भारताच्या खेड्यापाड्यांमधले लोक हे स्वातंत्र्यसंग्रामाचं खरं पायदळ मानायला हवेत. इंग्रज वसाहतींविरोधात झालेल्या काही कडव्या उठावांचं नेतृत्वही याच गावकऱ्यांनी केलंय. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त करण्यासाठी लाखोंनी त्यांचे प्राण दिले. आणि भारत स्वतंत्र झालेला पाहण्यासाठी अत्यंत अपेष्टा सोसूनही जे जिवंत राहिले त्यांचा मात्र लवकरच सगळ्यांना विसर पडला. १९९० पासून या काही अखेरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कहाण्या मी गोळा करतोय. यातल्याच या पाच कहाण्या

Nuapada, Odisha
|TUE, MAR 28, 2017
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने धैर्य आणि त्यागाच्या या काही विस्मृतीत गेलेल्या कहाण्या
Author
Translator
10. इंग्रज सरकारला शिंगावर घेणारी ‘सलिहान’
स्वातंत्र्यांच्या दहा कहाण्या – १ : ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंदुकींचा लाठ्यांनी सामना करणाऱ्या देमती देई शबर आणि तिच्या मैत्रिणी, मु.पो. सलिहा, नौपाडा, ओडिशा
9. पाणिमाराचं पायदळ – भाग १
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – २, ओडिशातल्या काही गरीब गावकऱ्यांनी संबलपूर न्यायालय ताब्यात घेऊन स्वतः चालवायला घेतलं त्याची गोष्ट
8. पाणिमाराचं पायदळ – भाग २
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ३ स्वातंत्र्याचं गाव असा मान मिळवलेल्या ओडिशातल्या छोट्याशा वस्तीची गोष्ट
7. लक्ष्मी पांडांचा अखेरचा लढा
वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ९: या देशाने आपली दखल घ्यावी इतकीच मागणी असणाऱ्या आझाद हिंद सेनेच्या स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मी पांडा
6. अहिंसेची नव्वद वर्षं
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – १०: स्वातंत्र्यानंतर ६० वर्षं जे अहिंसक मार्गाने लढत राहिले त्या बाजी मोहम्मद यांची गोष्ट
याचसोबत इथे अजून पाच गोष्टी आहेत. या गोष्टी याआधी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात काही छायाचित्रांची भर घातली आहे. स्वातंत्र्य संग्राम फक्त काही शहरी अभिजनांपुरता मर्यादित नव्हता. ज्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये मोठ्या बंडाच्या ठिणग्या उडाल्या त्या गावांवरची लेखमाला म्हणजे ‘विस्मृतीतले स्वातंत्र्य लढे’. खेडोपाडीचे लोक या संग्रामामध्ये फार मोठ्या संख्येने लढले आणि त्यांचे लढेही फार वेगवेगळ्या स्वातंत्र्यांसाठी होते. १८५७मध्ये गावाकडे, खेडोपाडी वेगवेगळे उठाव होत असताना मुंबई आणि कलकत्त्यात मात्र इंग्रजांना त्यांच्या कार्यात यश मिळावं यासाठी तिथले अभिजन बैठका घेण्यात मग्न होते. १९९७ मध्ये स्वातंत्र्याला ५० पूर्ण झाली तेव्हा यातल्याच काही गावांना मी भेटी दिल्या. तिथल्याच या काही कहाण्याः
5. शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ४: १९४२ साली उत्तर प्रदेशातल्या एका गावाने तिरंगा फडकवला आणि नंतर त्याची किंमतही मोजली. त्या गावाची गोष्ट
4. गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ५: आंध्र प्रदेशातल्या रंपामध्ये अल्लुरी सीताराम राजूंनी इंग्रजांविरोधात एक फार मोठा उठाव केला त्याची गोष्ट
3. सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या - ६: छत्तीसगडमधल्या वीर नारयण सिंगने दयेची भीक मागितली नाही. न्यायासाठी लढता लढता त्याने आपला जीव दिला, त्याची गोष्ट
2. कल्लियसेरीः सुमुखनच्या शोधात
स्वातंत्र्याच्या कहाण्या – ७: इंग्रज, स्थानिक जमीनदार आणि जात व्यवस्था – सगळ्या आघाड्यांवर लढा देणाऱ्या गावाची गोष्ट
1. कल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच
स्वातंत्र्याच्या दहा कहाण्या – ८: शिकाऱ्यांच्या देवाने इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी कम्युनिस्टांना आसरा दिला त्याची गोष्ट
आता नव्वदीला, कदाचित शंभरीला टेकलेल्या अखेरच्या काही स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेऊन त्यांची कहाणी शब्दबद्ध करण्याचं काम पारी आजही करत आहे.
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/स्वातंत्र्याच्या-दहा-कहाण्या











