“सिमेंटचं जंगलच झालेलं आहे,” कोल्हापूरच्या उचगावचे संजय चव्हाण म्हणतात. गेल्या दहा वर्षांमध्ये उचगावात अनेक कारखाने आणि उद्योग सुरू झाले आणि भूजलाची पातळी हळूहळू खालावत गेली.

“आमच्या विहिरींना आजकाल पाणीच लागत नाही,” ४८ वर्षीय चव्हाण म्हणतात. ते शेती करतात.

महाराष्ट्रातल्या १४ टक्के विहिरींची पाण्याची पातळी खालावली असल्याचं २०१९ सालच्या महाराष्ट्र भूजल वार्षिकी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या वीस वर्षांत विहिरींची खोली सरासरी ३० फुटांवरून ६० फुटांवर गेली आहे असं विहिरी खोदण्याचं कंत्राट घेणारे रतन राठोड सांगतात.

उचगावच्या प्रत्येक घरात आता बोअरवेल आहे, चव्हाण सांगतात. त्यामुळे भूजलाचा उपसा खूप वाढला आहे. “वीस वर्षांपूर्वी उचगावात १५-२० बोअर असतील. आज ७००-८०० आहेत,” उचगावचे माजी उपसरपंच मधुकर चव्हाण सांगतात.

उचगावची पाण्याची गरज दररोज २५-३० लाख लिटर इतकी आहे. पण, “[...] पण गावाला केवळ १०-१२ लाख लिटर पाणी तेही एका आड एक दिवस मिळू शकतं,” मधुकर चव्हाण सांगतात. त्यामुळे गावाला मोठ्या टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.

कोल्हापुरात भूजल पातळी खालावत असल्यामुळे शेतकऱ्यांवर काय परिणाम होतायत ते या लघुपटातून कळून येईल.

फिल्म पहाः पाण्याच्या शोधात

Jaysing Chavan

జైసింగ్ చవాన్ కొల్హాపుర్‌కు చెందిన ఒక ఫ్రీలాన్స్ ఫోటోగ్రాఫర్, చిత్ర నిర్మాత.

Other stories by Jaysing Chavan
Text Editor : Siddhita Sonavane

Siddhita Sonavane is Content Editor at the People's Archive of Rural India. She completed her master's degree from SNDT Women's University, Mumbai, in 2022 and is a visiting faculty at their Department of English.

Other stories by Siddhita Sonavane