चकचकीतपिवळ्या रंगाची साडी नेसूनत्या जानेवारी महिन्यातल्या थंडीच्या एका सकाळी झपाट्यानेचालत असतात. साडीची घडीकमरेत आणखी आत खोचलेलीजेणेकरून ती चपलेत अडकणारनाही. डोक्यावर गडद गुलाबी रंगाचीएक ओढणी सुद्धा गुंडाळलेलीआहे, जी अधूनमधून वाऱ्यावरफडफडते. खांद्यावर अंदाजे एक किलोवजनाचा, फिकट तपकिरी-सोनेरीरंगाचा सनच्या तंतूंचा गुंडाआहे, जणू काही फॅशनचादागिनाच.
फगुनीडाव्या हातात एका दोऱ्यावरलटकवलेला ‘धेरा’ धरतात — चारटोकांचा साधा लाकडी चरखा. उजव्या हाताने सनच्या गुंड्यातूनएखादा-दोन तंतू खेचतात, त्या धेऱ्याला झटपट फिरवतात आणिदोन्ही हातांनी ते तंतूवळवून बारीक दोर विणतात. जादू झाल्यासारखे त्यांच्या बोटांखाली खडबडीत तंतू चमकदार, गुळगुळीत दोऱ्यामध्ये बघता बघता बदलतोआणि तो दोर तयारहोत होत वाढतच जातो, जोवर धेरा जमिनीला लागूनपडत नाही. “ह्या… ह्या… चल चल!” त्या एकीकडेआपल्या तीन गायींना आणिदोन शेळ्यांना अगदी शांतपणे हाकतअसतात, धेऱ्या उचलून पुन्हादोर गुंडाळतात आणि नव्याने सुरूकरतात.
“एकक्षण जरी नजर त्यांच्यावरूनहटली तरी त्या (गायी- शेळ्या) एकदम मोहरीच्या किंवागव्हाच्या शेतात शिरतात,” फगुनीस्वतःशीच बोलल्यासारखी म्हणते. रस्त्याकडे पाहत, गुरांवर लक्ष ठेवत आणिमैत्रिणीशी गप्पा मारत वयाच्या५६व्या वर्षीही एवढं सगळंसहजतेने आणि नजाकतीने करणाऱ्याफगुनी देवीला पाहून मीथक्क झालो. “आम्ही चौधरीलोक ही कला जन्मतःशिकतो. आईच्या पोटीच शिकलोम्हणा ना!” हे सांगतानामला त्यांच्या आवाजात एक अभिमानजाणवला. “या गावातलं प्रत्येकमूल हे करू शकतं.”


















