नोटाबंदीचं भूत - वर्ष झालं तरी मानगुटीवर
नोटाबंदीने झटका देऊन एक वर्ष झालं तरी अजूनही कर्नाटकातल्या लहान गावांमधल्या खानावळींवरच्या त्याच्या खुणा मिटलेल्या नाहीत
मार्च ५, २०१८ । पी. साईनाथ


नोटबंदीने काढून घेतला नाशिकच्या टोमॅटोंचा सॉस
संपूर्ण देशात प्रत्येकी चार टोमॅटोंपैकी एक टोमॅटो जिथून जातो, त्या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात, ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणानंतर, सातत्याने पडत जाणार्या शेतमालाच्या किंमतींमुळे, शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची उभीच्या उभी पिके नष्ट करत आहेत
जानेवारी १३, २०१७। अनिकेत आगा व चित्रांगदा चौधरी
आंध्र प्रदेशातल्या बुचरलाची स्थलांतरित दलित कुटुंबं जेव्हा नोव्हेंबरमध्ये सणासाठी आपापल्या गावी परतली तेव्हा गावात रोकड टंचाई आणि कमी उत्पादनामुळे शेती संकटात होती, अर्थात त्यांच्या हाताला कामच नव्हतं – भर सणात अर्धपोटी राहण्याची वेळ आली त्यांच्यावर
नोव्हेंबर ६, २०१७। राहुल एम.
नोटाबंदीमुळे मनीऑर्डर विस्कळित झाल्या आणि महाराष्ट्रातल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या भुकेलेल्या कुटुंबांना पैसे पाठवणं अशक्य झालं . औरंगाबादच्या अडूळमध्ये पाच राज्यांतल्या कामगारांचा झगडा चालू आहे बँक व्यवस्थेशी, जी त्यांना समजतही नाही आणि जी त्यांच्यासाठी कामच करत नाही
मार्च ६, २०१८। पी. साईनाथ
निश्चलनीकरणाच्या निराशेच्या गर्तेत खोल रूतत असतांना उस्मानाबादची बँक दोन साखर कारखान्यांकडून ३५२ करोड रूपये वसूल करण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाही, मात्र त्याचवेळी २०,००० शेतकर्यांना १८० करोड रूपयांच्या कर्जासाठी सार्वजनिक अपमानाची भीती घालून धमकावत आहे
डिसेंबर ११, २०१६। पी. साईनाथ
आंध्रप्रदेशच्या ताडीमर्री गावातल्या खताच्या दुकानात केवळ जुन्या नोटा घेतल्या जातायत म्हणून दुष्काळग्रस्त भुईमूग शेतकरी त्यांचे उसने फेडण्यासाठी रांगा लावून उभे आहेत – आणि हाताला काम नसणाऱ्या शेतमजुरांनी नोटा बदलायचा अजून सोपा मार्ग शोधलाय, गावातल्या दारूच्या दुकानातून दारू विकत घ्यायची
मार्च ५, २०१८। राहुल एम.
हा खरं तर विदर्भातल्या कृषी बाजारांसाठी धामधुमीचा काळ असायला हवा. पण इथे मात्र शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागतो आहे – पाडलेले भाव, नाशवंत मालाची नुकसानी आणि जिथून कर्जं काढली आहेत त्या बँकांमध्ये जुन्या नोटांमध्ये पैसे भरावे लागण्याची भीती
नोव्हेंबर ६, २०१७। जयदीप हर्डीकर
भारतातलं ८६ टक्के चलन सरकारने बेकायदेशीर ठरवलं तेव्हा तेलंगणच्या धर्मारम गावच्या वरदा बालय्यांचं कर्ज फेडण्यासाठी जमीन विकून पैसा उभा करण्याचं स्वप्न मातीमोल झालं. त्यांनी आत्महत्या केली आणि आपल्या कुटुंबालाही विष पाजलं.
फेब्रुवारी २२, २०१८। राहुल एम.
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/नोटाबंदीच्या-वार्ता-पारीवर