ती दूर आहे त्याच्यापासून, खूप दूर आहे. मनोमन तिला सात समुद्र पार करून त्याच्याजवळ जायचंय. हे गीत म्हणजे त्याला केलेली विनवणी आहे…


Kachchh, Gujarat
|SUN, MAR 24, 2024
क्रौंचांची जोडी
प्रेम आणि विरह यांचं हे कच्छी लोकगीत. थंडीच्या दिवसांत कच्छमध्ये, सैबेरियातून स्थलांतर करून कुंजल (क्रौंच) पक्षी येतात. त्यांच्यामध्ये स्वतःला बघत एका प्रेमिकेने गायलेलं हे गीत…
Illustration
Series Curator
Translation
કુંજલ ન માર વીરા કુંજલ ન માર , હી કુંજલ વેધી દરિયા પાર
मारू नको सजणा तू मारू नको कुंजला, दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला
तो आपल्याला विसरेल असं तिला वाटतंय आणि नेमकं तेच होऊ द्यायचं नाहीये तिला. तिला विसरणं म्हणजे सातासमुद्रापलीकडून येणार्या क्रौंचाला मारणंच जणू. हिवाळ्यात दूरवरून, पार सैबेरियातून कच्छमधल्या हिरवळीवर येणार्या ह्या क्रौंच पक्ष्यांमध्ये ती स्वतःलाच पाहाते आहे. कच्छमध्ये दर हिवाळ्यात येणारा हा पक्षी तिथल्या लोकसंगीतामध्ये कधीचाच जाऊन बसलाय. स्त्रियांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग झालाय…. कधी मित्र म्हणून, कधी सखा म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून… कधी तो तिच्या आशाआकांक्षांचं रूप घेतो, तर कधी ती त्याच्यात स्वतःलाच पाहाते.
या गीतातली प्रेमिका आपल्या सख्याला सांगते, त्यापेक्षा तू मला दागिने दे : नथनी दे, पैंजण दे, कंकण दे, बिंदी दे, आणि त्या प्रत्येकावर आपल्या भेटीचं प्रतीक म्हणून क्रौंचांची एक जोडी कोर. पक्ष्यांची रूपकं असलेली अनेक लोकगीतं कच्छमध्ये गायली जातात. त्याच मालिकेतलं हे एक सुंदर गीत मुंद्रा तालुक्यातले जुमा वाघेर यांनी तितकंच सुंदर गायलं आहे.
કરછી
કુંજલ ન માર વીરા કુંજલ ન માર,
હી કુંજલ વેધી દરિયા પાર
કડલાર રે ઘડાય દે વીરા કડલા ઘડાય દે,
કાભીયે જે જોડ તે કુંજ કે વીરાય
કુંજલ ન માર વીરા કુંજલ ન માર,
હી કુંજલ વેધી દરિયા પાર
મુઠીયા રે ઘડાય દે વીરા મુઠીયા રે ઘડાય,
બગલીયે જે જોડ તે કુંજ કે વીરાય
કુંજલ ન માર વીરા કુંજલ ન માર,
હી કુંજલ વેધી દરિયા પાર
હારલો ઘડાય દે વીરા હારલો ઘડાય,
દાણીએ જે જોડ તે કુંજ કે વીરાય
ન માર વીરા કુંજલ ન માર,
હી કુંજલ વેધી દરિયા પાર
નથડી ઘડાય દે વીરા નથડી ઘડાય,
ટીલડી જી જોડ તે કુંજ કે વીરાય
કુંજલ ન માર વીરા કુંજલ ન માર,
હી કુંજલ વેધી દરિયા પાર
કુંજલ ન માર વીરા કુંજલ ન માર,
હી કુંજલ વેધી દરિયા પાર
मराठी
मारू नको सजणा तू मारू नको कुंजला,
दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला
घडविशी कधी माझ्या पायी सुबक पैंजणा,
त्यावरती रेखिशी याच क्रौंचजोडीला
मारू नको साजणा तू मारू नको कुंजला,
दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला
हाती घडविशी माझ्या नाजुकशी काकणे,
क्रौंचांची जोडी कशी त्यावर शोभुनि दिसे
मारू नको साजणा तू मारू नको कुंजला,
दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला
घडविशी तू माझ्या गळा चमचमता हार हा,
कुंजलाची जोडी कशी त्यावरी शोभे पहा
मारू नको साजणा तू मारू नको कुंजला,
दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला
नथनी नाकात आणि बिंदी माथ्यावरी,
क्रौंचांची जोडी कशी कोरलीस त्यावरी
मारू नको साजणा तू मारू नको कुंजला,
दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला
मारू नको सजणा तू मारू नको कुंजला,
दर्यापार जाई तो, रोखू नको त्याजला

Priyanka Borar
गीतप्रकार : पारंपरिक लोकगीत
गीतसमूह : प्रेम आणि विरहाची गीतं
गीत : १२
गीताचं शीर्षक : कुंजल ना मार वीरा कुंजल ना मार
संगीतकार : देवल मेहता
गायक : जुमा वाघेर, भद्रेसर, मुंद्रा
वाद्यं : ड्रम, हार्मोनियम, बेंजो
ध्वनिमुद्रण वर्ष : २०१२, केएमव्हीएस स्टुडिओ
इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पांड्या
‘सूरवाणी’ या कम्युनिटी रेडिओने ध्वनिमुद्रित केलेली ही ३४१ गीतं ‘कच्छ महिला विकास संघटन’च्या माध्यमातून ‘पारी’कडे आली. अशाच आणखी काही गीतांसाठी: Songs of the Rann: archive of Kutchi folk songs
प्रीती सोनी, केएमव्हीएसच्या सचिव अरुणा ढोलकिया, केएमव्हीएसचे प्रकल्प समन्वयक अमद सामेजा, भारतीबेन गोर या सार्यांची बहुमोल मदत झाली. त्यांचे विशेष आभार.
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/a-pair-of-kunjal-birds-mr

