स्वामित्व हक्क, नोटीस आणि मजकुराचे पुनःप्रकाशन

पीपल्स अर्काइव्हफ रुरल इंडियावर उपलब्ध माहिती आणि साहित्य वेगवेगळ्या स्रोतांमधून प्रकाशित झालेलं आहे, ज्यातः

(१) कराराअंतर्गत पारीसाठी आणि पारीने तयार केलेला आणि प्रकाशित केलेला मजकूर

(२) बाह्य स्रोत आणि व्यक्तींचे काम (ज्यांनी आपले साहित्य वापरण्याची परवानगी दिली आहे, वैधानिक परवान्यांअंतर्गत तसंच इंटरनेट लिंक्सवरून कॉपी केलेले साहित्य, इ.)

वेबसाइटवर पारीद्वारा लिखित, निर्मित सर्व माहिती आणि साहित्याचा उल्लेख इथून पुढे “PARI Content” (पारी-साहित्य) असा करण्यात आला आहे आणि वर उल्लेखलेल्या (२) मधील मजकूर “3rd Party Content” (बाह्य स्रोतांमधून घेतलेला मजकूर) असा केला आहे.

सर्व पारी-साहित्य Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives, 4.0 International License खाली नोंदवण्यात आले असून आवश्यक तिथे पानांवर खालील लोगो देऊन हे सूचित करण्यात आले आहे.

Creative

या परवान्याचे तपशील पुढील लिंकवर सापडतील - http://creativecommons.org/licenses/by-nc-nd/4.0/legalcode. या परवान्याअंतर्गत तुम्हाला पुढील गोष्टींची परवानगी आहे

• शेअर करणे - कॉपी, वितरण आणि प्रसारण

• त्यासाठी पुढील अटी लागू असतील

(अ) संबंधित पानावर किंवा मजकुरासोबत पारीने ज्या पद्धतीने नमूद केलं असेल त्या पद्धतीनेच त्याचा निर्देश केला जावा. विशिष्ट नोंद नसेल तर ऋणनिर्देशासाठी “पी. साईनाथ, पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया, द काउंटर मीडिया ट्रस्ट, २७/४३, सागर संगम, बांद्रा रेक्लमेशन, मुंबई, ४०००५०, महाराष्ट्र, भारत.” अर्थात तुम्हाला किंवा तुम्ही जो मजकूर वापरताय त्याला पी. साईनाथ यांचे समर्थन आहे असं मात्र तुम्ही सुचवू शकत नाही.

(ब) तुम्ही हा मजकूर व्यावसायिक कारणासाठी वापरू शकत नाही

(क) तुम्ही हा मजकूर कोणत्याही प्रकारे बदलू शकत नाही, त्यात संपादन करू शकत नाही, त्याच्या आधारावर कोणत्याही स्वरुपात नवीन मजकूर तयार करू शकत नाही.

• स्वामित्व हक्क असणाऱ्यांनी/प्रकाशकांनी, अर्थात पी. साईनाथ/पारी यांनी परवानगी दिल्यास वरील अटी शर्ती शिथिल करता येऊ शकतात. त्यासाठी पलगुम्मी साईनाथ, २७/४३, सागर संगम, बांद्रा रेक्लमेशन, मुंबई ४०००५०, महाराष्ट्र, भारत या पत्त्यावर तुम्ही आपली विनंती पाठवू शकता.

बाह्य स्रोतांमधून घेतलेला मजकूर परवानगी घेऊन पुनःप्रकाशित केलेला असतो आणि त्यामुळे त्याला स्वामित्व हक्काचे नियम लागू होतात. 

बाह्य स्रोतांमधून घेतलेला सर्व मजकूर प्रकाशकांच्या परवानगीनुसार पुनःप्रकाशित केलेला असतो आणि त्यामुळे त्याला स्वामित्व हक्काचे नियम लागू होतात, अर्थात वेगळा काही उल्लेख नसेल तर. अशा मजकुराबाबत, भारतीय स्वामित्व हक्क कायदा, १९५७ मधील तरतुदी सोडता, (आणि जे साहित्य सार्वजनिकरित्या, किंवा एखादा खाजगी अभ्यास, संशोधन, समीक्षा किंवा परीक्षणासाठी कायदेशीर मार्गाने उपलब्ध आहे) कोणताही भाग, कोणत्याही स्वरुपात, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, प्रती काढून, चित्रण करून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पुनःप्रकाशित करता येणार नाही, कोणत्याही रिट्रायव्हल सिस्टिम मध्ये ठेवता येणार नाही, त्याचे पूर्ण किंवा अंशतः, खास करून व्यावसायिक हेतूने प्रसारण करता येणार नाही. पी. साईनाथ किंवा संबंधित स्वामित्व हक्क धारकांच्या परवानगीशिवाय अशा वापराची मुभा कुणालाही नाही. 


साहित्यावरील हक्काच्या उल्लंघनासंबंधी सूचना

जर तुम्ही स्वामित्व हक्काचे धारक असाल (एकमेव हक्कधारक असू शकतो), किंवा त्यांचे मध्यस्थ, आणि जर तुमच्या मते पारी वेबसाइटवर उपलब्ध असलेले काही साहित्य स्वामित्व हक्काचा भंग करून किंवा कराराचा भंग करून वापरण्यात आले असेल तर तुम्ही यासंबंधी खालील पत्त्यावर पारीला लेखी स्वरुपात तसं कळवू शकता.

तुमच्या सूचनेमध्ये या बाबी असणं बाध्य आहेः

(अ) ज्या स्वामित्व हक्काधीन मजकुराचा वापर झाला आहे अशा मजकुराची पुरेशी माहिती, जेणेकरून आम्ही तो शोधू शकू, एकाहून अधिक मजकूर असतील तर त्याची सविस्तर यादी

(ब) संबंधित मजकूर शोधून तो आम्हाला पाहता यावा यासाठीची पुरेशी माहिती

(क) तुम्हाला संपर्क साधायचा झाल्यास त्यासाठी आवश्यक माहिती, तुमचं नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी,

(ड) तुमच्याकडे संबंधित मजकुराचे हक्क आहेत का तुम्ही कुणाच्या वतीने आमच्याशी संपर्क साधला आहे याचे तपशील (संबंधित सर्व स्रोतांचे तपशील आणि त्यांच्यातील संबंध) 

(इ) ज्या कायद्याचं, परवाना किंवा कराराचं उल्लंघन झाल्याचा तुमचा दावा असेल त्याची माहिती

(फ) जर संबंधित मजकूर बाह्य स्रोतांमधून घेतलेला असेल आणि पारी वेबसाइटवर त्याच्या लिंक्स दिल्या असतील तर तुम्ही तुमच्या स्वामित्व हक्काचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात हक्कभंगाचा खटला दाखल कराल असा वचननामा. हा खटला योग्य न्यायक्षेत्र असणाऱ्या कोर्टात दाखल केला जाईल आणि नोटीस पाठवल्याच्या २१ दिवसांच्या आत त्या कोर्टाच्या संबंधित आदेशाची प्रत जोडावी लागेल.

पत्रव्यवहारासाठी पत्ताः

पी साईनाथ,

द काउंटर मीडिया ट्रस्ट
२७/४३ सागर संगम
बांद्रा रेक्लमेशन,
मुंबई - ४०००५०
महाराष्ट्र, भारत