चूक जरी नाही तरी मनी वहीम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

एखाद्या लोकगीताची सुरुवात अशा ओळींनी व्हावी हे तसं अवचितच. पण बायकोला मारणं हे वास्तव आहे आणि ते केवळ हे लोकगीत गायलं गेलंय त्या गुजरातच्या कच्छमधलंच नाही तर अख्ख्या देशाचं वास्तव आहे हे मात्र दुर्दैवाने अवचित राहिलेलं नाही.

अगदी जवळच्या नात्यातली हिंसा, पत्नीला मारहाण ही अख्ख्या जगाची समस्या आहे. स्त्रियांच्या मानवी हक्कांचं घोर उल्लंघन तर आहेच पण सार्वजनिक आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे हा. संयुक्त राष्ट्रसंघाने संकलित केलेल्या स्त्रियांवरील हिंसंवरील आकडेवारीवरून असं दिसतं की दर तीलातल्या एका बाईला तिच्या जोडीदाराकडून शारीरिक किंवा लैंगिक हिंसा सहन करावी लागते.

नवऱ्याने बायकोला मारण्याचं समर्थन होऊ शकतं का?

गुजरातेत ३० टक्क्यांहून अधिक स्त्रिया आणि २८ टक्के पुरुष अशा मारहाणीचं समर्थन करत असल्याचं एनएफएचएस – ५ (२०१९-२१) या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. कोणत्या कारणाने बायकोला मारहाण केली तर चालते? चारित्र्यावर संशय, वाद घालणे, शरीरसंबंधास नकार, पतीला न सांगता बाहेर जाणे, घराकडे दुर्लक्ष आणि चांगला स्वयंपाक न करणे या कारणांवरून मारहाण होऊ शकते.

देशाच्या पातळीवर असे सर्वे आणि आकडेवारी मिळते. लोकगीतं मात्र मनाचा मागोवा घेतात. स्त्रियांच्या मनात काय सुरू असतं, त्यांच्या समाजात काय काय घडतं हे अशा गाण्यांमधून आपल्या समोर येतं.

आता ही गाणं शोषितांना बळ देतात का? विभिन्नं मतं असू शकतात. हे गाणं पारंपरिक मात्रेत आहे, गाण्याची चाल प्रेमगीतांसारखी आहे. पण त्याच्या आडून गाणारी बाई मनातल्या मनात आपल्या पतीला लाखोली तर वाहत नाहीये ना? आपल्या पतीचा उल्लेख मालधारी राणो असा आदराने करणाऱ्या तिच्या मनातला विद्रोह तर या गाण्यातून दिसत नाही ना?

या गाण्यातून स्त्रियांना न्याय मिळावा असं काहीही नाही. किंवा प्रस्थापित समाजरचनेला धक्का लागावा असंही फारसं काही त्यात नाही. पण ही गाणी म्हणजे तिच्या रोजच्या जगण्यातलं अपार दुःख, पीडा आणि वेदना बाहेर काढण्याचा मार्ग आहेत. एरवी कुणालाच सांगता येणार नाही अशी ही वेदना या गाण्यातून फार जोरकसपणे बाहेर पडते. सहज साध्या सुरातून दुःख व्यक्त करते. कदाचित रुळलेल्या चालीत गाता गाता ती आपल्या जगण्याचं असह्य वास्तव लपवून टाकते आणि आला दिवस ढकलत पुढच्या दिवसाला सामोरं जाण्याची ताकद मिळवते. कारण त्या सुरांपलिकडे तिला असं बळ देणारं या समाजात दुसरं काहीच नाहीये.

जुमा वाघेर यांच्या आवाजात हे गाणं ऐका

કરછી

રે ગુનો જો મારે મૂ મે ખોટા વેમ ધારે,
મુંજા માલધારી રાણા મૂકે રે ગુનો જો મારે

રે ગુનો જો મારે મૂ મે ખોટા વેમ ધારે,
મુંજા માલધારી રાણા મૂકે રે ગુનો જો મારે

કડલા પૅરીયા ત છોરો આડી નજર નારે (૨),
આડી નજર નારે મૂ મેં વેમ ખોટો ધારે
મૂજો માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે (2)
રે ગુનો જો મારે મૂ મેં ખોટા વેમ ધારે
મૂજો માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે

બંગલી પૅરીયા ત મૂંજે હથેં સામૂં  નારે (૨)
હથેં સામૂં નારે મૂ મેં વેમ ખોટો ધારે
રે ગુનો જો મારે મૂ મેં ખોટા વેમ ધારે
મૂજો માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે
માલધારી રાણા મૂકે રે ગુનો જો મારે (2)
રે ગુનો જો મારે મૂ મેં ખોટા વેમ ધારે
મૂજો માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે

હારલો પૅરીયા ત મૂંજે મોં કે સામૂં નારે (૨)
મોં કે સામૂં નારે મૂ મેં ખોટા વેમ ધારે,
રે ગુનો જો મારે મૂ મેં ખોટા વેમ ધારે
મૂજો માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે (2)
રે ગુનો જો મારે મૂ મેં વેમ ખોટો ધારે,
મૂજો માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે

નથડી પૅરીયા ત મૂંજે મોં કે સામૂં નારે (૨)
મોં કે સામૂં નારે મૂ મેં વેમ ખોટો ધારે,
મૂજા માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે (2)
રે ગુનો જો મારે મૂ મેં વેમ ખોટો ધારે,
માલધારી રાણૂ મૂકે રે ગુનો જો મારે

मराठी

चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

पायी पैंजण ल्याले तरी रागे रागे पाही
रागे रागे पाही आणि मनी वहिम घेई
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.
चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

हातातल्या काकणाला डसे नजर त्याची
डसे नजर त्याची मनी वाट संशयाची
चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.
मालधारी राणा मला उगाचच मारी.
चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

गळ्यातली कंठी आणि मुखाकडे पाही
मुखाकडे पाही आणि मनी वहिम घेई
माझा मालधारी राणा, कसा संशयाने पाही.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.
चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

नाकातल्या नथनीकडे रागे रागे पाही
रागे रागे पाही आणि मनी वहिम घेई
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.
चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.

गाण्याचा प्रकारः पारंपरिक लोकगीत

विभागः जागृतीची गाणी

गीतः १४

शीर्षकः मुजो मालधारी राणो मुके जे गुणो जो मारे

संगीतः देवल मेहता

गायनः जुमा वाघेर, भद्रेसर, ता. मुंद्रा, जि. कच्छ

वाद्यसंगतः ढोल, हार्मोनियम, बँजो

ध्वनीमुद्रणः केएमव्हीएस स्टुडिओ, २०१२

इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पांड्या

सूरवाणी या कम्‍युनिटी रेडिओ स्‍टेशनने अशा ३४१ लोकगीतांचं ध्‍वनिमुद्रण केलं आहे. कच्छ महिला विकास संघटन ( केएमव्‍हीएस) कडून ते पारीकडे आलं आहे.

विशेष आभार: प्रीती सोनी, अरुणा ढोलकिया, सचिव, केएमव्‍हीएस; अमद समेजा, प्रोजेक्‍ट कोऑर्डिनेटर, केएमव्‍हीएस; गीताचा गुजराती अनुवाद करणार्‍या भारतीबेन गोर

Series Curator : Pratishtha Pandya

Pratishtha Pandya is a Senior Editor at PARI where she leads PARI's creative writing section. She is also a member of the PARIBhasha team and translates and edits stories in Gujarati. Pratishtha is a published poet working in Gujarati and English.

Other stories by Pratishtha Pandya
Illustration : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale