एकीकडे पूर, दुष्काळ, फाळणी, दंगे तर दुसरीकडे जमीन आणि नोकऱ्या कबूल केल्यामुळे सुरुवातीला सुंदरबनमध्ये लोक स्थलांतरित होत होते. या भूमीवर वसलेल्या नागरिकांची ही गोष्ट. त्यांच्यासाठी ही भूमी म्हणजे ६०% पाणी आणि ४०% जंगल. या जंगलातही त्यांना भूक, आजार आणि वाघांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागला होता. पण अखेर ते इथे वसले.