अनुवाद प्रतिष्ठा पांड्या यांच्या आवाजात ऐका

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

ऐ दैर-ओ-हरम के मुख़्तारों
ए मुल्क-ओ-ज़बां के सरदारों
सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

ऐ ताज-बसर मीज़ान-ब-कफ़
तुम अदल-ओ-हिमायत भूल गए
काग़ज़ की रसीदों में लिखकर
इंसान की क़ीमत भूल गए
लिक्खो कि अभी मैं ज़िंदा हूं

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

माना कि तबीयत भारी है
और भूख बदन पर तारी है
पानी भी नहीं शिरयानों में
पर सांस अभी तक जारी है
संभलो कि अभी मैं ज़िंदा हूं

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

ऐ शाह-ए-सुख़न फ़र्ज़ाना क़लम
ये शोरिश-ए-दानम बंद करो
रोते भी हो तुम पैसों के लिए
रहने दो ये मातम बंद करो
बख़्शो कि अभी मैं ज़िंदा हूं

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

आईन-ए-मईशत किसने लिखे
आदाब-ए-सियासत किसने लिखे
है जिनमें तुम्हारी आग़ाई
वो बाब-ए-शरीअत किसने लिखे
लिक्खो के अभी मैं ज़िंदा हूं

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

ऐ पंद-गरान-ए-दीन-ओ-धरम
पैग़ंबर-ओ-काबा मेरे हैं
मंदिर भी मेरे भगवान मेरे
गुरुद्वारे कलीसा मेरे हैं
निकलो कि अभी मैं ज़िंदा हूं

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं

कह दो जाकर सुल्तानों से
ज़रदारों से ऐवानों से
पैकार-ए-तमद्दुन के हामी
बे-नंग सियासतदानों से
कह दो कि अभी मैं ज़िंदा हूं

सुन लो कि अभी मैं ज़िंदा हूं.

ऐका. मी आहे, अजून जिवंत आहे

मशिदी आणि मंदिरांच्या निर्मात्यांनो
राष्ट्राच्या सरदारांनो भाषांच्या पंडितांनो
ऐका. कारण मी आहे, अजून जिवंत आहे

मुकुट धारण करणाऱ्यांनो, तुला हाती धरणाऱ्यांनो
विसरलात न्याय आणि रक्षणाचा अर्थ
कागद बनतो मौल्यवान पैसा
पण माणूस ठरतो व्यर्थ
थांबा, कारण मी अजूनही जिवंत आहे.

ऐका. कारण मी आहे, अजून जिवंत आहे

अंगात नाही त्राण
भुकेने हैराण
सुकलेल्या शिरांमध्ये पाण्याचा नाही अंश
श्वास सुरू आहे, संपलेला नाही
थांबा, कारण मी अजूनही जिवंत आहे.

ऐका. मी आहे. अजूनही जिवंत आहे.

कायदे लिहिणाऱ्यांनो, चूक बरोबर ठरवणाऱ्यांनो
बुद्धीवंतांनो, ‘आम्ही जाणतो, आम्ही जाणतो’ म्हणत
लेखणी उगारत केलेला तुमचा कालवा बंद करा
पैशासाठी गळे काढणाऱ्यांनो थांबवा तुमचा हा शोक
सोडा. मी आहे. अजूनही जिवंत आहे.

ऐका, मी आहे. अजूनही जिवंत आहे.

अर्थकारणाचे हे कायदे बनवले कुणी?
या राजकारणाचे नियम लिहिले कुणी
ज्यामध्ये तुम्ही आहात, देव आणि सम्राट?
कुठल्या लेखणीने लिहिली सारी कलमं आणि अनुच्छेद?
आता लिहा. कारण मी आहे, अजूनही जिवंत आहे.

असाल तुम्ही नेते धार्मिक
पण प्रेषित आणि का’बा तर माझाच आहे ना.
मंदिर माझं, देवही माझा
गुरुद्वारा आणि चर्चही माझंच माझं.
चालते व्हा आधी इथून.
कारण मी आहे, अजूनही जिवंत आहे.

ऐका, मी आहे. अजूनही जिवंत आहे.

जा. सांगा त्या राजा-महाराजांना,
जमीनदार आणि मंत्रीमहोदयांना,
संस्कृती-संस्कृतीत कहल पेटवणाऱ्या
निर्लज्ज राजकारण्यांना...
सांगा. मी आहे, अजूनही जिवंत आहे.

ऐका. मी आहे, अजूनही जिवंत आहे.

मूळ कवितेचा इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पांड्या

Poem and Text : Syed Merajuddin

सैद मेराजुद्दीन एक कवी आणि शिक्षक आहेत. ते मध्य प्रदेशातील आगराचे रहिवासी आहेत. ते आधारशीला शिक्षा समिती या संस्थेचे सह-संस्थापक आणि सचिव आहेत. ही संस्था विस्थापनानंतर कुनो अभयारण्याच्या वेशीवर राहत असलेल्या आदिवासी आणि दलित मुलांसाठी माध्यमिक शाळा चालवते.

यांचे इतर लिखाण Syed Merajuddin
Illustration : Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

यांचे इतर लिखाण Labani Jangi
Editor : PARI Desk

PARI Desk is the nerve centre of our editorial work. The team works with reporters, researchers, photographers, filmmakers and translators located across the country. The Desk supports and manages the production and publication of text, video, audio and research reports published by PARI.

यांचे इतर लिखाण PARI Desk
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे