पन्नाशी ओलांडलेल्या अशोक राणी गोंड स्वतः कधीच शाळेत गेल्या नाहीत, पण त्यांचा नऊ वर्षांचा नातू मात्र शाळेचा एकही दिवस चुकवत नाही, त्या हसत सांगतात. (एक भी दिन नहीं छोडा) "त्याने एकही दिवस चुकवलेला नाही," त्या 'पारी'ला सांगतात.
त्यांचा नातू दाबा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या ३९ मुलांपैकी एक आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ५०० लोकसंख्येचं हे गाव दमोह जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात वसलंय. सभोवताली लहान टेकड्या, मोकळी कुरणे आणि शेतजमिनीचे तुकडे आहेत. इथली बहुतेक कुटुंबं—प्रामुख्याने गोंड आदिवासी—थोड्याफार प्रमाणात शेती करतात आणि गुरं पाळतात.
इथल्या अनेक प्रौढ व्यक्ती कधीच शाळेत गेलेल्या नाहीत - २०१३ च्या एका अहवालानुसार, ५० टक्के गोंड आदिवासी साक्षर नाहीत.
त्यामुळे दाबा शाळेत नेहमीच असे काही विद्यार्थी असतात जे शाळेत जाण्यास फारसे उत्सुक नसतात. ऋतूनुसार त्यांची संख्या बदलत राहते, जेव्हा हाताला काम नसतं आणि कुटुंबं रोजगारासाठी आपल्या लहान मुलांना घेऊन स्थलांतर करतात, तेव्हा शाळेतील गैरहजेरी वाढते. काही मुलं केवळ घराभोवती खेळण्यासाठी घरीच राहणे पसंत करतात ६ ते ९ वर्षांच्या मुलांना आंबा, पेरू आणि इतर झाडांवर चढणं यांचं अभ्यासापेक्षा कितीतरी पटीने जास्त आकर्षण असतं.
शाळेतल्या दोन शिक्षकांपैकी एक ताराचंद यादव हे याच गावात जन्मले आणि मोठे झालेत. या शाळेत यायला कचरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक युक्ती शोधली आहे. एखाद-दोन दिवस वाट पाहिल्यानंतर ते खिशात काही चॉकलेट्स घेऊन शाळेत न येणाऱ्या मुलांच्या घरी जातात. "मी आधी पालकांशी बोलतो आणि त्यांना मुले शाळेत पाठवण्याची विनंती करतो," ते म्हणतात. पालक मला म्हणतात, “मास्तर, आम्ही मजुरीसाठी पहाटेच घराबाहेर पडतो... आम्ही तरी काय करणार?”















