आर. नल्लकन्न १९२५-२०२६
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अखेरच्या शिलेदारांपैकी एक असलेले आर. नल्लकन्न यांचं २५ फेब्रुवारी रोजी निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते आणि निश्चितच तमिळनाडूमधील स्वातंत्र्य अखेरच्या सैनिकांपैकी एक होते. ते माझ्या 'द लास्ट हिरोज : फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' या पुस्तकात उल्लेखित वसाहतविरोधी लढवय्यांच्या लुप्त होत चाललेल्या पिढीपैकी एक होते.
२०२२ सालच्या स्वातंत्र्यदिनी, तामिळनाडू सरकारने त्यांना १० लाख रुपयांचा राज्यातील सर्वोच्च थगैसल थामिझर पुरस्कार प्रदान केला. कॉम्रेड आरएनके, या नावाने ते प्रचलित होते, त्यांनी पुरस्कार स्वीकारला पण १० लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीला परत केले - त्यात स्वतःकडच्या ५,००० रुपयांची भर टाकली. हा माणूस राज्यातील शेतकरी चळवळीचा संस्थापक नेता होता. आज त्यांच्या जाण्याने तामिळनाडूतील एका युगाचा अंत झाला.
वाचा विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यांसाठी संघर्षरत आर. नल्लकन्न













