तिशीतला गणेश पंडित हा नवी दिल्लीतल्या लोहा पूल या जुन्या यमुना पूलाजवळच्या भागातला सर्वात तरुण व्यक्ती असेल कदाचित. त्याच्या समाजातले इतर तरुण जवळच्या चांदनी चौक भागातल्या पोहण्याचे प्रशिक्षक म्हणून किंवा दुकानांमध्ये नोकरी करण्याला प्राधान्य देतात असं त्याने सांगितलं.

दिल्लीतून वाहणारी यमुना नदी ही गंगेची सर्वात जास्त लांबीची उपनदी आहे आणि आकारमानाच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी (घाघरा प्रथम क्रमांकावर आहे) उपनदी आहे.

पंडित यमुनेवर छायाचित्र काढून देण्याची व्यवस्था करतो तसंच ज्यांना यमुनेच्या पात्रात जाऊन काही धार्मिक विधी करायचे आहेत त्यांना नावेतून यमुनेच्या पात्रात घेऊन जातो आणि परत सोडतो. तो म्हणतो, “जिथं विज्ञान अपयशी ठरतं तिथं विश्वास कामी येतो.” त्याचे वडील तिथले पुजारी आहेत. तो आणि त्याचे दोन्ही भाऊ लहान असतानाच यमुनेत पोहायला शिकले. गणेशचे भाऊ फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जीवरक्षक म्हणून काम करतात.

PHOTO • Shalini Singh
PHOTO • Shalini Singh

डावीकडेः दिल्लीतल्या लोहा पूल  भागात राहणारा यमुनेत नावाडी म्हणून काम करणारा ३३ वर्षीय गणेश पंडित. उजवीकडेः पुलावरील सूचनाफलकामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व समजते

PHOTO • Shalini Singh
PHOTO • Shalini Singh

डावीकडेः गणेश पंडित आपली नाव जिथं लावतो तिथली झाडंझुडपं , पशुपक्षी आणि घाण. उजवीकडेः नदीजवळ असलेल्या टेकडीवर केल्या जाणाऱ्या तंत्र आणि मंत्र विधीसाठी लोकांनी आणलेल्या सामग्रीची रिकामी पाकिटं गणेश पंडितसारखे नावाडी या लोकांना पैसे घेऊन नदीपात्रात घेऊन जातात

गणेश सांगतो, “लोकांना आपल्या मुलीचं लग्न नावाड्यासोबत लावून द्यायचं नाहीये; कारण या व्यवसायाला मान नाही. कमाईही फारशी नाही. मी नावेतून लोकांची ने-आण करुन दिवसाला ३०० ते ५०० रुपये कमावतो. नदीत छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यासाठी मदत केली तर मला बऱ्यापैकी पैसे मिळतात.”

दहा वर्ष झाली तो हे काम करतोय. नदीचं पाणी प्रदूषित होतंय आणि त्याची त्याला हळहळ वाटते. “सप्टेंबर महिन्यात पावसामुळे नदीतला कचरा वाहून नेला जातो. तेव्हा वर्षातून फक्त एकदाच नदीची स्वच्छता होते,” त्यानं सांगितलं.

देशाच्या राजधानीतून म्हणजेच दिल्लीतून वाहणाऱ्या यमुनेचं पात्र केवळ २२ किलोमीटर लांब आहे. म्हणजे एकूण लांबीच्या केवळ १.६७ टक्के. पण एकूण १३७६ किलोमीटर लांबीच्या या नदीत टाकल्या जाणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी दिल्लीत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण मात्र ८० टक्के आहे. वाचा – जेव्हा यमुनेतले ‘मेलेले मासे जरासे ताजे असतील’

Shalini Singh

شالنی سنگھ، پاری کی اشاعت کرنے والے کاؤنٹر میڈیا ٹرسٹ کی بانی ٹرسٹی ہیں۔ وہ دہلی میں مقیم ایک صحافی ہیں اور ماحولیات، صنف اور ثقافت پر لکھتی ہیں۔ انہیں ہارورڈ یونیورسٹی کی طرف سے صحافت کے لیے سال ۲۰۱۸-۲۰۱۷ کی نیمن فیلوشپ بھی مل چکی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شالنی سنگھ
Editor : PARI Desk

پاری ڈیسک ہمارے ادارتی کام کا بنیادی مرکز ہے۔ یہ ٹیم پورے ملک میں پھیلے نامہ نگاروں، محققین، فوٹوگرافرز، فلم سازوں اور ترجمہ نگاروں کے ساتھ مل کر کام کرتی ہے۔ ڈیسک پر موجود ہماری یہ ٹیم پاری کے ذریعہ شائع کردہ متن، ویڈیو، آڈیو اور تحقیقی رپورٹوں کی اشاعت میں مدد کرتی ہے اور ان کا بندوبست کرتی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI Desk
Translator : Surekha Joshi

Surekha Joshi is a Pune-based freelance translator with a post graduation in Journalism. She works as a Newsreader with All India Radio (Pune).

کے ذریعہ دیگر اسٹوریز Surekha Joshi