भातशेतीने पंजाबमधल्या किती तरी शेतकऱ्यांची उपजीविकाच हिरावून घेतली गेलीये, मन्सा आणि बर्नाला जिल्ह्यातले शेतकरी म्हणतात. राज्य सरकारने कबूल केलेला भाव आणि प्रत्यक्षात त्यांचं पीक कसं कमी भावाला विकत घेतलं याबद्दल ते सांगतात. मन्साच्या अलिशेर कालन गावातले वयोवृद्ध गुरजन्त सिंग म्हणतात, “शेतकऱ्याची जिंदगीच दुःखाने भरलीये.”

२९ नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्लीतील किसान मुक्ती मोर्चात सामील होण्यासाठी दिल्लीला आलेले हे शेतकरी काय बोलतायत ते या चित्रफितीत पहा. कर्जमाफी, शेतमालाला आधारभूत हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी या त्यांच्या काही मागण्या होत्या.

अनुवादः मेधा काळे

Subuhi Jiwani

सुबुही जिवानी पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत कॉपी एडिटर म्हणून काम करतात.

यांचे इतर लिखाण सुबुही जिवानी
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे