ओवी प्रकल्पाच्या या भागात आहेत हौसाबाई मांडेकर यांच्या ध्वनिमुद्रित ओव्या आणि छबाबाई सुतार यांचे व्हिडीओ : पुणे जिल्ह्यातल्या या दोघी पंढरपूरच्या विठ्ठल - रखुमाईच्या ओव्या गाताहेत . या आठवड्यात हजारो भक्त पंढरपूरची वारी करत असतील .

दरवर्षी आषाढात आळंदी आणि देहूवरून २१ दिवसांची वारी पंढरपूरकडे निघते. वर्षामागून वर्षे या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची परंपरा आहे आणि जातिभेदाचा अडसर नसलेली अशी ही परंपरा आहे.

या वारीविषयी अधिक माहिती ‘पारी’वर वारकऱ्याची वारी  मध्ये आणि The enduring pull of people’s poets मध्ये वारकऱ्यांचे दैवते असलेले ज्ञानेश्वर आणि तुकाराम या संतकवींची माहिती मिळेल.

लोकसाहित्यातून लक्षात येतं की विठ्ठल हा खेडुतांचा, धनगरांचा देव होता. पण लोकांचा देव असूनही सारी पूजाअर्चा ब्राह्मणांच्या हाती होती आणि तरीही वर्षानुवर्षे वंचित आणि खालच्या जातीतील भक्तांना मंदिरात प्रवेश नव्हता. १९४७ मध्ये परिस्थिती बदलली; लेखक व शिक्षक असललेल्या पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींनी या भेदभावाच्या विरोधात ११ दिवसाचं उपोषण केलं.

ओवी प्रकल्पाच्या या भागातील काही कवितांत भक्तीरस गुंफलेला आहे त्याचबरोबर विट्ठल-रखुमाईच्या  वैवाहिक जीवनाबद्दलच्या काही पारंपरिक गीते त्यांच्या एकत्र जीवनाबद्दलच्या कवयित्रींच्या कल्पना सांगतात.

ओवी प्रकल्पावर काम करणारी ‘पारी’ची टीम जेव्हा ३० एप्रिल २०१७ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवार्डे गावात पोचली तेव्हा छबाबाई सुतार यांनी विट्ठल-रखुमाईमधील प्रेम आणि राग/विसंवाद/कुरबुर याबद्दलची गीते ऐकवली.



व्हिडीओ पाहा : विट्ठल - रखुमाईमधील कुरबुरीबद्दल गाताना छबाबाई गातात , रुक्मिणी म्हणते , ‘ अबीर बुक्क्याचे तुम्ही देऊळ बांधा दुजे

पंढरपुरात विट्ठल नि रखुमाई यांची देवळं वेगवेगळी आहेत. याबद्दल अनेक कथा आहेत पण छबाबाईच्या गाण्यात एक साधं कारण आहे – “ रुक्मिणी म्हणते, ‘देवा, आपलं काही जमत नाही. तुम्ही त्या अबीर-बुक्क्यांसाठी वेगळंच देऊळ बांधा.’ केशरी रंगाचा अबीर किंवा गुलाल आणि काळा बुक्का भक्त देवाला वाहतात आणि त्यांचा धुरळा आणि वास रुक्मिणीला सहन होत नाही.

इथे सामील केलेल्या ओव्यांत पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील साविंदणे गावच्या हौसाबाई मांडेकरांनी गायिलेली ११ गीतेही आहेत. हे ध्वनिमुद्रण १३ डिसेंबर १९९५ रोजी केलेले आहे.

हौसाबाई गातात, ‘विठ्ठल विटेवर उभा आहे आणि फक्त त्यालाच चंद्रभागेची खोली माहीत आहे. लोकसाहित्यातून आपल्याला पुंडलिक आणि त्याची आपल्या पितरांवरील भक्ती कळते. त्याच्या या भक्तीने प्रभावित होऊन विठोबा त्याला भेटायला आले तेव्हा तो आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि त्याने एक वीट सरकवून विठोबाला त्यावर उभं राहून वाट बघायला सांगितलं. त्यामुळे पंढरपूरच्या देवळात विठोबा असाच हात कमरेवर ठेवून पुंडलीकाची वाट पाहत विटेवर उभा आहे.

कवयित्री म्हणते की देवळाची पहिली नामदेवाची पायरी चढल्यावर ती विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याआधी गरुडखांबापाशी जाते. तिची पंढरपूरची पहिली भेट तिच्या बहीण आणि भावाच्या सोबतीने झाली होती आणि विठोबाच्या दर्शनाआधी तिने पुंडलिकाच्या मंदिराला भेट दिली होती. विठोबाच्या दर्शनासाठी लागलेल्या मोठ्या रांगेत ती उभी आहे आणि म्हणते की आता मला त्याचं दर्शन कधी मिळणार याची चिंता त्यानेच करावी.


PHOTO • Namita Waikar

पुण्याहून पंढरपूरकडे वाटचाल करणारी एक वारकरी महिला . १८ जून २०१७

पुढील चार ओव्या विट्ठल-रखुमाईमधील प्रेम आणि कुरबुरीबद्दलच्या आहेत. रुक्मिणीचा राग इतका मोठा आहे की विट्ठलाला अंघोळीसाठी गरम पाण्याऐवजी थंड पाणी मिळतं. ती रागारागाने तळ्याकाठी जाते आणि तिचा राग घालवण्यासाठी तिचा प्रिय पांडुरंग तिच्या गळ्याभोवती हात घालतो. एकदा अशीच रुक्मिणी रागावलेली असताना विठ्ठलाच्या जेवणाचा गोंधळ होतो. एकदा रात्री काळोखात  अनेक स्त्रियांबरोबर रास खेळली जाते आणि रखमाबाईच्या मंदिरात रात्रभर दिवे तेवत असतात.

शेवटची तीन कडवी कृष्णाच्या तीन प्रमुख पत्नींबद्दलची आहेत. विट्ठल हा विष्णू म्हणजेच कृष्णाचा एक अवतार मानला जातो. त्यची पट्टराणी रुक्मिणी आहे ती झुळझुळीत रेशमी शालू आणि चोळी घालते. दुसरी सत्यभामा मात्र साधी साडी नेसते आणि तिसरी तुळशीबाई, वारा-ऊन-पाऊस काही असो विठ्ठलाच्या घराबाहेर आणि देवळाबाहेर उभी असते.



विटेवरी विट देव उभा राहिल्यातं
चंद्रभागेचं ठाव, ह्यांनी पाहिल्यातं

पंढरीला गेले पह्यली पायरी नामाची
विठ्ठलाच्या आधी भेट गरुड खांबाची

पह्यली पंढरी, मीत भावासंग केली
विठ्ठलाच्या आदी, भेट कुंडलीकान दिली

पंढरीला गेले उभी राहिले, बारीला
माझ्या दर्शनाची चिंता पडली, हरीला

रुसली रुखमीण, हीच रुसण वंगाळ
देवा विठ्ठलाला, गार पाण्याची आंघोळ

रुसली रुखमीण, जावून बसली तळ्याला
पिरतीचा पांडूरंग, हात घाली तो गळ्याला

रुसली रुखमीण एक रात ना एकयीळ
देवा विठ्ठलाच्या भोजनाची ना तारांबळ

सोळा सतरा नारी, नारी भोगील्या अंधारी
जळती समया रखमाबाईच्या मंदीरी

रखमीणीला साडीचोळी, सत्यभामेला दोरवा
तुळश्याबाईला, थंड पाण्याचा गारवा

रुखमिणीला साडीचोळी, सत्यभामाला पातळ
तुळशीबाईला पाणी पाटाचं नितळ

रखमीणीला साडीचोळी, सत्यभामाला लुगडी
पाण्या पावसाची दारी तुळस उघडी


viṭēvarī ubhā dēva nā rāhilyāta
candrabhāgēca ṭhāva hyānnī pāhilyāta

paṇḍharīlā gēlē pahyalī pāyarī nāmācī
viṭhṭhalācyā ādhī bhēṭa garuḍa khāmbācī

pahyalī (dēkhalī) paṇḍharī mīta bhāvāsaṅga kēlī
viṭhṭhalācyā ādī bhēṭa kuṇḍalīkāna dilī

paṇḍharīlā gēlē ubhī rāhilē bārīlā
mājhyā darśanācī cintā paḍalī harīlā

rusalī rukhamīṇa hīca rusaṇa vaṅgāḷa
dēvā viṭhṭhalālā gāra pāṇyācī āṅghōḷa

rusalī rukhamīṇa jāvūna basalī taḷyālā
piratīcā pāṇḍūraṅga hāta ghālī tō gaḷyālā

rusalī rukhamīṇa rusalī ēka rātayīḷa
dēvā tyā viṭhṭhalācī bhōjanācī tārāmbaḷa

sōḷā satarā nārī bhōgīlyā andhārī
jaḷatī samayā rakhamābāīcyā mandīrī

rakhamīṇīlā sāḍīcōḷī satyabhāmēlā dōravā
tuḷaśyābāīlā thaṇḍa pāṇyācā gāravā

rukhamiṇīlā sāḍīcōḷī satyabhāmālā pātayīḷa
tuḷaśībāīlā pāṇī pāṭāca nitayīḷa

rakhamīṇīlā sāḍīcōḷī satyabhāmālā lugaḍī
pāṇyā pāvasācī dārī tuḷasa ughaḍī


God is standing on a brick
Only he has seen the depth of river Chandrabhaga

I went to Pandharpur, the first step is Namdev’s
Before Vitthal, I visit the Garud Khamb [pillar]*

On my first visit to Pandhari, I went with my brother
Before the shrine of Vitthal, I visited the shrine of Kundalik [Pundalik]

I went to Pandhari, I stood in the queue
Hari [god] is worried about my turn for darshan [view]

Rukmini is upset, her anger is bad
God Vitthal gets cold water for his bath

Rukmini is sulking, she goes and sits near the pond
Her beloved Pandurang puts his arm around her

Once, Rukmini was sulking one night
There was panic about God Vitthal’s meal

There was revelry in the dark with sixteen-seventeen women
In Rakhmabai’s temple, oil lamps were burning

A fine sari and blouse for Rukmini, an ordinary sari for Satyabhama
The coolness of cool water for Tulasibai

An expensive sari and blouse for Rukmini, a plain sari for Satyabhama
Clear water from the canal for Tulasibai

A fine sari and blouse for Rukmini, a coarse sari is for Satyabhama
Tulasi standing in the rain in front of the door, she has nothing

Notes: *Garud Khamb:  The eagle’s ( garud ) pillar in the Pandharpur temple complex; the eagle is the vehicle of Vitthal (Lord Vishnu).


PHOTO • Samyukta Shastri

छबाबाई सुतार आणि त्यांचे पती गोपाळ त्यांच्या लवार्डे गावातील घरात, मुळशी तालुका, पुणे. फोटो ३० एप्रिल, २०१७ चा आहे.



कलावंत : छबाबाई सुतार

गाव : लवार्डे

तालुका : मुळशी

जिल्हा : पुणे

जात : सुतार


कलावंतः हौसाबाई मांडेकर

गाव : सविंदणे

तालुका : शिरुर

जिल्हा : पुणे

जात : मराठा

दिनांकः या ओव्या आणि इतर काही माहिती १३ डिसेंबर १९९५ रोजी रेकॉर्ड करण्यात आली. छबाबाई सुतार यांचे फोटो आणि व्हिडिओ ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आला.

पोस्टर : श्रेया कात्यायनी

अनुवादः छाया देव


PARI GSP Team

ʼಪರಿʼ ಗ್ರೈಂಡ್‌ಮಿಲ್ ಸಾಂಗ್ಸ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ತಂಡ: ಆಶಾ ಒಗಲೆ (ಅನುವಾದ); ಬರ್ನಾರ್ಡ್ ಬೆಲ್ (ಡಿಜಿಟಲೀಕರಣ, ಡೇಟಾಬೇಸ್ ವಿನ್ಯಾಸ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ನಿರ್ವಹಣೆ); ಜಿತೇಂದ್ರ ಮೇಡ್ (ಪ್ರತಿಲೇಖನ, ಅನುವಾದ ಸಹಾಯ); ನಮಿತಾ ವಾಯ್ಕರ್ (ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಲೀಡ್ ಮತ್ತು ಕ್ಯುರೇಶನ್); ರಜನಿ ಖಲಡ್ಕರ್ (ಡೇಟಾ ಎಂಟ್ರಿ).

Other stories by PARI GSP Team
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo