‘‘विणीच्‍या काळात लांडगे आमच्‍या गुरांवर हल्‍ले करतात. खरं तर आम्ही स्‍वतः त्‍या वेळी जितराबाबरोबर असतो, लांडग्यांना सहज मारू शकतो, म्हणजे त्‍यांनाच आमच्‍यापासून धोका असतो. पण तरीही ते शिकार करतात, कारण त्‍यांना आपल्‍या छोट्यांना खाऊ घालायचं असतं,’’ ताशी फुंतसोग आणि तुंदुप चोसगेल सांगतात. ग्‍या नावाच्‍या गावातले हे दोघं गुराखी आहेत. शिकार करणारे जंगली प्राणी आणि आपलं पशुधन जंगलात चारायला नेणारे पशुपालक, दोघंही एकमेकांसोबत जगत असतात. ताशी आणि तुंदुप लांडग्यांबद्दल जो विचार करतात, त्‍यात नेमकं याचंच प्रतिबिंब पडलेलं असतं.

हिंस्त्र, मांसभक्षी प्राण्यांपासून आपली शेरडं-मेंढरं वाचवण्‍यासाठी गावांमधले पशुपालक ‘शांगडोंग’चा वापर करत असत. भोवती दगड रचलेलं एका विहिरीसारखं बांधकाम असतं हे. ताशी फुंतसोग आणि तुंदुप चोसगेल सांगतात, ‘‘मी लहान होतो तेव्‍हापासूनची ही पद्धत मला आठवतेय. ऑक्टोबरपासून सुरुवात होत असे. आळीपाळीने प्रत्येकाच्‍या कळपातली एकेक मेंढी शांगडोंगच्‍या आत लांडग्यासाठी सावज म्हणून ठेवायची. सावज म्हणून ठेवलेल्‍या या जनावरांना खाऊ घालण्‍याची जबाबदारी जानेवारीपर्यंत आळीपाळीने गावातल्‍या प्रत्येक कुटुंबावर असायची. सावजात आपलं जनावर नसलं तरी त्‍यांना तो गावकरी रोज गवत आणि पाणी देत असे. लांडगा अडकलाच तर हाच गावकरी त्‍याला मारत असे.’’

‘शांगडोंग टू स्‍तुपा’ (शांगडोंग ते स्‍तूप) हा माहितीपट लदाखच्‍या पशुपालक समाजाचं म्हणणं आपल्‍यापर्यंत पोहोचवतो. सामतेन ग्‍युरमेट आणि फुंटसोक आंगचुक या दोघा तरुण लदाखी फिल्‍ममेकर्सनी २०१९ च्‍या उन्‍हाळ्यात हा माहितीपट तयार केला. त्‍सेरिंग डोरमा यांच्‍या आवाजात लदाखी भाषेतील कथन आपल्‍याला ऐकू येत असतं. पडद्यावर इंग्रजीत आपण ते वाचत असतो. हा माहितीपट आपल्‍याला पशुपालकांच्या प्राचीन परंपरांबद्दल सांगतो, त्‍याचबरोबर त्‍यांच्‍या आयुष्यातली बिकट परिस्‍थिती, त्‍यांचा संघर्ष प्रत्यक्ष दाखवतो. या सार्‍याबद्दल जे गैरसमज पसरले आहेत, त्‍यावरही भाष्य करतो.

पशुपालक आणि अन्‍य समाज यांच्‍यातला संघर्ष कमी करण्‍याचे प्रयत्‍न सरकार आणि काही सामाजिक संस्‍था करतायत. त्यांना आर्थिक मदत देण्‍यासाठीही तरतुदी केल्‍या जातायत. करुणा आणि समानुभूती यांचं तत्त्वज्ञान मानणार्‍या आणि तेच जगणार्‍या इथल्‍या संस्‍कृतीमुळे निसर्गाचं जतन आणि संवर्धन करण्‍यासाठी अनोखे उपाय सुचवले आणि अवलंबले जातायत.

बोधपट पहा: शांगडोंग टू स्‍तुपा

निवेदन (अनुक्रमे)

- निवेदक : त्‍सेरिंग डोलमा, अभ्यासक, सीआयबीएस (सेंट्रल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ बुद्धिस्‍ट स्‍टडीज), लेह
- ताशी फुंतसोग आणि तुंदुप चोसगेल, गुराखी, ग्‍या गाव, जिल्‍हा लेह, लदाख
- कर्मा सोनम, फील्‍ड मॅनेजर, नेचर कॉन्‍झर्वेशन फाउंडेशन, मैसुरू
- कोंचोक स्‍टॅन्झिन, सन्‍माननीय एक्‍झिक्‍युटिव्‍ह काउन्सिलर (शिक्षण, वन्‍यजीव आणि मेंढीपालन), एलएएचडीसी (लदाख ऑटॉनॉमस हिल डेव्‍हलपमेंट काउन्सिल), लेह
- आदरणीय बाकुला रंगडोल न्यिमा रिंपोचे, धार्मिक नेते
- रेव गवांग शेराप, मुख्य भिक्खू
- आदरणीय द्रुकपा थुकसे रिंपोचे, धार्मिक नेते

कॅमेरा

- सामतेन ग्‍युरमेट आणि फुंतसोक आंगचुक (नोमॅडिक ब्रदर्स, लदाख)

संकलन

- सामतेन ग्‍युरमेट आणि मुनमुन धलारिया

Abhijit Dutta

ابھجیت دتہ نیچر کنزرویشن فاؤنڈیشن (این سی ایف)، میسور کے ساتھ پہاڑ کی بلندیوں پر کام کرتے ہیں۔ وہ مقامی بچوں کے لیے آؤٹ ڈور ایجوکیشن پروگراموں پر کام کرتے ہیں اور علاقائی برادریوں کے ساتھ مقامی طور پر متعلقہ تحفظاتی اقدام میں مدد کرتے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Abhijit Dutta
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

کے ذریعہ دیگر اسٹوریز Vaishali Rode