
SANGUR, PUNJAB
|MON, JAN 15, 2024
बहुरंगी लैंगिकतेच्या दुनियेत
आपली लैंगिकता, लैंगिक कल, आवड-निवड आणि आचार या सगळ्या पैलूंचा विचार करत अनेक जण आपली स्वतःची लैगिक ओळख ठरवत असतात. इंग्रजीमध्ये एलजीबीटीक्यूएआय+ अशा अक्षरसमूहाने ज्यांचा उल्लेख केला जातो ती ही माणसं म्हणजे समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी, इंटरसेक्स, क्वियर, अलैंगिक आणि इतरही विविध लैंगिक ओळख असलेली आपल्या आसपासचीच माणसं. सामाजिक स्तरावर आणि कायद्याने आपल्याला मान्यता मिळावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. पारीवर प्रकाशित झालेल्या या काही गोष्टींमधून अगदी मूलभूत हक्कांसाठी या मित्र-मैत्रिणींना किती झगडावं लागतं ते लक्षात येतं. वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी देखील त्यांना समाजाची मान्यता, न्याय, स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. भारतभरातल्या या काही गोष्टींमधून आपल्याला या सगळ्यांचं म्हणणं ऐकायला मिळतं. आणि फक्त संघर्षच नाही तर एकट्याने किंवा सगळ्यांसोबत साजरा केलेला आनंदही
Author
Translator
9. वेगळी लैंगिकता, साधी माणसं, रोजचं जगणं
जून हा प्राइड महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पारी ग्रंथालय महानगरांच्या झगमगाटापासून दूर गावपाड्यात राहणाऱ्या वेगळी लैंगिकता असलेल्या लोकांच्या रोजच्या जगण्याचा मागोवा घेत आहे. वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी देखील वाट्याला येणारा नकार आणि भेदभावाच्या या कहाण्या आहेत
8. धरमशालातला आत्मसन्मानाचा 'प्राइड' मोर्चा
हिमाचल प्रदेशात आयोजित केलेल्या पहिल्या वहिल्या प्राइड मोर्चामध्ये लोक एकत्र आले आणि त्याद्वारे हरतऱ्हेचा लैंगिकता असलेल्या व्यक्तींच्या हक्कांचं समर्थन करण्यात आलं
7. ट्रान्स समुदायाचं जग रंगमंचीय अवकाशात
नाटकामध्ये काम करण्याची संधी ट्रान्स व्यक्तींना क्वचितच मिळते. ३१ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या इंटरनॅशनल डे ऑफ ट्रान्सजेण्डर व्हिजिबिलिटीच्या निमित्ताने ट्रान्स समुदायाचा भेदभावाच्या विरोधातील लढा आणि या समुदायाच्या जगण्याभोवती गुंफलेल्या संदकारंग या नाट्यप्रयोगाची काही क्षणचित्रं
6. महानगरात प्रेमापार…
महाराष्ट्राच्या एका खेड्यातल्या एका तरुण मुलीची आणि एका पारलिंगी, ट्रान्सपुरुषाची ही प्रेमकथा सामाजिक स्वीकार, न्याय, स्वतःची ओळख आणि भविष्य यासाठी त्यांनी एकत्रितपणे दिलेल्या झगड्याची
5. ‘भारतासाठी काही मला परत खेळता आलं नाही’
पश्चिम बंगालच्या बोनी पालला इंटरसेक्स लैंगिकतेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर फूटबॉल खेळता आला नाही. २२ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय इंटरसेक्स मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने बोनी आपली लैंगिक ओळख आणि आयुष्यात केलेला संघर्ष याबद्दल सांगतोय
4. मदुरैच्या तृतीयपंथी कलावंत: शोषित, एकाकी, कफल्लक
लोकांनी छळलं, घरच्यांनी हाकलून लावलं, उपजीविकेची साधनं उरली नाहीत – तमिळनाडूतील तृतीयपंथी लोककलावंतांना दुष्काळात तेरावा महिनाच सोसावा लागलाय
3. मदुरैतील तृतीयपंथी लोककलावंतांची व्यथा
महामारीमुळे तमिळनाडूतील अनेक लोककलावंतांचं जीवन उद्ध्वस्त झालं असून त्यातही ट्रान्सजेन्डर किंवा तृतीयपंथी महिला कलावंतांना सर्वांत जास्त फटका बसलाय – हाती काहीच काम किंवा कमाई नाही, आणि शासनाकडून अनुदान किंवा लाभही मिळत नाही
2. ‘आम्ही भूत असल्यासारखं लोक आमच्याकडे पाहतात’
इचलकरंजीतल्या तृतीयपंथी व्यक्तींना सगळीकडे भेदभावाला सामोरं जावं लागतं – घरात, शाळेत, घर मिळण्यात आणि रस्त्यावरही. सामान्य माणूस म्हणून घेण्यासाठी आणि थोडी फार प्रतिष्ठा असलेलं काम मिळवण्यासाठी त्यांचा झगडा सुरू आहे
1. ‘कधी तरी हा समाज आम्हाला स्वीकारेल’
या वर्षी २५ एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या तमिळ नाडूतल्या कुवागम उत्सवात अनेक हिजडे सहभागी होतात. ते इथे येतात ते गायला, नाचायला, रडायला आणि प्रार्थना करायला – पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीही त्यांना बहिष्कृत करेल या भीतीशिवाय जगायला
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/everyday-lives-of-queer-people-mr









