दल सरोवरः बुडत्या आरोग्यसेवेला थोडासा आधार

श्रीनगरच्या दल सरोवरातल्या बेटांवर राहणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि पर्यटन व्यवसायातल्या लोकांसाठी गावातले ‘डॉक्टर’ बनलेले केमिस्ट सोडता आरोग्यसेवा उपलब्ध नाही कारण इथली एकमेव पीएचसी बहुधा बंदच असते

१५ जून २०२१ । आदिल रशीद

चालणं, खेळणं, किंवा शाळा, मोहसीनला जमायचं नाही

श्रीनगरच्या दुर्गम राख-ए-अर्थ पुनर्वसन वसाहतीत स्थायिक झाल्यापासून अखून कुटुंबाला आपल्या सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या मुलाचे उपचार करणं आणि मजुरी मिळवणं कठीण झालं आहे

३१ मे २०२१ । कनिका गुप्ता

काश्मिरातली भातकाढणी स्थलांतरित मजुरांविनाच

मध्य काश्मीरमध्ये सध्या भाताच्या कापणीचं काम फार अवघड होऊन बसलंय. स्थानिक मजुरांपेक्षा कमी मजुरीत काम करणाऱ्या कुशल स्थलांतरित कामगारांना टाळेबंदीमुळे परत जावं लागलंय आणि आता इथले शेतकरी हे पीक सोडून द्यावं का अशा विचारात आहेत

२६ नोव्हेंबर २०२० । मुझमिल भट

श्रीनगरच्या दल लेकमध्ये नौका कधी तरणार?

मागील वर्षी कलम ३७० रद्द केल्यानंतर लागू झालेल्या बंदच्या पाठोपाठ ऐन पर्यटनाच्या हंगामात दल लेकच्या अर्थव्यवस्थेवर कोविड-१९ टाळेबंदीचा घाला बसला. आणि त्यामुळे शिकारावाले, हाऊसबोट मालक आणि दुकानदार या सर्वांच्या वाट्याला प्रचंड नुकसान आणि बेकारीही आली आहे

२९ मार्च २०२१ । आदिल रशीद

चरार-इ-शरीफच्या कांगरीची ऊब

काश्मीरच्या गोठवणाऱ्या थंडीत फुललेले निखारे ठेवण्यासाठी वापरात येणाऱ्या वेताच्या टोपलीने झाकलेल्या कांगऱ्यांना मोठी मागणी असते, आणि या हंगामी उद्योगावर अनेक कारागीर, शेतकरी आणि मजुरांचा उदरनिर्वाह होतो

१२ फेब्रुवारी २०२० । मुझमिल भट

काश्मीरला पडलेला असाही एक विळखा

अंमली पदार्थांचं व्यसन वाढत गेलं आणि अझलनचे पालक त्याला श्रीनगरच्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन आले, जिथे आधीच किती तरी तरुण मुलं दाखल झाली आहेत कारण काश्मीरमध्ये हेरॉइनचा वापर एखाद्या ‘साथीसारखा’ पसरतोय

२० फेब्रुवारी २०२० । शफाक शाह

पुलवामातल्या केशराचा विरता रंग

केशराची शेती करणाऱ्यांचे दिवस चांगले नाहीत – लवकर सुरू झालेली बर्फवृष्टी, कलम ३७० हटवल्यानंतर घालण्यात आलेले निर्बंध आणि मजुरांचा तुटवडा यामुळे आधीच घसरणीला लागलेल्या या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे

७ जानेवारी २०२० । मुझमिल भट

श्रीनगरचे शिकारेः स्तब्ध पाण्यात, खोल गर्तेत

ऑगस्ट महिन्यात सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडून जाण्याची सूचना जारी केली होती ती जरी मागे घेतली असली तरी शिकारावाल्यांना फारसं गिऱ्हाईकच मिळत नाहीये. सहा महिन्यांच्या पर्यटनाच्या मोसमातून त्यांची वर्षाची बेगमी होते पण आता मात्र अनेकांपुढे संकट आ वासून उभं आहे

१३ डिसेंबर २०१९ । मुझमिल भट

या श्रमाला फळ नाहीः काश्मिरी सफरचंदांची कथा

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर राज्यात जी काही अनिश्चितता तयार झाली, त्यात काश्मीरच्या सफरचंद बागांच्या मालकांचं आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ५ ऑगस्ट रोजी हे कलम हटवलं गेलं आणि त्यांचा खरेदी विक्रीचा हंगामही तेव्हाच सुरू झाला

६ नोव्हेंबर २०१९ । मुझमिल भट

‘आम्ही डोंगरदेवाचा रोष ओढवून घेतलाय बहुतेक’

लडाखच्या पर्वतराजींच्या अतिशय बिकट परिसंस्थांमधलं वातावरण झपाट्याने बदलत असल्याने तिथल्या उंचावरच्या भटक्या चांगपा पशुपालकांची याक आधारित अर्थव्यवस्था गर्तेत सापडली आहे

२५ जुलै २०१९ । रितायन मुखर्जी

पश्मिना शालीची कहाणी विणताना

तिबेटी पठारावरील चांगथांगी शेळीपासून श्रीनगरच्या विक्री दुकानापर्यंत - पश्मिना शाल तयार होण्यात गुराखी, ठोक विक्रेते, सूत कातणारे, रंगारी, नक्षी व भरतकाम करणारे कारागीर आणि उद्योजक अशा सर्वांचा हातभार लागतो

१ जुलै २०१९ । प्रबीर मित्रा

स्त्रियाः पर्वत लांघणाऱ्या, वाळवंट पार करणाऱ्या

८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने तीन भटक्या पशुपालक समुदायांमधल्या स्त्रियांवरचा पारीचा हा चित्र निबंध – लडाखच्या चांगपा, अरुणाचलच्या ब्रोपका आणि कच्छच्या फकिरानी जाट

१२ एप्रिल २०१९ । रितायन मुखर्जी

तोसामैदानः गोळीबार, मैदानं, अपेष्टा

सैन्य दलाच्या गोळीबार सराव मैदानामुळे अनेक स्थानिकांचे जीव गेल्यानंतर आणि सोबतच बडगमच्या पहाडातली गायरानं उद्ध्वस्त झाल्यानंतर सैन्यदलाच्या परवान्याचं २०१४ मध्ये नूतनीकरण होणार नाही यासाठी स्थानिकांनी मोठा संघर्ष केला. तरीही अजून समस्या आहेतच

१० मे २०१९ । फ्रेनी माणेकशा

एक संग्रहालय आठवणींचं – आणि क्षेपणास्त्रांचं

हुंदरमान, कारगिलच्या नियंत्रणरेषेजवळचं एक दूरवरचं गाव. दोन शत्रूराष्ट्रांच्या भांडणात अडकलेल्या या गावाने आता त्याचा इतिहास आणि अंतरंग सगळ्या जगासाठी खुलं केलंय – निर्मनुष्य असणारी तिथली घरं आता इतिहासाचं जतन करणारी वारसा स्थळं बनली आहेत

२३ ऑगस्ट २०१८ । स्टॅन्झिन सॅल्डन

कारगिलच्या अर्थकारणाची ‘कमांडर’ शिखरं

कारगिल, लडाखमधला हा एक विलक्षण बाजार आहे – तीन दुकानाचा अपवाद सोडता इथली सगळी दुकानं बाया चालवतात – या बाजाराची सुरुवात आणि त्याच्या यशाच्या कहाण्या नक्कीच प्रेरणादायी आहेत

१३ फेब्रुवारी २०१८ । स्टॅन्झिन सॅल्डन

‘माझा प्रिय माग, माझा वारसा’

लडाखच्या स्नेमो गावातले त्सेरिंग आंगचुक शेतात काम नसतं तेव्हा आपला फिरता माग घेऊन गावोगावी जातात आणि लोकरीचं कापड विणतात, त्यांची खासियत असलेलं हे कापड ‘स्नाम्बू’ म्हणून ओळखलं जातं

३० जून २०२१ । स्टॅन्झिन सॅल्डन

काश्मिरी लोकर बनविणारे चांगपा

लडाखच्या हॅन्ले दरीखोऱ्यातले भटके चांगपा, पश्मिना जातीच्या मेंढ्या पाळतात, उंचावरच्या कुरणांमध्ये राहतात आणि आजही त्यांनी वस्तुविनिमय प्रणाली वापरात ठेवली आहे - पण त्यांचं जगणं आता बदलतंय. या चित्र निबंधात चांगपा कार्मा रिंचेनच्या समुदायाचं आयुष्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

२१ ऑगस्ट २०१७ । रितायन मुखर्जी

Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale