हम सब कटुए हैं
हम सब कटुए हैं, आमात्य!
अपने कटे हुए सर
कटी हुई बाहें
कटे हुए पैर
और क्षत विक्षत आत्माएं लेकर
हम भटक रहें हैं
हम कातर कबंध…
हम सब कटुए हैं, राजन!
हम उस मां के कटे हुए सर हैं
जिसे पातकी पितृत्व की मदिरा से चूर
पाखंडी परशु ने धड़ से अलग कर दिया था
हम अधूरे धड़ से
मां के कटे हुए शीश के कल्ले
माटी में बोते हैं…
हम सब कटुए हैं, राजपुरूष!
हम उस तापस कुमार के भूलुंठित शीश हैं
जिसे खोखली मर्यादा की म्यान से निकाली गई
और जाति दर्प से विष बुझाई तलवार ने
काट दिया था...
जिसे किसी ने नहीं सुना
और जो अट्टहास गूंजता है हमारी संस्कृति कंदराओं में
हम उस कटे हुए शीश के अट्टहास हैं...
हम सब कटुए हैं, राजदंडाधिकारियो!
हम युगों युगों से
उस युवती की रक्त स्रावित नाक हैं
जिसे पुरुष के अहम ने
जिसे राज पुरुष दंभ ने काट दिया था
हमारी नककटी सभ्यता उस युवती के रक्त में
स्नान कर रही है और डुबकी मार
अपना ईश्वर खोज रही है
हम सब कटुए हैं, चक्रवर्ती!
हम उस योद्धा का कटा हुआ अंगूठा हैं
जिसे एक कपटी गुरुता ने काट लिया था
और फिर लगातार कटते रहे अंगूठे
कटते रहे सर
कटती रहीं बांहे
कटती रही उंगलियां
देखो आक्षितिज बिखरे हैं कटे हुए अंगूठे|
देखो उन कटे हुए अंगूठों के निशान ले रही है मंत्रिपरिषद
देखो उन कटे हुए अंगूठों की माला पहन रहे हैं महामात्य
हम सब कटुए हैं, अभिजात्यों!
हम सब कटुए हैं और बहुमत में हैं
हम खड़े हैं इतिहास के राजपथों पर
अपनी कटी हुई पहचान हथेलियों पर सजाए
आप इस देश को छोड़ें सम्राट
अपने नवनीत वदन और संपूर्ण कलेवर के साथ
ये देश हमारा है
ये आर्यावर्त कटुओं का है
आम्ही सारेच ‘कटुए’
अमात्य, आम्ही सारेच आहोत लांडे!
उडवलेली मुंडकी
छाटलेले हात
तोडलेले पाय
आणि छिन्नविच्छिन्न आत्मे घेऊन
भटकताहेत
फक्त आमची धडं...
आम्ही सारेच आहोत ‘कटुए’
आम्ही आहोत त्या मातेचं शिर
जे पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्या
पाखंडी परशुने धडावेगळं करून टाकलं
आम्ही ते शिरावेगळं धड
त्या आईच्या शिराचे कोंब
मातीत रोवतोय
आम्ही सगळे ‘कटुए’ आहोत, राजपुरुष!
आम्ही त्या तरुण साधूचं मातीत पडलेलं मुंडकं आहोत
जे मर्यादेच्या पोकळ कल्पनांच्या म्यानातून उपसलेल्या
जातीदंभाच्या विषात भिजलेल्या तलवारीने कलम केलं गेलं होतं
संस्कृतीच्या कातळलेण्यांमध्ये घुमणारं
पण कुणाच्या कानावर न पडलेलं
त्या कलम केलेल्या शिराचं हास्य आम्ही आहोत
आम्ही सारेच कटुए आहोत, राजदंडधारी शासकांनो!
अनेक युगांपूर्वीपासून
आम्ही त्या एका युवतीचं रक्तबंबाळ नाक आहोत
जे पुरुषाच्या अहंकाराने
आणि एका राजपुत्राच्या गर्वाने छाटलं होतं
नाक कापली गेलेली आमची संस्कृती त्या युवतीच्या रक्तात
न्हात आहे आणि खोल डुबकी मारून
आपल्याच देवाचा शोध घेते आहे
हे चक्रवर्ती राजा, आम्ही सारेच कटुए आहोत!
आम्ही त्या एका योद्ध्याचा कापलेला अंगठा आहोत
जो गुरुपणाच्या कपटातून कापून घेतला गेला
आणि त्यानंतर अंगठे कापले गेले
हात तुटत राहिले
बोटं छाटली गेली
बघा, अगदी क्षितिजापर्यंत या तुटलेल्या अंगठ्यांचा खच पडलाय
त्या तुटलेल्या अंगठ्यांचेच ठसे घेतंय तुमचं विधीमंडळ
त्याच अंगठ्यांची माळ गळ्यात घालून उभा आहे तुमचा महामंत्री
अभिजनांनो, आम्ही सारेच कटुए आहोत!
आम्ही कटुए आहोत आणि संख्येने बहुमतात आहोत
आम्ही इतिहासाच्या राजमार्गावर उभे आहोत
आमचीच खंडित ओळख हातावर तोलत
तुम्ही हा देश सोडून निघावं, महाराज
आमच्या नवाननासह आणि सदेह
हा देश आमचा आहे
हा आर्यावर्त कटव्यांचा आहे