“आमची घरं पाडायला त्यांना हत्ती आणावे लागले,” भारतजॉय रियांग सांगतात. “एवढं करूनही (हत्ती असूनही) ते आमची घरं मोडू शकले नाहीत. शेवटी त्यांनी आमची ‘टोंग’ जाळली.” आदिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय रियांग यांना अजूनही आठवतं, जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने त्यांना, त्यांच्या पत्नीला आणि मुलांना आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातल्या (माजी करीमगंज) घरातून हुसकावून लावलं होतं. हा काळ होता १९८० च्या दशकातला. आणि ज्या घरांविषयी ते बोलत आहेत, त्यांना ‘टोंग’ असं म्हणतात किंवा स्थानिक भाषेत ‘गायरिंग नॉक’. ही घरं त्रिपुरातील अनेक आदिवासी समाजांमध्ये प्रचलित असून भारतजॉय यांच्या समाजातही दिसतात.
या वस्तीमध्ये पाऊल टाकल्यावर दिसणाऱ्या पहिल्या काही घरांपैकी एक घर म्हणजे भारतजॉय यांचं घर. हिरवाईने झाकलेल्या उंच डोंगरांच्या कुशीत, शांत तलाव-नद्यांमध्ये ही वस्ती विसावलेली आहे. त्रिपुरातील धर्मनगर शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर असलेली ही विरळ वस्ती, रियांग जमातीच्या १५० घरांची आहे. राज्यात एकमेव ‘विशेष असुरक्षित जनजातीय गट’ (PVTG) म्हणून या समुदायाची नोंद झालेली आहे.
या वस्तीत शिरताच नजरेस पडणारं पहिलं घर म्हणजे भारतजॉय यांचंच. उंचच उंच डोंगरांच्या हिरव्या दाट कुशीत, शांत जलाशयांच्या सहवासात हे घर वसलेलं आहे. त्रिपुराच्या धर्मनगर शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर रियांग (किंवा रायंग) जमातीच्या १५० कुटुंबांचं हे एकांतातलं वसतिस्थान आहे. राज्यात ‘विशेष असुरक्षित जनजातीय गट’ (PVTG) म्हणून नोंद झालेली ही एकमेव जमात आहे.


















