धन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर
१४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. यातल्या या पहिल्या पाच ओव्या बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायल्या आहेत. बुद्ध, भीमराव, धम्म, संघ आणि रमाबाईंवर या ओव्या रचल्या आहेत
५ मे २०१७ । नमिता वाईकर व जात्यावरची ओवी गट





















