“यंदा, शेतकरी-विरोधी कायद्यांच्या प्रती जाळून आम्ही लोहरी साजरी करतोय,” पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातून इथे आलेले सुखदेव सिंग म्हणतात. साठी ओलांडलेले सिंग यांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ शेतीच केलीये. सध्या हरयाणा-दिल्लीच्या सीमेवर सिंघु इथे आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसोबत तेही आहेत.

“आता, ही लोहरी वेगळीच आहे, म्हणा,” ते सांगतात. “एरवी आम्ही आमच्या घरी आमच्या नातेवाइकांसोबत हा सण साजरा केला असता, मित्रमंडळी घरी आली असती, आनंदीआनंद असता. यंदा मात्र आम्ही आमची घरं आणि रानं सोडून लांब आलोय. तरीही आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही काही इथून परत जाणार नाही. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत इथे बसावं लागलं तरी बेहत्तर.”

लोहरी हा लोकप्रिय सण मुख्यतः पंजाबमध्ये आणि उत्तरेकडच्या काही भागात साजरा केला जातो. मकर सक्रांतीच्या आदल्या रात्री (पंजाबी कालगणनेनुसार माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, सूर्याचं उत्तरायण सुरू होतं तेव्हा) साजरा केला जातो कारण वसंताचं आगमन आणि दिवस मोठा व्हायला सुरुवात होणार असते. लोक रात्री शेकोट्या पेटवतात, सूर्याला तीळ-गूळ, शेंगदाणे आणि इतर पारंपरिक पदार्थांचं अर्घ्य देतात आणि सोबत सुख समृद्धी आणि चांगल्या पीकपाण्याची प्रार्थना करतात.

या वर्षी सिंघु सीमेवर १३ जानेवारी रोजी आंदोलनाच्या मार्गावर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या गेल्या आणि त्यात तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रती जाळण्यात आल्या. शेतकऱ्यांनी एकजुटीचे नारे दिले आणि आपल्या ट्रॅक्टर्सशेजारी पेटवलेल्या या शेकोट्यांमध्ये कायद्याच्या कागदांची राख हवेत मिसळत असताना गाऊन-नाचून आपला आनंद व्यक्त केला.

शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.

PHOTO • Anustup Roy

पंजाबच्या शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरमध्येच मोर्चाची गाणी म्हणतायत, लोहरीची सुरुवात या गाण्यांनी होतीये

PHOTO • Anustup Roy

पंजाबचा हरप्रीत सिंग आणि हरयाणाचा रोहित आंदोलनात सहभागी हे दोघं शेतकरी लोहरीच्या शेकोट्या पेटण्याआधी ढोलक वाजवतायत

PHOTO • Anustup Roy

लोहरीच्या खास लंगरसाठी रोट्या बनतायत – यंदा कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पक्का आहे

PHOTO • Anustup Roy

लोहरीसाठी खास पक्वान्न – जिलब्या तळल्या जातायत

Left: Posters announcing that the three farm laws will be burnt at 7 that evening on the occasion of Lohri. Right: Farmers raise slogans as the Lohri fire burns.
PHOTO • Anustup Roy
Left: Posters announcing that the three farm laws will be burnt at 7 that evening on the occasion of Lohri. Right: Farmers raise slogans as the Lohri fire burns.
PHOTO • Anustup Roy

डावीकडेः संध्याकाळी सात वाजता लोहरीच्या निमित्ताने तीन कृषी कायदे जाळण्यात येणार आहेत हे जाहीर करणारं पोस्टर. उजवीकडेः लोहरीची आग पेटली आणि शेतकऱ्यांच्या घोषणा दुमदुमल्या

PHOTO • Anustup Roy

एक शेतकरी लोहरीच्या शेकोटीत कृषी कायद्यांच्या प्रती पेटवतोय

PHOTO • Anustup Roy

आणखी काही शेकोट्या आणि कायद्याच्या प्रती ज्वाळांमध्ये

PHOTO • Anustup Roy

‘यंदा, शेतकरी-विरोधी कायद्यांच्या प्रती जाळून आम्ही लोहरी साजरी करतोय,’ पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातून इथे आलेले सुखदेव सिंग म्हणतात

PHOTO • Anustup Roy

तिन्ही सांजा कलत जातात तसं शेतकरी नाचू-गाऊ लागतात. ‘आता, ही लोहरी वेगळीच आहे, म्हणा,’ ते सांगतात. ‘एरवी आम्ही आमच्या घरी आमच्या नातेवाइकांसोबत हा सण साजरा केला असता, मित्रमंडळी घरी आली असती, आनंदीआनंद असता. यंदा मात्र आम्ही आमची घरं आणि रानं सोडून लांब आलोय. तरीही आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही काही इथून परत जाणार नाही. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत इथे बसावं लागलं तरी बेहत्तर’

Anustup Roy

अनुस्तुप रॉय, कोलकाता के सॉफ्टवेयर इंजीनियर हैं. जब वह कोडिंग नहीं कर रहे होते, तो अपने कैमरे के साथ भारत का भ्रमण करते हैं.

की अन्य स्टोरी Anustup Roy
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले