पाच वर्ष झाली; संजीवनी बेडगेने पेन्शनसाठी पहिल्यांदा अर्ज केल्याला! पण महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून तिला अजूनही पेन्शन मिळालेलं नाही. आपल्या दिवंगत पतीने खासगी सावकाराकडून उचललेल्या भल्यामोठ्या कर्जाची फेड तिला आजही करावी लागतेय
महाराष्ट्रातील पश्चिम घाटात जलविद्युत प्रकल्प येऊ घातलाय. शेतं नि जंगलजमिनींसह अनेक कुटुंबांचा अधिवास हा प्रकल्प गिळेल. जंगलासोबतच वन्यजीव-वनस्पती नि स्थानिक माणसांना उखडून, अक्षय ऊर्जा' मिळेल? ती 'एनर्जी क्लीन' असेल? या प्रश्नांचा वेध