“कचरा तुम्ही तयार करता, मग आम्ही कचरावाल्या कशा काय सांगा? खरं तर आम्ही शहर साफ ठेवतो. आणि लोक कचरावाले असतात,” पुण्यातल्या कचरा वेचक सुमन मोरे म्हणतात.

सुमनताई कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या कामगार संघटनेच्या सदस्य आहेत. १९९३ साली ८०० कचरा वेचक महिलांची एक परिषद झाली आणि त्यातून संघटना सुरू झाली. पुणे महानगरपालिकेक़डून अधिकृत ओळखपत्रं मिळावीत आणि त्यांच्या कामाची दखल घेतली जावी अशी त्यांची मागणी होती. १९९६ साली त्यांना ओळखपत्रं मिळाली.

या कचरा वेचक महिला पुणे मनपासोबत काम करतात आणि घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. बहुतेक जणी महार आणि मातंग या अनुसूचित जातींमधल्या आहेत. “आम्ही ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करतो. ओला कचरा मनपाच्या गाडीत देतो,” सुमनताई सांगतात. “सुक्या कचऱ्यातलं आमच्या कामाचं काय असेल ते बाजूला काढतो आणि उरलेला सुका कचरा मनपाच्या गाडीत जातो.”

या सगळ्यांना आता चिंता अशी आहे की पुणे मनपा त्यांचं काम खाजगी कंत्राटदार किंव कंपन्यांना देऊन टाकेल. त्या आता लढायला सज्ज झाल्या आहेत. “आम्ही आमचं काम दुसऱ्या कुणालाही घेऊ देणार नाही,” आशा कांबळे सांगतात.

मोल ही फिल्म पुण्यातल्या कचरावेचक महिलांच्या संघर्षाचा आणि आंदोलनाचा इतिहास त्यांच्या स्वतःच्या शब्दात मांडते.

फिल्म पहाः मोल

Kavita Carneiro

کویتا کارنیرو، پونے کی آزاد فلم ساز ہیں اور گزشتہ ایک دہائی سے سماجی امور سے متعلق فلمیں بنا رہی ہیں۔ ان کی فلموں میں رگبی کھلاڑیوں پر مبنی فیچر لمبائی کی ڈاکیومینٹری فلم ’ظفر اینڈ توڈو‘ شامل ہے۔ حال ہی میں، انہوں نے دنیا کے سب سے بڑے لفٹ سینچائی کے پروجیکٹ پر مرکوز ڈاکیومینٹری ’کالیشورم‘ بھی بنائی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز کویتا کارنیرو
Video Editor : Sinchita Parbat

سنچیتا ماجی، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سینئر ویڈیو ایڈیٹر ہیں۔ وہ ایک فری لانس فوٹوگرافر اور دستاویزی فلم ساز بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Sinchita Parbat
Text Editor : Sanviti Iyer

سنویتی ایئر، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی کنٹینٹ کوآرڈینیٹر ہیں۔ وہ طلباء کے ساتھ بھی کام کرتی ہیں، اور دیہی ہندوستان کے مسائل کو درج اور رپورٹ کرنے میں ان کی مدد کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Sanviti Iyer