ऑगस्ट महिन्यात सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडून जाण्याची सूचना जारी केली होती ती जरी मागे घेतली असली तरी शिकारावाल्यांना फारसं गिऱ्हाईकच मिळत नाहीये. सहा महिन्यांच्या पर्यटनाच्या मोसमातून त्यांची वर्षाची बेगमी होते पण आता मात्र अनेकांपुढे संकट आ वासून उभं आहे