नागी शिवा, बंडीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वसलेल्या लोक्केरे या खेड्यात तिच्या कुटुंबासोबत राहते. ती कुरुबा गौडा या समुदायाची आहे आणि घरकामगार म्हणून काम करते.
सहा महिन्यांच्या काळात, कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्याघ्र अभयारण्याच्या सीमेवरील आपल्या रोजच्या दिनचर्येतील छायाचित्रे तिने काढली - झाडं, शेतं, पिकं, प्राणी आणि तिचं कुटुंब. कॅमेरा वापरण्याची ही तिची पहिलीच वेळ होती (Fujifilm FinePix S8630). वन्यजीवांसोबतचं आयुष्य या विषयावरच्या एका मोठ्या सांघिक छायाचित्र प्रकल्पाचा भाग असलेला हा तिचा चित्रबंध एकूण सहा चित्रबंधांच्या मालिकेतील दुसरा आहे. (या मालिकेतील पहिला, जयाम्माला बिबट्या दिसला तेव्हा, ८ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध झाला.)















