बिहारच्या उत्तरेकडे पाऊस म्हणजे उत्सव असे. रात्रभर पावसाची झोडपून काढलं की अनेकदा बाया त्यांच्या नावा घेऊन पुराचं कौतुक गाऊन साजरं करायच्या. नद्यांशी लोकांचे ऋणानुबंध जुळलेले होते, आता कधी तरी पुराचं पाणी गळ्यापर्यंत यायचं. पुराची व्याप्ती, कालावधी आणि तीव्रता सर्वच जाणून असलेले लोक पुरेशी काळजी देखील घेत असत. कालांतरात हे बदलत चाललंय आणि कधी काळी उत्तर बिहारमधले पुराची पूजा करणारे हेच लोक आज पुराचे बळी ठरू लागलेत.
या फिल्मचं चित्रीकरण जुलै ते सप्टेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलं. सायंतनी पालचौधुरीच्या २०१५ पारी फेलोशिपअंतर्गत ही फिल्म तयार करण्यात आली.
कॅमेरा व संकलन संबित दत्तचौधुरी याने केलं आहे. स्वयंभू छायाचित्रकार असलेला संबित गेल्या दोन वर्षांत शेती, सामुदायिक आरोग्य आणि शिक्षणविषयक कामामध्ये सहभागी झाला आहे.
अनुवादः मेधा काळे