“एका धाग्यापासून सगळं सुरू होतं आणि शेवटही एकाच धाग्याने होतो,” रेखा बेन वाघेला म्हणतात. चेहऱ्यावर मंद हसू. गुजरातच्या मोटा टिंबला गावातल्या आपल्या घरी हातमागावर त्या इकत पटोला विणतायत. “सुरुवातीला आम्ही एकाच धाग्याने कांडी भरतो आणि शेवटी रंगवलेला धागा त्या कांडीवर गुंडाळला जातो,” रेखा बेन सांगतात. पटोला विणण्यासाठी ताण्याच्या उभ्या धाग्यांसाठी वापरलेल्या कांड्या तयार करण्याआधी आणि बाण्याचा धागा मागावर चढवण्याआधी काय काय प्रक्रिया पार पाडाव्या लागतात ते सगळं त्या समजावून सांगतात.

पटोलु किंवा पटोला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध रेशमी साड्या विणण्याचं काम सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या वनकरवासमध्ये चालतं. आणि इथली प्रत्येक व्यक्ती या साडीच्या कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेली असते. मात्र चाळिशीच्या रेखा बेन मात्र लिंबडी तालुक्यातल्या पटोला विणणाऱ्या एकमेव दलित महिला आहेत. त्या एकेरी आणि दुहेरी इकत पटोला विणतात. (वाचाः रेखा बेनच्या आयुष्याचा ताणा आणि बाणा )

सुरेंद्रनगरची पटोला झालावाडी पटोला म्हणून ओळखली जाते. पाटणच्या पटोलापेक्षा ही जरा स्वस्त असते. एकेरी इकत नक्षीसाठी प्रसिद्ध असलेले झालावाडचे वनकर विणकर आता दुहेरी इकतही विणू लागले आहेत. “एकेरी इकतमध्ये नक्षी फक्त ताण्याच्या धाग्यावर असते. पण दुहेरी इकतमध्ये दोन्ही धाग्यांवर, ताण्यावर आणि बाण्यावर नक्षी असते,” रेखा बेन या दोन प्रकारच्या साड्यांमधला महत्त्वाचा फरक सांगतात.

ही नक्षीच या विणकामातली सगळ्यात क्लिष्ट प्रक्रिया आहे. रेखा बेन परत एकदा मला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. “एकेरी इकत पटोलामध्ये ताण्याचे ३,५०० आणि बाण्याचे १३,७५० धागे असतात. दुहेरी इकतमध्ये ताण्याचे २,२०० आणि बाण्याचे ९,८७० धागे असतात,” रेखा बेन सांगतात आणि बोलता बोलता बाण्याचा धागा भरलेली कांडी धोट्यातून सरकवतात.

'It all begins with a single thread and ends with a single thread,' says Rekha Ben Vaghela, the only Dalit woman patola maker in Limbdi taluka of Gujarat. She is explaining the process that begins with the hank of silk yarn and finishes with the last thread going into the 252- inch long patola saree. Work involving over six months of labour
PHOTO • Umesh Solanki

एका धाग्यापासून सगळं सुरू होतं आणि शेवटही एकाच धाग्याने होतो,” गुजरातच्या लिंबडी तालुक्यातल्या पटोला विणणाऱ्या एकमेव दलित महिला विणकर असलेल्या रेखा बेन वाघेला म्हणतात. रेशमाच्या लडींपासून सहा महिन्यांचे कष्ट घेतल्यावर शेवटी २५२ इंच लांबीची रेशमी पटोला साडी कशी तयार होते याची सगळी प्रक्रिया त्या समजावून सांगतात

सुताची कांडी पाहिली की मला ५५ वर्षांच्या गंगा बेन परमार डोळ्यासमोर येतात. “रेशमाची लड घ्यायची, ती मोठ्या चरख्यावर चढवायची आणि त्यानंतर चाक फिरवत रेशमाच्या धाग्याने कांड्या भरायच्या. चाकाशिवाय तुम्हाला कांडी भरताच येणार नाही,” लिंबडीच्या घांघरेतिया गावातल्या आपल्या घरी हे सगळं त्यांनी मला समजावून सांगितलं होतं.

“लक्ष कुठे आहे?” रेखा बेनच्या आवाजाने मी परत मोटा टिंबलात परततो. आज दिवसभरात त्यांनी मला किती तरी वेळा पटोला साडी विणण्यासाठी धागे कसे तयार करतात त्याची प्रक्रिया समजावून सांगितली असेल. “लिहून घे,” माझ्या वहीवर नजर रोखत त्या मला सांगतात. थोडा काळ त्या माग थांबवतात आणि मला खरंच सगळं नीट समजलंय याची खात्री करून घेतात.

या सगळ्या प्रक्रियेत इतक्या सगळ्या पायऱ्या आहेत, किमान डझनभर तर असतील. मी सगळ्या लिहून घेतो. किती तरी आठवडे हे सगळं काम चालतं आणि यात स्वतः विणकर सोडून इतर किती तरी जणांचं काम असतं. रेशमाच्या लडीपासून २५२ इंची पटोला साडी विणली जात असताना या सगळ्यांचे हात लागलेले असतात. सहा महिन्यांच्या कष्टांनंतर साडी तयार होते.

“कुठल्याही कामात एखादी जरी चूक झाली तर पटोलु बिघडणार म्हणून समजा,” रेखा बेन सांगून टाकतात.

Fifty-five-year-old Gangaben Parmar of Ghaghretia village takes the silk thread from the hank onto a big wooden spool, and from there with the help of a spinning wheel she carries the thread onto a bobbin. 'I have been working for thirty years. I have some difficulty in vision these days. But if I sit here all day long I can wind 20 or 25 bobbins in a day'
PHOTO • Umesh Solanki

घाघरेतिया गावच्या ५५ वर्षीय गंगाबेन परमार रेशमाच्या लडीचे धागे एका चरख्यावर चढवतात आणि त्यानंतर फिरत्या चाकाच्या मदतीने त्या रेशमी धागा कांडीवर भरतात. ‘मी तीस वर्षं हे काम करतीये. आता दिसायला जरा त्रास होतो. पण मी जर दिवसभर इथे बसले ना तर एका दिवसात २०-२५ कांड्या सहज भरते’

Gautam Bhai Vaghela of Mota Timbla stretches the yarn threads from the bobbins on the big wooden frame with pegs known as aada as a way to prepare the paati (the cluster of threads) for the next step
PHOTO • Umesh Solanki

मोटा टिंबला गावाचे गौतमभाई वाघेला मोठ्या लाकडी चौकटीत बसवलेल्या कांड्यांवरचे धागे आडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुंट्यांच्या मदतीने ताणून बांधतात आणि त्यातून पुढच्या प्रक्रियेसाठी ‘पाटी’ (धाग्यांच्या जुड्या) तयार करतात

PHOTO • Umesh Solanki

नक्षीच्या खुणा करण्याआधी आड्यावर रेशमी धाग्यांच्या जुड्या ताणून बांधून घेतले जातात

PHOTO • Umesh Solanki

नाना टिंबला गावाचे तीस वर्षीय अशोक परमार धाग्यांच्या जुड्या दुसऱ्या एका चौकटीवर चढवतात. इथे आधी कोळशाने खुणा केल्या जातील आणि कागदावर तयार केलेल्या नक्षीच्या आधारे ते बांधून घेतले जातील

PHOTO • Umesh Solanki

कटारिया गावाचे ३६ वर्षीय किशोर भाई गोहिल धाग्यांना गाठी घालतायत. यामध्ये रेशमी धाग्यांना सुती दोरे बांधले जातात जेणेकरून तिथे रंग लागत नाही. पटोलाचे धागे रंगवल्यानंतर सुती दोऱ्यांमुळे मूळ धागा रंगत नाही आणि त्यातून धाग्यांवर नक्षी तयार होते

PHOTO • Umesh Solanki

२५ वर्षीय महेंद्र वाघेला एकदा रंगवून झालेले धागे दुसऱ्या रंगासाठी घेऊन जातायत. पटोलामधली नक्षी आणि त्यामध्ये वापरलेल्या रंगांनुसार अनेकदा ही धाग्यांना गाठी बांधण्याची आणि रंगवण्याची प्रक्रिया करावी लागते

PHOTO • Umesh Solanki

महेंद्र गाठी बांधलेले आणि रंगवलेले धागे हायड्रो घातलेल्या उकळत्या पाण्यात भिजवून घेतो. ‘आधीच रंगवलेल्या धाग्यांवर दुसरा रंग द्यायचा असेल तर हायड्रो घातलेल्या उकळत्या पाण्यात त्या धाग्यांच्या जुड्या भिजवून त्याचा आधीचा रंग काढून टाकला जातो किंवा फिका केला जातो,’ रेखा बेन सांगतात

PHOTO • Umesh Solanki

‘रंगवताना गाठी बांधलेल्या भागात रंग जाणार नाही याची फार काळजी घ्यावी लागते,’ महेंद्र सांगतो. तो वाफाळत्या पाण्यात दुसऱ्या रंगासाठी धागे भिजवून घेतोय. ‘गाठींच्या भागात रंग कधी शिरायला लागणार, सोल्यूसन कधी घालायचं, पाण्यात धागे किती काळ बुडवून ठेवायचे हे सगळं काम करणाऱ्याला अनुभवातून समजतं,’ तो सांगतो

PHOTO • Umesh Solanki

महेंद्र रंगवलेले धागे गार पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घेतो. ‘पटोलुच्या रेशमावर अनेक सारे रंग असतात आणि नक्षी त्यामुळेच इतकी सुंदर दिसते. रंगसंगती महत्त्वाची असते. ती एकदम नजरेत भरणारी हवी,’ विक्रमभाई परमार म्हणतात

PHOTO • Umesh Solanki

रंगवलेले धागे नंतर निथळून घेतात आणि सुकवतात. कटारिया गावातले जगदीश रघु भाई गोहिल रंगवलेले धागे परत एका लाकडी चौकटीवर बांधतात आणि त्यावरच्या गाठी सोडवून सुती धागे काढून टाकतात

PHOTO • Umesh Solanki

मोटा टिंबला गावाच्या पंच्याहत्तर वर्षांच्या वली बेन वाघेला छोटी सुई घेऊन गाठी उकलतायत. एका पटोला साडीवरची नक्षी कशी आहे त्याप्रमाणे तितक्या वेळा गाठी घालायच्या, धागा रंगवायचा आणि पुन्हा गाठी सोडवायच्या असं करत रहावं लागतं

PHOTO • Umesh Solanki

बाण्याच्या धाग्यावरची नक्षी पूर्ण झालीये आता जसु बेन वाघेला एका मोठ्या लाकडी चाकावर तो धागा गुंडाळून घेतायत

PHOTO • Umesh Solanki

कटारिया गावाच्या अठ्ठावन्न वर्षांच्या शांतू बेन रघु भाई गोहिल बाण्याचे तयार धागे मोठ्या लाकडी चाकावर गुंडाळून घेतायत

PHOTO • Umesh Solanki

कटारियाच्या छप्पन्न वर्षीय हीरा बेन गोहिल चाकावरच्या धाग्यांनी कांड्या भरतायत. पटोला विणताना भरलेल्या कांड्या धोट्यातून आर पार केल्या जातात

PHOTO • Umesh Solanki

मोटा टिंबला गावातले विणकर रंगवलेले धागे ताणून घेतायत. दुहेरी इकत प्रकारच्या पटोलामध्ये ताण्याच्या आणि बाण्याच्या अशा दोन्ही धाग्यांवर नक्षी असते. नक्षी रंगवून झालेला धागा रस्त्यावर दोन खांबांना बांधून ताणून घेतला जातो

PHOTO • Umesh Solanki

मोटा टिंबला गावातले विणकर ताणलेल्या धाग्याला मजबुती यावी म्हणून त्याला खळ लावतायत

PHOTO • Umesh Solanki

मोटा टिंबलाचे वशराम भाई सोलंकी खळ लावलेले नवे धागे मागावरच्या फण्यांमधून आलेल्या जुन्या धाग्यांना जोडून घेतायत. ‘रेशमी धागे जोडण्यासाठी राखेचा वापर केला जातो,’ ते सांगतात

PHOTO • Umesh Solanki

पूंजा भाई वाघेला ताण्याचे धागे मागावर चढवतायत, रंगवलेलं रेशीम गुंडाळलेला रुळ मागावर बसवला जातो

PHOTO • Umesh Solanki

प्रवीण भाई गोहिल, वय ५० आणि प्रेमिला बेन गोहिल, वय ४५ कटारिया गावात एकेरी इकत विणतायत. या सागवानी मागाची किंमतच ३५,००० ते ४०,००० इतकी असू शकते. सगळ्या विणकरांना काही माग विकत घेणं परवडत नाही

PHOTO • Umesh Solanki

दाना भाई दुलेरांनी अगदी सुरुवातीला कटारियाच्या दलितांना पटोला विणकामाची कला शिकवली

PHOTO • Umesh Solanki

अशोक वाघेला एकेरी इकत पटोला विणतायत

PHOTO • Umesh Solanki

मोटा टिंबला गावातील भावेश कुमाल दुहेरी इकत पटोला विणतायत

PHOTO • Umesh Solanki

दुहेरी इकतमध्ये उभ्या-आडव्या म्हणजेच ताण्यावर आणि बाण्यावर दोन्हीवर नक्षी असते. एकेरी इकतमध्ये मात्र फक्त आडव्या धाग्यांवरच नक्षी असते

PHOTO • Umesh Solanki

अतिशय मोहक रंग असलेल्या दुहेरी इकत नक्षीच्या पटोला साड्या आणि इतर वस्त्रं जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत

Umesh Solanki

اُمیش سولنکی، احمد آباد میں مقیم فوٹوگرافر، دستاویزی فلم ساز اور مصنف ہیں۔ انہوں نے صحافت میں ماسٹرز کی ڈگری حاصل کی ہے، اور انہیں خانہ بدوش زندگی پسند ہے۔ ان کے تین شعری مجموعے، ایک منظوم ناول، ایک نثری ناول اور ایک تخلیقی غیرافسانوی مجموعہ منظرعام پر آ چکے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Umesh Solanki
Editor : Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے