आयेशा मोहम्मद यांचे वडील संतोष ह्यालिंगे यांनी कॅरम बोर्ड खरेदी केल्यानंतर, वयाच्या सातव्या वर्षापासून आयेशा यांनी कॅरम खेळायला सुरूवात केली. शहरातील कॅरम क्लबमध्ये, जेथे पुरूष कॅरम खेळतात, त्या जाऊन खेळू शकत नसल्याने, ठाणे जिल्ह्यातील, उल्हासनगरच्या आपल्या घरीच लहानपणापासून त्या कॅरमचा सराव करत राहिल्या.

त्यांनी सर्वप्रथम वयाच्या आठव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला आणि एका ज्येष्ठ प्रतिस्पर्धी विरूद्ध खेळल्या. त्या स्पर्धेत त्यांना अपयश आले, पण तिथूनच त्यांचा कॅरम खेळाचा प्रवास सुरू झाला - कालांतराने, त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले. २००३-०४ मध्ये, आयेशा यांनी महाराष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार जिंकला.

अशाच एका स्पर्धेदरम्यान, त्यांची मोहम्मद साजिद, ते पण एक कॅरमपटू आहेत, यांच्याशी ओळख झाली, आणि कुटुंबांचा विरोध असतानाही त्यांनी विवाह केला. आयेशा आता त्यांचे वडील, पती आणि एक मुलगा, यांच्यासह जळगावात राहतात. जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड मध्ये त्यांची नोकरी आहे आणि एका शाळेत लहान मुलांसाठी कॅरम प्रशिक्षक म्हणूनही काम करतात.


02-IMG_0062-SK-1.	When the Queen strikes: the story of a carrom champion.jpg

भविष्यातील विजेते घडवताना: महाराष्ट्रातल्या जळगावमधील एका शाळेत आयेशा कॅरम प्रशिक्षक म्हणून काम करतात


03-Screen-Shot-2017-01-27-at-11.47.26-AM-SK-1.	When the Queen strikes: the story of a carrom champion.jpg

स्ट्रायकरने अचूक नेम साधताना: आयेशा मोहम्मद त्यांचे पती साजिद आणि त्यांचा मुलगा हमझा यांच्यासह

आयेशा यांचा विश्वास आहे की खेळांचे अस्तित्व हे कोणत्याही स्वरूपाच्या भेदभावांपलीकडे असते. त्या म्हणतात, "खेळ प्रत्येकासाठी असतो अणि तो सगळ्यांना एकत्र आणतो. कोणीही एकट्याने खेळाची निर्मिती केलेली नाही, खेळ कोणीही खेळू शकतात. अगदी गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतांतील श्रीमंतापर्यंत – खेळ कोणीही खेळू शकतात."

Shreya Katyayini

শ্রেয়া কাত্যায়নী একজন চলচ্চিত্র নির্মাতা এবং পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার বরিষ্ঠ ভিডিও সম্পাদক। তিনি পারি’র জন্য ছবিও আঁকেন।

Other stories by শ্রেয়া কাত্যায়ণী
Translator : Pallavi Kulkarni

Pallavi Kulkarni is a Marathi, Hindi and English translator.

Other stories by পল্লবী কুলকার্নি